

ज्येष्ठ नाट्यकर्मी सलीम शेख यांना कंगना रानौतवरील पोस्ट भोवली
नागपूर,ता. १९ सप्टेंबर: गेल्या शुक्रवारी नागपूरातील ज्येष्ठ रंगकर्मी सलीम शेख यांनी त्यांच्या फेसबूक वॉलवर कंगना रानौत संबंधी एक पोस्ट टाकली त्यात ‘कंगना द्रौपदी..मोदी कृष्ण तर..कंगनाचे पाच नवरे कोण..’असे वादग्रस्त वक्तव्य होते,परिणामी भगवा प्रतिष्ठान तसेच इतर नेटीझन्सने सलीम शेख यांना चांगलेच ट्रोल केले.
सलीम शेख यांनी लोकांची धार्मिक भावना दुखवून त्यांना मानसिक त्रास होईल,अशी पोस्ट टाकली तसेच कंगनाचे पाच नवरे कोण अशी अभद्र भाषेत प्रश्न विचारुन स्त्री कलाकारावर लांछन लावले,हे चुकीचे असल्याचे नेटकरी म्हणाला तर भगवा प्रतिष्ठानतर्फे अतिशय अर्वाच्य शब्दात या पाेस्टवर कमेंट करण्यात आले.सलीम शेख यांच्या नाटकाचा एकही प्रयोग नागपूर काय अख्ख्या विदर्भात होऊ देणार नसल्याचा इशारा दिला. तर फक्त निषेध नोंदवून काहीच होणार नाही कडक कारवाई झालीच पाहिजे,हिंदू धर्मावरच प्रहार या देशात एवढ्या उघडपणे कसे होतात?इतर धर्माविषयी एक शब्द ही उच्चारला जात नाही,असा संताप व्यक्त झाला.
सलीम शेख स्वत:एक कलाकार असताना पद्मश्रीप्राप्त स्त्री कलावंताला अभद्र,चुकीचे बोलून अपमानित केल्याबद्दल सलीम शेख यांना नाट्यक्ष्ेत्रातूनच बॉयकॉट करण्याची मागणी नेटीझन्सनी केली,सलीम शेख यांच्या नाटकात कोणीही काम करु नये,अश्या नाट्यकर्मीचे नाटक ही बघायला कोणी जाऊ नये,अश्या व्यक्तिचा सर्वांनीच निषेध करावा एवढेच नव्हे तर अश्या मनोविकृत व्यक्तिचे नाट्य परिषदेचे सभासदत्व रद्द करण्यात यावे,याबाबत सर्वांनी नाट््यपरिषदेच्या अधिका-यांकडे तक्रार नोंदवावी,अशी मागणी करण्यात आली. तर एका नेटीझनने कंगना रानौत यांचे अजून हिंदू विवाह कायद्यानुसार लग्नच झाले नाही…आणि राहीलं पाचचं तर तिने आतापर्यंत दहा पोहचवले असतील..वीरांगना आहे ती आमची..खबरदार!असा इशारा दिला.
थोडक््यात केवळ एका पोस्टमुळे नागपूरातील नाट्यक्षेत्रात चांगलेच शाब्दिक ‘महाभारत’घडल्याचा प्रत्यय नाट्यकर्मींना आला.नाट््यकारण सोडून राजकारणात पडणे सलीम शेख यांना चांगलेच भोवले. हीच पोस्ट नव्हे तर सलीम शेख हे त्यांच्या फेसबूक पेजवर सातत्याने महाराष्ट्रातील राजकारण,सुशांतसिंह राजपूत-रिया प्रकरण,कंगना रानौत इ.प्रकरणावर वादग्रस्त पोस्ट टाकल्या आहेत मात्र आतापर्यंत सर्वांनी दुर्लक्ष् केले,मात्र ‘पाच पांडव’असा उपहासात्मक उल्लेख करताच सलीम शेख हे ट्रोलर्सच्या चांगलेच निशाण्यावर आलेत.
मध्यवर्तीकडे तक्रार दाखल-
नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेचे सलीम शेख अध्यक्ष् आहेत.नाट्यपरिषदेची नागपूर शाखा संधी देत नाही,हे कारण पुढे करुन काही वर्षांपूर्वी महानगर शाखेचा प्रस्ताव पुढे आला आणि मध्यवर्तीने हा प्रस्ताव मान्य केला. मात्र नागपूरात पार पडलेले ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट््य संमेलनात महानगर शाखेच्या पदाधिका-यांसोबत सलिम शेख यांनी ग्रंथ दिंडीच्या प्रसंगी काळे वस्त्र परिधान करुन काळे झेंडे दाखवून नाट््य परिषदेचा निषेध केला होता.ही बाब परिषदेच्या अनेक पदाधिका-यांना रुचली नव्हती.नागपूरकर जनतेला देखील शहराची बदनामी करणारा हा प्रकार आवडला नव्हता.नाट््यपरिषदेशी संबंधित असतानाही पदाधिका-यांशी चर्चा न करता केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेल्या या उपदव्यापाबदल्ल बरिच किरकिरी सलीम शेख यांची झाली होती.त्यांची ही कृती परिषदेच्या घटनेविरोधात असल्याचे सांगून मध्यवर्तीने आक्ष्ेप नोंदवला होता,यानंतर सलीम शेख यांनी माफी ही मागितली होती.
याही प्रकरणात त्यांच्यावरील संकट काही टळले नाही.अनेकांनी त्यांना धारेवर धरत सायबर सेलकडे तक्रार केली आहे.प्रकरण अंगावर येत असल्याचे बघून गेल्या शनिवारी त्यांनी लगेच ती वादग्रस्त पोस्ट डिलीट केली.मात्र विदर्भातील काही रंगकर्मींनी मध्यवर्तीकडे याबाबत तक्रार नोंदवली असून मध्यवर्ती आता कोणती कारवाई करते?याकडे नाट्यकर्मींचे लक्ष् लागले आहे.
धार्मिक भावना दुखवण्याचा उद्देश्य नाही-सलीम शेख
कोणाला वाईट वाटावं म्हणून पोस्ट टाकली नव्हती. मात्र कंगना रानौत या ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत बोलली,मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा केला त्यावर केलेले हे भाष्य होते मात्र त्यापूर्वी ‘चिरहरण‘यावर एक पोस्ट आली होती,यात कंगना हिला द्रौपदी,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुशासन,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीकृष्ण असे संबोधले होते.त्यावर कमेंट करणारी ही पोस्ट टाकली होती की मग पाच पांडव कोण?मात्र माझ्या मित्रांनी याचा चुकीचा अर्थ घेतला आणि मला ट्रोल केले.
तीन वर्षांपूर्वी ’ट्रीपल तलाक कायद्याचे ’ समर्थन करणारे ’फतवा’हे नाटक मी लिहलं,ट्रिपल तलाक हे मानवता विरोधी असल्याचे त्यात सांगण्यात आले. यात मी सरकारचे समर्थनच केले.‘कमेला’ नाटकात आपल्या मुस्लिम धर्मातील एका कुप्रथेवर प्रहार केला होता.एका आदिवसी जमातीत आढळणारी ‘कोमार्य’या कूप्रथेवर देखील नाटक लिहिलं.‘ईष्टबहार’नाटकात मी काश्मीरमधील कलम ३७० हटवलं त्याचेही समर्थन केले.सरकार कोणाचेही असो नाटककार म्हणून मला जे योग्य वाटलं ते केलं.मी कलावंत आहे,मी कोणत्या धर्म,जातीपेक्षा कलावंत म्हणून मला जे योग्य वाटतं यावर लिहितो.देशात सरकार कोणचंही असो ती सरकार नागरीक म्हणून आपलीच असते,या ही पोस्ट मध्ये माझा हेतू हा कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा नव्हता,मी ती पोस्ट डिलीट केली,माझ्यापरीने हा विषय तिथेच संपला.




आमचे चॅनल subscribe करा
