

नागपूर : नागपुरात करोनाचे एकूण ५९ रुग्ण असल्याची ऑडिओ क्लिप तयार करून ती व्हायरल करणाऱ्या तिघांची प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. जे. शिंदे यांनी पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि परत असा गुन्हा न करण्याच्या अटीवर जामिनावर मुक्तता केली.
जय ऊर्फ मोनू ओमप्रकाश गुप्ता (३७, रा. अमर विहार, ऑटोमोटिव्ह चौक), दिव्यांशू रामविलास मिश्रा (३३, सुयोग नगर, अजनी) आणि अमित शिवपाल पारधी (३८, रा. मिसल ले-आउट) अशी या तिन्ही आरोपींची नावे आहेत. त्यांना गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अटक केली होती. शहरात करोनाचे ४ नाही तर ५९ रुग्ण असल्याचा दावा या क्लिपमध्ये करण्यात आला होता.
आरोपींनी त्याचे वकील प्रकाश जयस्वाल, अॅड. आशिष नायक आणि अॅड रौनक शर्मा यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने आरोपींची सशर्त जामिनावर सुटका केली.




आमचे चॅनल subscribe करा
