

‘पॅनडॅमिक’काळातही ‘श्रेयवाद’ठरतोय लई भारी!
नागपूर,ता. १ जुलै: गेल्या तीन दिवसांपासून नागपूर महानगरपालिकेच्या सर्व केद्रांवर लसीकरण बंद आहे मात्र दुसरीकडे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अथक परिश्रमाने’ त्यांच्या दक्षिण -पश्चिम विधानसभा मतदार संघातील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये २६ जून पासून १८ ते ३० वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण केंद्र सुरु झाले जे गर्दीने ओसंडून वाहत आहे,एकीकडे मनपाची संपूर्ण लसीकरण केंद्रे अपु-या लस साठ्या अभावी ओस पडली आहेत दूसरीकडे माजी मुख्यमंत्र्यांच्या या उपक्रमाला लसींचा भरपूर साठा उपलब्ध झाला आहे,या ‘योगायोग’बद्दल आज मनपात चांगलीच चर्चा रंगली होती.

महापौरांनाही शहरातील बंद लसीकरण केंद्रांची कोणतीही चिंता नसून ते फडणवीस यांच्या लसीकरण केंद्राच्या उद् घाटन सोहळ्यात हिरिरीने सहभागी होताना व कौतूकगान करताना दिसतात तेव्हा मनपाच्या लसीकरण केंद्रावरुन निराश होऊन परत जाणा-या नागरिकांच्या मनात कसे विचार उमटत असावे?‘आधी छोड पूरी को धावे,आधी पावे ना पूरी पावे’ही म्हण कोणाच्या वर्तवणूकीवर चपखल बसते?
नॅशनल कँसर इन्सिटिट्यूट ऑफ नागपूर व सेवांकूर प्रतिष्ठानातर्फे १८ ते ३० वयोगटातील तरुणाईसाठी लसीकरणाचा हा उपक्रम २६ जून रोजी दूपारी माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते बाकायदा उद् घाटन सोहळा घेऊन सुरु झाला.योगायोग असा की त्याच दरम्यान १८ जे ४४ वर्षावरील लसीकरण सुरु झाल्यानंतर दोन वेळा विक्रमी लसीकरण केल्यानंतर लगेच लससाठ्या अभावी मनपाची लसीकरण मोहीमच बंद झाली!

तरुणाईचा लसीकरण मोहिमेला प्रतिसाद बघता महापालिकेने १०५ वरुन केंद्रांची संख्या १२२ पर्यंत वाढवली होती.२३ जूनपासून सुरु झालेल्या या लसीकरण मोहिमेत काेव्हिशिल्ड लस देण्यात आली होती.सध्या पहीली व दूसरा डोज घेणा-या नागरिकांची संख्या ८ लाख ८१ हजार ५०८ एवढी आहे त्यातही दूसरा डोज घेणा-या नागरिकांची संख्या फक्त २ लाख १३ हजार ०११ एवढी आहे.याचा अर्थ फार मोठी लोकसंख्या ही दूसरा डोज मिळण्याचा प्रतिक्ष्ेत असताना मनपाच्या स्टोरमध्ये लसींचा अचानक ‘ठणठणाट’झाला,तर दुसरीकडे फडणवीस यांच्या उपक्रमात लसीकरणासाठी तरुणाईने अपार गर्दी केली आहे!
७ जुलै पर्यंत सकाळी १० ते ४ वा.पर्यंत तरुणाईला फडणवीस यांच्या या मतदार केंद्रात ‘मोफत’ लस मिळणार अाहे,या वयोगटातील तरुणाईला पुन्हा करोना संक्रमण होऊ नये यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा दक्ष्णि-पश्चिम मंडळ,आय टी सेल,दक्ष्ि ण-पश्चिम मंडळ तसेच भाजप मंडळाच्या माध्यमातून २५ हजार डोज २६ जून ते ७ जुलैपर्यंच्या कालावधीत दररोज दिले जाणार असल्याचे भाजपच्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले.
२६ जून रोजी दूपारी २ वाजता कोरोना महामारीच्या काळात या सोहळ्याचे उद् घाटन ही झाले मात्र दूसरीकडे मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रात लसींचा अचानक ‘दुष्काळ‘पडला!
मनपाच्या स्टोरमधल्या लसी अचानक कश्या संपल्या,हा यक्ष् प्रश्न आता नागरिकांना पडला आहे!तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारने १४ ते १५ हजार लसींचा पुरवठा केला होता तसेच आधीच्या ३ हजार शिल्लक लसी मिळून तीन दिवसांपूर्वी १८ हजार लसी एकाच दिवसात मनपाच्या विविध लसीकरण केंद्रात लावण्यात आल्या,असे आरोग्य विभागाचे म्हणने आहे.मात्र तरी देखील फडणवीस यांचा लसीकरण सोहळा आणि दूसरीकडे मनपाच्या स्टोरमध्ये लसीं ठणठणाट या ‘योगायोगा’ची चर्चा आज मनपात चांगलीच रंगली होती.

न्यू इंग्लिश शाळेत तरुणाईसाठी मोफत लस उपलब्ध असताना दूसरीकडे शहरातील ज्येष्ठ नागरिक हे दुस-या डोजसाठी १६ ते १८ आठवड्यांच्या कालावधी लोटून देखील प्रतिक्षारत आहेत.खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हिशिल्ड ७५० रुपयात सहज उपलब्ध आहे मात्र आधीच लॉकडाऊनने आर्थिक कंबरडे मोडलेला मध्यम वर्गीय याचा कल, मनपाद्वारे मिळणा-या मोफत लसीकडेच असल्याचे आढळून येतं.भारतीय जनता पक्ष्ातर्फे १ लाख २० हजार लसी या सीरमकडून खरेदी करण्यात आल्या असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महापालिकेने एक कोटी लस खरेदीसाठी तब्बल १५ दिवस अडथळयांची शर्यत पार केली होती.लस पुरवठादारांच्या कागदपत्रांमध्ये तांत्रिक दोष आढळयाने संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी निविदेला(स्वारस्य अभिव्यकती प्रस्ताव)आणखी मुदतवाढ घ्यावी लागली होती.सव्वा कोटी लोकसंख्येच्या मुंबईत वेगवान लसीकरणासाठी पालिकेने एक कोटी लशी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता व त्यासाठी १२ मे रोजी जागतिक निविदा मागणव्यात आल्या होत्या.१८ मे पर्यंतच्या मुदतीत एकूण ५ पुरवठादारांचे प्रस्ताव पालिकेला प्राप्त ही झाले होते.

राज्यात १८ जे ४४ वयोगटातील वर्गासाठी राज्य सरकार १२ कोटी लसी एकरकमी घेण्यास तयार होती पण लसच उपलब्ध नाही,असा त्रागा २३ मे रोजी दस्तूरखुद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला होता.सातत्याने पाठपुरावा केल्यावर जून नंतर लसपुरवठा सुरळीत होईल,अशी खात्री ही त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने सुरु करु शकू असा आशावाद व्यक्त करताना जून अखेर तर नागपूरात लसीकरण केंद्रेच सलग तीन-तीन दिवस बंद ठेवण्याची वेळ मनपावर आली व पुढील आणखी तीन दिवस नागरिकांना या केंद्रांवरुन लस उपलब्ध होण्याची शक्यता नाही,त्यामुळे देशात व राज्य पातळीवर मध्यंतरीचा मृत्यूचा तांडव बघूनसुद्धा लसीकरणाविषयी अद्यापही राजकीय पातळीवर फक्त ‘श्रेयवादाचे सोहळे’घडताना दिसत आहेत.
‘आम्ही तुम्हाला मोफत लस देतो तुम्ही आम्हाला नंतर मत द्या,विसरु नका हं …आम्ही,आमच्या पक्ष्ाने लस देऊन तुमचे प्राण वाचवले आहेत……!असाच अर्थ या राजकीय पक्षाच्या लसीकरणाच्या या अश्या मोहीमेतून ध्वनित होतो व फक्त यासाठीच सर्व ‘राजकीय’ खटाटोप सुरु असल्याचे नागरिकांनाही चांगल्याने माहिती आहे.यासाठी मात्र मनपासारखी स्थानिक स्वराज्य संस्था देखील वेठीस धरल्या जात असेल तर ही अत्यंत गंभीर बाब ठरते.
हा काळ साथरोगाचा आहे की श्रेयवादाचा आहे?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.दोनच महिन्यांपूर्वी १६ एप्रिल रोजी मेडीकल,मेयोचे शवागार ‘हाऊसफूल’ झाले होते.संपूर्ण आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती.मेडिकलमध्ये सर्व वॉर्ड हाऊसफूल झाले होते.२० खाटांच्या कॅज्युल्टीत ५० रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली होती.खाटाच नसल्यामुळे मेडिकलमधील कॅज्युल्टी अक्ष् र: जाम झाली होती.कॅज्युल्टीला कुलूप लावण्याची वेळ आली होती!एकाच रात्रीत कोरोनामुळे मृत्यूंची संख्या एका शासकीय रुग्णालयात ८० पर्यंत पोहोचली होती त्यामुळे शवागार ही हाऊसफूल झाले होते.
एवढंच नव्हे तर शहरातील सर्व ११ दहनघाटांवरचे चित्र हे त्याहून विदारक होते.दाेन ओट्यांच्यामध्ये सरण रचून चिता पेटवल्या जात होत्या.एका एका दहन घाटांवर दिवसभरात ५०० ते ६०० शव अंत्यसंस्कारासाठी येत होते!त्याहून भयाण स्थिती मृतकांच्या नातेवाईकांची होती,अनेक मृतकांचे कुटूंबिय हे करोनाबाधित असल्याने दहन घाटांवर आपल्या प्रियजनांची अंत्यविधी ही करु शकले नाहीत,घरातील भयाण शांततेत विलाप करण्याशिवाय त्यांच्याकडे इतर कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता,अश्यावेळी ‘दिल्ली ते गल्ली‘पर्यंत लसीकरणाबाबत सुरु असणारी ही ‘श्रेयवादाची’स्पर्धा बघताना सामान्य नागरिक हा आतल्या आत पेटून उठतो आहे.
१६ जानेवारी २०२१ पासून भारतात लसीकरणाला सुरवात झाली.कोरोना विषाणूच्या शिरकावाला तेव्हा भारतात १० महिन्यांचा कालावधी उलटून केला होता!त्या काळात कराेना विषाणूवर मात करण्यासाठी देशातही संशोधन सुरु होते.१६ जानेवारी २०२१ पर्यंत विषाणूवर मात करु पहाणारी लस भारतीयांना उपलब्ध झाली.मात्र लसींच्या साठ्याचे केंद्रीकरण तसेच वितरण यातील सावळ्या गोंधळामुळे पहिल्या दिवसापासूनच ‘लसटंचाई’भारतीयांच्या पाचवीला पूजली गेली!
११ मे रोजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी देखील मुख्यमंत्री यांना पत्र लिहून नागपूर महानगरपालिकेला लस खरेदीसाठी परवानगी मागितली होती.नागपूर मनपा स्वखर्चाने १५ कोटी रुपयांपर्यंत लसींची खरेदी करणार होती मात्र या पत्राला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.पुढे काय पाठपुरावा करण्यात आला,याविषयी नागपूरकर जनता अद्याप अनभिज्ञ आहे.१ ते ७ मे दरम्यान देशात २६.५८ टक्के रुग्ण हे १८ ते ३० वयोगटातील होते!
साथरोगाचा नायनाट करण्यासाठी लस महत्वाची आहे,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान आहे.देशव्यापही लसीकरण मोहिमेवर लस टंचाईचे वादळ घोंघावत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ एप्रिल पासून चार दिवस देशात ‘टिका उत्सव’साजरा करण्याची घोषणा केली.हाच तो जीवघेणा एप्रिलचा महिना जेव्हा या विषाणूने देशात कहर बरपवला होता!याच काळात मुंबईत अनेक लसीकरण केंद्र सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळत असतानाच,या केंद्रांच्या उद् घाटन सोहळ्यापायी नागरिकांना भर उन्हात तासनतास खोळंबून राहवे लागले होते.मुंबईत एका नव्याने सुरु झालेल्या केंद्राच्या उद् घाटन सोहळ्यात ‘श्रेयवादा’वरुन वाद निर्माण झाल्याने भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली आणि प्रत्यक्ष् लसीकरणाचाच मोठा खोळंबा झाला!
परिस्थितीचे गांर्भीय राजकीय पक्ष्ांना कितपत कळले?हा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला होता.ग्रामीण भागातील लसीकरणाचे चित्र तर मान शरमेने खाली घालायला लावणारे आहे.अनेक शहरातील रुग्णालयातील डॉक्टरांना लस उपलब्ध करुन देण्यास किमान ५ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे उत्तर सीरम टास्क फोर्सकडून त्यावेळी मिळाले होते,त्याच सीरम कडून फडणवीस यांना १ लाख २० हजार लसी आता सहज उपलब्ध झाल्या आहेत.लाेकसंख्येच्या प्रमाणात नागपूरात लस किती उपलब्ध होत आहेत याबाबत काही निश्चित तत्वे केंद्राने आणि राज्याने आता ठरवायलाच हवी कारण…लोकांच्या सहनशक्तीचा आता अंत होत आहे.
गेल्या पाच महिन्यात नागपूरातील केवळ १६ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.लसीकरणाचा हाच वेग कायम असल्यास अजून अडीच वर्षे संपूर्ण शहराच्या लसीकरणासाठी लागतील.दोन्ही डोज घेणारे नागपूरात फक्त ५.४ टक्के नागरिक आहेत.
अश्यावेळी मनपाचे लसीकरण केंद्रे ओस पडून राहणे नागरिक आणि प्रशासन,राज्य सरकार आणि दिल्ली सरकार कोणाच्याही हिताचे नाही.लसीकरणाचे असे ‘इव्हेंट्स’हे देखील थांबायला हवेत, २४ मे २०२१ रोजी ‘लसीकरण आपल्या परिसरात’ उपक्रमाने नागपूरकर नागरिक जेवढे सुखावले होते तेवढेच जून महीना संपता संपता ‘आज ही लसीकरण नाही’असे फलक बघता बघता ‘संतापले’ आहेत.१३ लाखांच्या वर तरुण अद्याप लसीकरणापासून वंचित आहेत,एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत शहरात कोरोनाने ५५० तरुणांचा मृत्यू झाला असल्याचा ‘अधिकृत’आकडा आहे.तिस-या लाटेतील धोक्याची संभावना लक्ष्ात घेऊन मनपाने सर्व लसीकरण केंद्रामध्ये राजकीय धृवीकरणापलीकडे आणि ‘योगायोग’घडवून येण्यापलीकडे लसीकरणेची मोहिम वेगाने सुरु करणे म्हणूनच अत्यंत गरजेचे आहे.




आमचे चॅनल subscribe करा
