

फडणवीस यांच्याविरुद्ध कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत ॲड.सतीश उके यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
नागपूर,ता. १९ सप्टेंबर: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सध्या राज्यभर गाजत असलेल्या मुलाखतीत त्यांनी ते ब्राम्हण असल्यामुळेच त्यांना त्यांचे विरोधक टार्गेट करित असल्याचा उच्चार एका मराठी वृत्तवाहीनीत मुलाखती दरम्यान चार ते पाच वेळा केला,त्यांनी हा ब्राम्हण जातीचा वाजवललेला शंख मी नुकतेच १५ सप्टेंबर २०२० रोजी नागपूरचे पोलीस आयुक्त तसेच अजनीचे पोलीस उपायुक्तांकडे केलेल्या तक्रारीच्या आधारावच वाजवला असल्याचा दावा ॲड.सतीश उके यांनी केला.
या तक्रारीची कॉपी फडणवीस यांच्यापर्यंत गेली असल्यानेच त्यांना वारंवार मराठी वृत्तवाहीनीवर स्वत:च्या जातीविषयी खुलासा करावा लागला असल्याचे उके हे म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिकरित्या वावरत असताना फडणवीस यांना ‘जात‘ आठवली नाही मात्र मी १५ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीत ते ब्राम्हण नसल्याचे सांगताच त्यांना वांरवार ते ब्राम्हण असल्यामुळे टार्गेट होत असल्याचा दावा करु लागले,असा आरोप अॅड.उके यांनी केला.
१५ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीत फडणवीस हे जातीच्या आधारावर ऋग्वेदी व देशस्त वर्गातील ब्राम्हण मतदारांना सातत्याने मूर्ख बनवित असल्याचा दावा उके यांनी केला. फडणवीस म्हणतील ते ‘ब्रम्हवाक्य’व समोरच्याचे जीवन तुच्छ आणि बेकार अशी भावना त्यांनी व त्यांच्या गँगने अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण केली असल्याचे उके यांनी तक्रारीत नमूद केले.फडणवीस हे एकमेव देशभक्त व बाकीचे बैल,संघ शाखेत घूसून पवित्र झालेल्या फडणवीस यांनी माझ्या ज्यूनिअरला ….मारेल,पोलिस आतमध्ये टाकतील अश्या धमक्या त्यांच्या भावाने दिल्या असल्याचे उके यांनी तक्रारित नमूद केले.
फडणवीस हे ज्या ५२- दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघ येथील विधानसभा निवडणुकीत निवडून आले व विधानसभेचे सदस्य झाले, याच मतदार संघाचा मी मतदार आहे . परिणमी ते माझे जनप्रतिनिधी ठरतात. सन २०१४ चे ५२- दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघ निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष निवडणुकीच्या नामांकन पत्रासोबत फॉर्म-२६ ( रूल ४ ए) प्रमाणे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात २ प्रलंबित फौजदारी खटले ज्याची मा. न्यायालयाने दखल घेतली आहे आणि फडणवीस यांनी न्यायालयात स्वत: हजर होवून जामीन घेतला आहे. मात्र आपल्या निवडणूकीच्या प्रतिज्ञापत्रात फडणवीस यांनी त्यांच्या विरोधात दोन प्रलंबित फौजदारी प्रकरणांची माहिती आम्हा मतदार नागरीकांच्या माहितीतून लपविली,परिणामी त्यांच्यावर कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करावी,अशी मागणी ॲड. उके यांनी आपल्या तक्रारीत नमूद केली.
स्वतःच्या व्यक्तिगत विरोधकांना न्यायाधीश पाहून घेतील, कायद्यात फसवतील, त्याचा बदला घेतील असेही फडणवीस हे अनेकांपाशी बोलले ज्याचे साक्षीदार माझ्याकडे आहेत आणि यातून न्यायव्यवस्थेची बदनामी करण्याचा प्रकारसुद्धा फडणवीस यांनी केला असल्याचे उके यांनी दिलेल्या तक्रारीत दावा केला.
निवडणूकीच्या प्रतिज्ञापत्रात फडणवीस यांनी आपली दोन्ही गुन्हेगारीची माहिती लपवली असल्यामुळे सन २०१४ ते २०१९ च्या काळात त्यांनी आमदार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून शासकीय कोषातून पगार घेतला . हा पगार महाराष्ट्रातील सार्वजनिक संपत्तीतून होता . याप्रमाणे फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली आणि भा.द. वी.चे कलम ४२० प्रमाणे दंडनीय कृत्य केले.
एवढेच नव्हे तर शासकीय पगारावरच फडणवीस यांनी त्यांच्या निकटवर्तीयांना व हस्तकांना मंत्रालयात शासकीय पगारी नोकर म्हणून ठेवले , त्यांना अनेक महत्वाची सरकारी पदे दिली यातसुद्धा सार्वजनिक फसवणूक केली आणि भा.दं.वी. चे कलम ४२० प्रमाणे दंडनीय कृत्य केले . फडणवीस यांनी स्वतः आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीसुद्धा अनेक शासकीय सुखसोई मिळवून घेतल्या , फुकटची सरकारी सुरक्षेची मजा घेतली , फुकटचा हवाई प्रवास केला आणी यातसुद्धा सार्वजनिक फसवणूक केली आणि भा.द.वी.चे कलम ४२० प्रमाणे दंडनीय कृत्य केले .
वास्तविकतेत फडणवीस यांनी २०१४ च्या प्रतीज्ञापत्राचे केलेले कृत्य याची जबाबदारी स्वीकारून वरील कोणत्याही रकमेचा आणि सोयींचा उपभोग घ्यावयास नको होता . महत्वाचे म्हणजे स्वत: माजी मुख्यमंत्री हे कायद्याचे जानकार आहे परिणामी त्यांनी केलेले कृत्य याची अपराधिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी स्वतःस वरील सुखसोयीपासून दूर ठेवणे गरजेचे होते परंतु तसे न करता हे फसवणुकीचे कृत्य त्यांनी जाणीवपूर्वक केले असल्याने त्यांच्यावर भा.द. वी.चे कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून वरील सर्व रक्कम जप्त होणे किंवा त्याकरिता कारवाई होणे गरजेचे असल्याचे ॲड.उके यांनी नमूद केले .
सार्वजनिक पगारातूनच स्वत:च्या व्यक्तिगत प्रचारासाठी त्यांनी व्हिडीयोमध्ये अभिनय करुन ते सोशल मिडियावर प्रसिद्ध करून त्यावेळेचा सरकारी, सार्वजनिक पगार आणि सुखसोयी लाटल्या आणि जनतेच्या पैशाची लुट केली, वास्तविकतेत त्यावेळेचा त्यांनी सावर्जनिक रकमेतून मोबदला घेतला .
जनप्रतिनीधीला कायद्याप्रमाणे कामे करायची असतात, त्यांनी निवडून आल्यावर स्वतःच्या आवडीनिवडीप्रमाणे काम करणे हा त्यांचा अधिकार आणि हक्क नसतो. फडणवीस हे माझे जनप्रतिनिधी सोबतच विधानसभा विरोधीपक्ष नेता सुद्धा झाले , त्यामुळे ते केवळ भाजपा पक्षाचे नाही तर ज्या संवैधानिक पदावर आरूढ झालेत त्या पदाचे दावेदार झालेत आणि त्याचा पगारसुद्धा आता घेत आहेत, यामुळे कायदेशीर काम करणे हे त्यांचे न टाळता येणारे काम आहे आणि त्यांनी कोणत्याही गैरकायदेशीर कृत्यास मदत किवा त्याकडे डोळेझाक करता कामा नये हे कायद्याने आवश्यक आहे . यात कोणते काम करणे आणि कोणते टाळणे हि त्यांची व्यक्तिगत आवड ते ठेऊ शकत नाही कारण सार्वजनिक संपत्तीतून ते घेत असलेला पगार हा फुकटचा नसतो असे ॲड.उके यांनी नमूद केले.
याशिवाय ५२- दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघाचा सदस्य तसेच माझे जनप्रतिनिधी म्हणून दि. ८.०५.२०२० रोजी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी विधानसभा सदस्य यांच्या द्वारा निवडणूक होणारे महाराष्ट्र विधानपरीषद सदस्य यांच्या निवडीकरिता भा. ज. पा. उमेदवार प्रवीण प्रभाकरराव दटके यांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष सादर केलेले नामनिर्देशन पत्र यावर प्रस्तावक क्र. १ म्हणून स्वाक्षरी केली. भा. ज. पा. उम्मेद्वार प्रवीण प्रभाकरराव दटके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी (महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२०) [श्री राजेंद्र भागवत, सचिव (कार्यभार) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय व निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणूक ,२०२० ] यांच्या समक्ष सादर केलेल्या नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या फॉर्म-२६ ( रूल ४ ए) प्रमाणे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात , Regular Criminal Case No. 321/2006 pending before 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nagpur हे फौजदारी प्रकरण ज्यात मा. न्यायालयाने दखल घेतली आहे आणि प्रवीण प्रभाकरराव दटके हे न्यायालयात हजर होवून त्यांच्या माहितीत हे प्रकरण आहे , मात्र याची माहिती प्रवीण प्रभाकरराव दटके यांनी लिहिली नाही .
ज्यादिवशी प्रतीज्ञापत्र प्रवीण प्रभाकरराव दटके यांनी सादर केले त्यापूर्वीच आणि त्यावेळी हि स्थिती होती आणि ज्याअर्थी माझे जनप्रतीनिधी देवेंद्र आहेत , याकरिता प्रवीण प्रभाकरराव दटके यांची निवड रद्दबातल करण्याकरिता न्यायालयात माझे जनप्रतीनिधी म्हणून फडणवीस यांनी याचिका घालावी आणि प्रवीण प्रभाकरराव दटके यांच्या विरुद्ध फौजदारी तक्रार सुद्धा दाखल करावी याकरिता, दि. ६.०७.२०२० रोजी मी फडणवीस यांना स्पीड पोस्टाने , ई मेल ने आणि इतर माध्यमाने संपूर्ण विवरण / माहिती लिहून विनंतीपत्र पाठविले . हे विनंतीपत्र देवेंद्र फडणवीस यांना प्राप्त झाल्यावरसुद्धा फडणवीस यांनी माझे (पगारी) जनप्रतिनिधी असतांना सुद्धा प्रवीण प्रभाकरराव दटके हे त्यांच्या भा. ज. पा. पक्षाचे आहेत यामुळे कायदेशीर कर्तव्यविरोधात जावून, दटके यांची निवड रद्दबातल करून घेण्याकरिता याचिका मा. न्यायालयात दाखल केली नाही आणि फौजदारी प्रकरण सुद्धा दाखल केले नाही,हे विशेष! .
याचा अर्थ फडणवीस हे केवळ त्यांच्या राजकीय फायद्यासाठी व्यक्तिगत फायदा करिता निवडक कामे करतात, ते या गैरकायदेशीर कामास शासकीय कोषातून पगार घेवून मदत करीत आहेत . याप्रमाणे कायदेशीर बंधनकारक असलेली कामे न करता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमची, जनप्रतिनिधी म्हणून फसवणूक करीत असल्याचा दावा ॲड.उके यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले.
हेच नाही तर या कोव्हिड काळात आपल्या मतदारसंघाकडे लक्ष देणे, मतदारांची सेवा करणे हे गरजेचे असतांना ते परराज्यात वैगरे फिरत आहेत आणि फुकटचा पगार आणि सुखसोई आमच्याकडून घेत आहेत. याकरिता त्यांच्या विरुद्ध फसवणूकीची कारवाई होण्यास हि तक्रार देत आहे असल्याचे ॲड.सतीश उके यांनी नमूद केले.




आमचे चॅनल subscribe करा
