फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज‘फिरस्त्या’ ठरला तरुणांसाठी प्रेरणादायी

‘फिरस्त्या’ ठरला तरुणांसाठी प्रेरणादायी

Advertisements

ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप

नागपूर, १९ डिसेंबर: शिक्षणासाठी वणवण भटकंती करणारा एका शेतमजुराचा मुलगा ते एक प्रशासकीय अधिकारी असा त्यांचा प्रवास दर्शविणारा नागपूरचे आयकर सहआयुक्‍त विठ्ठल भोसले यांच्‍या जीवनावर आधारित ‘फिरस्‍त्‍या’ हा चित्रपट तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला. या चित्रपटाला चित्रपट रस‍िकांनी भरगच्च उपस्थिती लावली.

ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनच्या पाचव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप रविवारी फ्रांस येथील ‘टूवर्डस द बॅटल’ या चित्रपटाने झाला.

फिरस्त्या’ या चित्रपटाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे मिळून एकूण ५९ पुरस्कार मिळाले असून, २३ देशांमधील चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली आहे.

या चित्रपटाची पटकथा व दिग्‍दर्शन स्‍वत: विठ्ठल भोसले यांनी केले असून या चित्रपटात समीर परांजपे, हरिश बारस्‍कर, मयुरी कापडाने, अंजली जोगळेकर, अदनेश मुडशिंगकर, श्रावणी अभंग व समर्थ जाधव यांच्‍या भूमिका आहेत.

चित्रपटाच्‍या प्रदर्शनानंतर मूळचे सोलापूर जिल्‍ह्यातील वानगी गावचे असलेल्‍या व सध्या नागपूर येथे कार्यरत असलेल्‍या विठ्ठल भोसले यांच्‍याशी चित्रपट अभ्यासक समर नखाते यांनी संवाद साधला. यावेळी भोसले यांनी सर्वांसमोर आपले भावविश्व उलगडले. हा चित्रपट आसपासच्या व्यतिरेखा, घडलेल्या घटना यातून साकारला गेला. त्यामुळे कलाकार, प्रेक्षक, आस्वादक यांचे नाते साकारले गेले, असे ते म्हणाले.

प्रेरणादायी गोष्ट निर्माण करावी हे माझ्या डोक्यात होते. मी जगलो त्यातून लोकांनी प्रेरणा घ्यावी ही इच्छा आहे. जे भोगले ते चित्रपट रुपात उतरले. ग्रामीण भागातील तरुणांचे वास्तविक जीवन, संघर्ष लोकांना कळावा हा आमचा उद्देश होता. पत्नीच्या सहकार्याने हे शक्य झाले, असे म्हणत त्यांनी आपल्या पत्नी व चित्रपटाच्या निर्मात्या स्वप्ना भोसले यांचे आभार मानले.

ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी उपस्थित कलाकारांचे व भोसले दाम्पत्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच पर्सिस्‍टंट सिस्‍टीम, पुणे फिल्म फेस्टिवल, पत्रकार, आणि पडद्याआड कार्य करणाऱ्या सर्व कार्यवाहकांचे आभार मानले. समारोपाक्षणी डॉ. मेश्राम यांनी उपस्थितांशी हितगुज केले. त्यावेळी अनेकांनी ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनने ‘ चित्रपट प्रशंसा कार्यशाळा ‘ घ्यावी अशा भावना प्रकट केल्या.

आपल्या आजूबाजूच्या सामान्य व्यक्तींमधून कलाकार घडावे या भावनेतून हा महोत्सव सुरू करण्यात आला, असे मेश्राम म्हणाले.
आज दिवसभरात सिस्टर्स, कॉट आणि टूवर्ड्स द बॅटल हे चित्रपट देखील प्रदर्शित करण्यात आले. ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम, सचिव विलास मानेकर आणि इतर सर्व सदस्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे सार्थक झाल्याचे प्रेक्षकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादातून दिसून आले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या