फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज''फडणवीसांना ट्रोल करण्यामागे टोळी”, भाजपा नेत्यांची नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार

”फडणवीसांना ट्रोल करण्यामागे टोळी”, भाजपा नेत्यांची नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Advertisements

नागपुरा: भाजपा नेत्यांकडून पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर आता नागपूर पोलीस आयुक्तांकडे यासंबंधी तक्रार नोंदवण्यात आली आहे. यावेळी भाजपा आमदार अनिल सोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्यामागे टोळी असल्याचा आमचा अंदाज असल्याचं म्हटलं आहे.

नागपुरातील भाजपा नेत्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. भेट घेतल्यानंतर आमदार अनिल सोले यांनी बोलताना सांगितलं की, “पोलीस आयुक्तांकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या असून यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्यात येत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. महाराष्ट्रात आपण सर्वजणे एकत्रितपणे करोनाची लढाई लढत आहोत. पण जेव्हा कधी देवेंद्र फडणवीस काही भूमिका मांडतात तेव्हा त्यांना ट्रोल केलं जातं. यामागे एखादी टोळी असावी असा आमचा अंदाज आहे”.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “देवेंद्र फडणवीस अनेकदा आपली भूमिका मांडतात. मुख्यमंत्र्यांना पत्र देत असतात. शासनाच्या मदतीने विषय मांडतात असतात. पण दरवेळी त्यांना ट्रोल केलं जातं. इतकंच नाही तर राज्यपालांच्या भेटीला गेले तरी ट्रोल केलं जातं. राज्यपालांना भेटण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांना ट्रोल करण्यासाठी एखादी खासगी कंपनी नेमली आहे की काय अशी शंका येते”. अनिल सोले यांनी  हे चुकीचं असून बंद झालं पाहिजे असं म्हटलं आहे.

आमच्या कार्यकर्त्यांनी एखादी गोष्ट लक्षात आणून दिली तर त्यांनाही नोटीस दिली जाते असं सांगताना अनिल सोले यांनी करोनाची लढाई एकत्रितपणे लढली पाहिजे असं आवाहन केलं आहे. दरम्यान याआधी मुंबईतही भाजपा नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत अशीच तक्रार केली होती.“

पोलिस कमिश्नर भूषण उपध्याय यांना आवेदन देताना महापौर संदीप जोशी,शहर अध्यक्ष प्रवीण दटके,आमदार गिरीश व्यास,अनिल सोले,कृष्णा खोपड़े,मोहन मते,विकास कुंभारे,युवा मोर्चा की अध्यक्ष शिवाणी दाणी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या