फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजप्रेम - परमेश्वराची मानवाला एक सुंदर भेट

प्रेम – परमेश्वराची मानवाला एक सुंदर भेट

(अतिथीस्तंभ)

 ‘ प्रेम ‘ ! एक सुंदर शब्द, एक सुंदर भावना आणि एक सुंदर अनुभव! प्रेम म्हणजे परमेश्वराने मानवाला दिलेली एक सुंदर  भावनारुपी देण आहे. प्रेमाचा अनुभव सगळ्यांच्याच नशिबात नसतो.जे भाग्यवान असतात तेच या प्रेमाचा दाहक तरी सुंदर असलेला अनुभव घेत असतात. प्रेमात जे सफल होतात ते भाग्यवान असतात आणि जे असफल होतात त्यांच्यासारखे दुर्दैवी तेच असतात. तरीही प्रेमाचा हा दाहक अनुभव त्यांचेसाठी मर्मबंधातली ठेव म्हणुनच आठवणीत असतो. प्रेम करणारे पुष्कळदा प्रेमात हारतात, परंतु हारूनही ते जिंकले असतात , कारण प्रत्येक खरा प्रेमी परमेश्वराचा दूत असतो. त्यामुळे परमेश्वराच्या दूताला कोण हरवू शकणार!
         खरच प्रेम म्हणजे काय असतं? ती एक अशी अनुभूती असते जी शब्दांत वर्णन करणे अवघड आहे. म्हणुनच प्रसिद्ध गीतकार गुलजार म्हणतात –
” प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज नहीं 
एक खामोशी है सुनती है कहा करती है
न ये बुझती है न रुकती है न ठहरी है कहीं 
नूर की बूंद है सदियों से बहा करती है
सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो 
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो “
        प्रेम जेव्हा प्रत्यक्ष होतं तेव्हा त्याची लक्षणं काय असतात याबद्दल ते लिहितात –
” मुस्कुराहट सी खिली रहती है आंखोंमें कहीं 
और पलकों पे उजाले से बिछे रहते है
होंठ कुछ कहते नहीं कांपते होठों पे मगर 
कितने खामोश से अफसाने लिखे रहते है “
       गुलजार ने लिहिलेल्या या ओळी प्रेमाच्या कसोटीवर अगदी अक्षर न् अक्षर खऱ्या उतरतात. खरे प्रेम असेच असते , मग ते आंधळे असो कि सुजाण असो. प्रेम कुणाला, कुणावर , केव्हा आणि कसे होईल हे सांगणे कठीण आहे. प्रेम पुरुषाला स्त्री वर , स्त्रीला पुरुषावर , वयस्कराला तरुणावर, तरुणाला वयस्करावर , मित्राला मित्रावर किंवा मैत्रिणीला मैत्रीणीवरही होऊ शकते. म्हणुनच गीतकार इंदीवर लिहितात –
” ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन
जब प्यार करें कोई तो देखें केवल मन “
      प्रेमाला जातपात ,धर्म, स्त्री, पुरुष अशी बंधने कधीच नसतात. प्रेम कुणालाही कुणावरही होऊ शकतं. एकदा कुणाचे मन कुणावर बसले कि मग कुठलीही शक्ती या प्रेमाला थांबवू शकत नाही. म्हणुन आनंद बक्षी म्हणतात –
” कोशिश कर के देख ले दरिया सारे नदिया सारी 
दिल की लगीं नहीं बुझती बुझती है हर चिंगारी “
       लैला मजनू, हीर रांझा, सोहनी महिवाल, रोमियो ज्युलियट यांच्या सारख्या अनेक प्रेमिंनी समाजविरोधाच्या आगीत जळून प्रेमाची परीक्षा दिली. या मृत्यू लोकात ते हारले असतील पण परमेश्वराच्या दरबारात मात्र ते जिंकले होते.
      प्रेमाची दाहकता आणि दु:ख सगळेच सहन करु शकत नाहीत. यासाठी सुद्धा परमेश्वराने विशिष्ट लोकांचीच निवड केली असते.
” दर्द जमाने में कम नहीं मिलते ,
सबको मुहब्बत के गम नहीं मिलते, टूटनेवाले दिल होते है कुछ खास “
       प्रेम केले जात नाही ते आपणहून होते. प्रेम झाल्यावर प्रेमी एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडतात कि ते स्वतःचे अस्तित्वही विसरतात. प्रेमामध्ये स्वतःचे अस्तित्व विसरणे हीच तर खऱ्या प्रेमाची ओळख आहे आणि हीच खऱ्या प्रेमाची परिसीमा आहे.
” यारा ओ यारा इश्क में मारा 
खो गया मै तो तुझमें तमाम 
दे रहे सब मुझे तेरा नाम 
मैं बेनाम हो गया “
    हाच प्रेमाचा सिद्धांत आहे आणि हीच खऱ्या प्रेमाची परीपूर्णता आहे. ‘वासना ‘ हे प्रेमाचे एक अंग आहे. पण केवळ वासना म्हणजे प्रेम नाही. खरे प्रेम पुष्कळदा वासनेच्या पलिकडे गेले असते. खऱ्या प्रेमात प्राप्ती हा मुद्दाच नसतो , तिथे केवळ त्यागच त्याग असतो. खरा प्रेमी स्वतः दु:ख सहन करून आपल्या प्रियतमाला मात्र सुख देतो , त्याचे सुख कशात आहे याचाच नेहमी विचार करतो. हीच प्रेमाची परिपक्व अवस्था आहे.
” जा मैं तनहा रहूं तुझको मेहफिल मिलें
डूबने दे मुझे तुझको साहिल मिलें “
     या अवस्थेतील प्रेमच खरे प्रेम आणि पवित्र प्रेम असते. असे पवित्र प्रेमच मानवाला परमेश्वराच्या निकट नेते. प्रेमाची व्याकुळता मानवाप्रती असो परमेश्वराप्रती , भावनेचे स्वरूप एकच असते. म्हणून खरे ” प्रेमी” नेहमी सामान्य मानवापेक्षा एका उच्च दिव्य अवस्थेत असतात. कारण त्यांचे जीवन प्रेम करता करता एका दिव्य एकरूप अवस्थेत गेलेले असते. हीच एकरूप अवस्था परमेश्वर प्राप्तीत भक्ताची असते. म्हणून अशा प्रेमींचे प्रेम हे परमेश्वराच्या चरणाशी वाहिलेल्या फुलांसारखे पवित्र असते.
तुझसे इश्क किया तू तो ना मिला , तेरी इबादत करते करते हम फकीर हो गये “
       अशा पवित्र प्रेमाचा सदैव आदर करावा , कधीही अपमान करू नये. खऱ्या प्रेमाचा जो अपमान करील त्याला निश्चितच परमेश्वरी कोपाला सामोरे जावे लागणार. “प्रेम “ ही परमेश्वराची देण आहे आणि या जगात परमेश्वराने जे दिले ते सर्व चांगलेच आहे.
” प्रेम की गंगा बहाते चलो “
डॉ. दत्ता हरकरे 
९८२२२२६६१५
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या