फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजबंधने शिथिल करा अन्यथा झूगारुन देऊ:राज्य सरकारला व्यवसायी आंदोलकांचा इशारा

बंधने शिथिल करा अन्यथा झूगारुन देऊ:राज्य सरकारला व्यवसायी आंदोलकांचा इशारा

Advertisements


व्यवसाय सोडून व्यवसायी उतरले रस्त्यावर! 

नागपूर,ता. २६ जुलै: आमची नाराजी राज्य सरकारवर आहे कारण नागपूर शहराला करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरही सरकारने लेव्हल-१ मधून बाहेर काढून लेव्हल-३ मध्ये टाकले नाही परिणामी पश्‍चिम महाराष्ट्रात जिथे सद्यस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे,त्यांच्यावर लादलेले निर्बंधच नागपूर शहरावर देखील राज्य सरकारने तसेच्या तसे लादले आणि व्यवसायासाठी फक्त दूपारी ४ वाजेपर्यंत अशी अत्यंत गैरसोयीची वेळ देण्यात आली आहे.

याशिवाय शनिवार,रविवार व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात आल्याने शहरातील व्यवसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून हा विषाणू कधीपर्यंत प्रभावी राहणार याविषयी मात्र सरकार कोणतेही ठोस उत्तर देत नाही,सरकारच्या याच निर्णयाच्या विरोधात आज शहरातील फक्त व्यवसायिकच नव्हे तर कॅटरर्स पासून तर बॅक स्टेजवर काम करणा-या अनेक संस्था या आंदोलनात रस्त्यावर उतरल्या आहेत.सरकारने नागपूर जिल्ह्यातील कराेनाचा प्रादुर्भाव बघता लेवल-१ मधून बाहेर न काढल्यास या शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो कारण आता आमच्यावर निर्भर असणो शेकडो कर्मचारी यांचीही सहनशीलता आता संपली आहे,असा इशारा ‘सरकार जगाओ,वाणिज्य बचाओ’संघर्ष समितीचे मानद सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी खास ‘सत्ताधीश’ला प्रतिक्रिया देताना दिला.

आज सोमवार दि.२६ जुलै रोजी शहरातील एकूण २४ व्यापारी संघटनांनी एकत्रित येऊन दूपारी ४ वा.संविधान चौकातून निषेध मोर्चा काढला.याप्रसंगी जोरदार नारेबाजी झाली.करोना प्रतिबंधक निर्बंध लागू करण्यासाठी सरकारने ४ जून रोजी शास्त्रशुद्धरित्या अत्यंत योग्य असे विविध लेव्हल जाहीर केले होते.त्यानुसार नागपूर जिल्हा हा लेव्हल-१ मध्ये आला होता.मात्र डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या संभाव्य तिस-या लाटेची शक्यता बघता संपूर्ण राज्यासाठी एकसमान निर्बंध लागू करण्यात आले,जे नागपूर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव बघता अयोग्य ठरत आहे,असे तेजिंदरसिंग रेणू यांनी सांगितले.हा विषाणू ‘अजरामर’असून सतत आपले रुप बदलत राहणार आहे,त्यासाठी आता जिवंत माणसांची उपासमार किती काळ करणार आहे?

या निर्बंधाचा गंभीर फटका हॉटेल,रेस्टॉरेंट,मंगल कार्यालय,लॉन,कोचिंग क्लासेस,स्टेशनरी,सांस्कृतिक क्ष्ेत्र,बॅक स्टेज कलावंत आदी घटकांना बसला.सर्वात महत्वाची बाब कोराना विषाणू हा ‘आरएनए’घटकात मोडत असल्यामुळे याचा कुठेही अंत नाही,ज्याप्रकारे एड्सवर अंतिम उपचार नाही फक्त नियंत्रण मिळू शकतं तसंच करोना विषाणूचं आहे.मग सरकारनेच आता सांगावे या विषाणूचा प्रादुर्भाव अमूक इतक्या काळापर्यंत असणार आहे तोपर्यंत आपला व्यवसाय निर्बंधात सुरु ठेवा,आम्ही आणखी ६ महिने,एक वर्ष सरकारला निश्‍चित सहकार्य करु मात्र गेल्या वर्षभरापासून करोनाच्या भीतीने सरळ-सरळ व्यवसायांवरच निर्बंध लादून सरकार काय साध्य करतेय?

अनिश्‍चत काळापर्यंत तर आम्ही असे भीतीत जगू शकत नाही.विशेष म्हणजे जेव्हा नागपूर जिल्ह्यात निर्बंध लागू होते त्यावेळी याच वर्षी फेब्रवारी,मार्च अगदी एप्रिलपर्यंत पश्‍चिम महाराष्ट्रात सर्व प्रकारचे व्यवसाय सुरु होते,आता पश्‍चिम महाराष्ट्रात करोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लादण्यात आले आहे तर त्यात नागपूर जिल्ह्यालाही समाविष्ट करण्यात आले ,महत्वाचे म्हणजे १ जुलै ते २४ जुलै पर्यंत म्हणजे याच महिन्यात फक्त ३०० करोना बाधितांची संख्या नागपूर जिल्ह्यात आढळली आणि ६ मृत्यू झालेत.याचा अर्थ दररोज १० ते ११ व्यक्ती करोनाने बाधित होत आहेत,अश्‍यावेळी नागपूर जिल्ह्याला लेव्हल-१ मधून काढून राज्य सरकार लेव्हल-३ मध्ये का ठेवत नाही?असा प्रश्‍न रेणू यांनी उपस्थित केला.

पटोले यांच्यावर विश्‍वास-
याच महिन्यात ९ जुलै आणि २० जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते त्याप्रमाणे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष् नाना पटोले यांना देखील यासंबधीचे निवेदन देण्यात आले,त्यावेळी आमदार विकास ठाकरे,आ.अभिजित वंजारी हे देखील उपस्थित होते.त्यांनी आपत्ती व पुर्नवसन मंत्री वडेट्टीवार यांना त्याच वेळी फोन देखील केला होता मात्र कोकण-रत्नागिरीमध्ये आलेल्या पूर परिस्थती पाहणीत मंत्री हे व्यस्त असल्यामुळे फोन लागू शकला नाही मात्र पटोले यांनी शब्द दिला आहे लवकरच ते यावर तोडगा काढतील.त्यांनीच आज सोमवार पासून निर्बंध शिथिल करण्यासाठी सरकारसोबत बोलणार असल्याचे आश्‍वासन दिले होते,आम्ही अजूनही आशावादी आहोत.

मनपा आयुक्तांना निर्बंध काढण्याचा अधिकारच नाही!
या संदर्भात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी.यांना देखील निवेदन देण्यात आले मात्र साथरोग व अापत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गंत ते नागपूर शहरात कठाेरापेक्ष्ा कठोर निर्बंध तर लागू करु शकतात मात्र कोणतेही निर्बंध शिथिल करु शकत नसल्याची अधिकाराची ‘मर्यादा’ त्यांनी विदीत केली.तरी देखील ते विविध व्यवसायिक संघटनांचे नागपूरात आज झालेले आंदोलन व उद्याची बाईक व कार रॅली या सदंर्भात माहिती पाठवून नागपूरात निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य शासनाला पत्र पाठवणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले असल्याची माहिती रेणू यांनी दिली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या