फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमफेक ऑडियो व्हायरल करणा-या तीन लोकांना अटक

फेक ऑडियो व्हायरल करणा-या तीन लोकांना अटक

Advertisements


अफवाह पसरवाल तर तुरुंगात जाल:डॉ.भूषणकुमार उपाध्येय यांचा इशारा

नागपूर: मेयाे,मेडिकल दोन्ही रुग्णालय मिळून शहरात ५९ करोना पॉझिटिव्ह आणि दोनशेच्या वर रुग्ण खुलेआम फिरत असून मेडीकलच्या तीन डॉक्टर्सपैकी एक वेंटिलेंटरवर असल्याची अफवाह ऑडीयो क्लीपद्वारे पसरवून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवून देणा-या तीन लोकांना काल रात्री अटक करण्यात आल्याची माहिती नागपूर शहराचे पोलिस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी शुक्रवारी व्हीडीयोच्या माध्यमातून दिली.

अमित पारधी,जय गुप्ता व अन्य एकाचे आडनाव मिश्रा असल्याचे त्यांनी सांगितले. अमित पारधी हा फोनवरुन जय गुप्ता यांना करोनाबाबत खोटी माहिती देत होता,या दोघांच्या संभाषणाची ही ऑडीयो क्लीप मिश्रा याने सोशल मिडीयावर व्हायरल केली होती. या फेक ऑडियोमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. यात मेयामधील एका डॉक्टरला करोनाची लागण झाली असून तो वेंटिलेटरवर असल्याची बतावणी अमित पारधी याने केली होती तसेच मेयाे-मेडिकमलध्ये तपासल्या जाणारे नमूने याविषयी देखील चुकीची माहिती दिल्याने नागपूरात भीतीचे वातावरण पसरले होते.

सायबर सेलकडे ही तक्रार नोंद होताच सायबर सेल हे त्यांच्या मागावरच होते. अखेर काल रात्री तिघांनाही अटक करण्यात आली असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले व त्यांची पाठवणी तुरुंगात करण्यात आल्याचे उपाध्येय यांनी सांगितले.दोन लोकांच्या संभाषणाची ही ऑडीयो क्लिीप तिस-या व्यक्तिने व्हायरल केली.यात करोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येविषयी अतिशय चुकीची माहिती यात देण्यात आली होती.

या तिघांनाही कठोर शिक्ष्ा मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. जनतेलाही त्यांनी आवाहन केले आहे,कोणीही चूकीची माहिती किवा फेक न्यूज सोशल मिडीयावर पसरवू नये,असे घडल्यास त्यांचीही पाठवणी तुरुंगात होईल,असा गंभीर इशारा त्यांनी दिला.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या