फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशप्रियंका रेड्डीजवळ बंदूक असती तर....

प्रियंका रेड्डीजवळ बंदूक असती तर….

Advertisements

समाजाला काेणाची गरज आहे?निर्भया,प्रियंकांची की बलातकाऱ्यांची ?

डाॅ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,३ डिसेंबर २०१९: हैदराबादमध्ये अवघ्या २४ वर्षीय युवतीसोबत जे घडले ते शब्दातही मांडता येणार नाही. संपूर्ण देशात या घटनेच्या विरोधात संतापाची लाट उसळली असली तरी ‘निर्भया’च्या घटनेनंतर पुन्हा अशी घटना एका मेट्रो-पोलिटीन शहरात घडते तेव्हा समाज मनाला आता ती घटना सुन्न करुन जात नाही तर ‘प्रक्षृब्ध’करुन जात असल्याचे चित्र आज दिसून पडतंय.

पत्रकार म्हणून नुकतेच एका खाजगी वाहीनीच्या चर्चासत्रात पॅनलिस्ट म्हणून आज सहभाग नोंदवला तेव्हा निवृत्त पोलिस अधिकारी, एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि सरकारी शाळेतील एक शिक्ष् क या इतर पॅनलिस्टच्या बोलण्यातून या घटनेमागील अनेक पदर उलगडले गेलेत. ‘निर्भया’च्या घटनेनंतर ७ वर्षांनंतरही तिच्या मारेकऱ्यांना अद्याप फाशी दिली नसल्याने ‘प्रियंका’घटनेतील आरोपी हे निर्ढावलेले असल्याचा सूर या चर्चेत उमटला,अर्थात दूर्देवाने हेच सत्य आहे. त्यामुळे आता देशातील ‘बेटी’कडून जर वयाच्या २४ सा व्या वर्षीच तिच्या जगण्याचा हक्क अश्‍या पद्धतीने हिरावून घेण्यात येत असेल तर अश्‍या क्रूरकर्म्यांना मारण्यासाठी या पुढे सरळ-सरळ तिच्या हाती बंदूक दिली गेली पाहिजे,कारण या देशातील समाज, समाजाची मानसिकता, या देशाची पोलिस यंत्रणा, या देशातील सरकार, या देशाची न्यायव्यवस्था आता देशातील ‘बेटींना’सुरक्षा पुरविण्यास सपशेल अपयशी ठरली असल्याचे सिद्ध झाले आहे,असा आक्रोश आणि एवढी पराकोटीची ‘निराशा’ देशभर उमटताना दिसतेय.

डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीत..देशाच्या राजधानीत एका निरपराध युवतीवर पाशवी बलात्कार होतो आणि संपूर्ण समाज मन या घटनेने सुन्न होतो. अनेक दिवस,महिने नराधमांना उघडपणे,सार्वजनिक स्थानावर फाशी द्या,ही मागणी तेव्हाच देशातील नागरिकांनी रेटून धरली होती,काय झाले त्याचे? एक अल्पवयीन गुन्हेगार ज्याने सर्वाधिक ‘क्रोर्य’निर्भयासोबत केले होते तो फक्त तीन वर्षांची शिक्ष्ा भोगून आता उजळ माथ्याने पुन्हा समाजात वावरतोय. एका गुन्हेगाराने आत्महत्या केली इतर पाच मात्र आजही..सात वर्षां नंतर देखील सरकारी ‘पाहूणे’म्हणून कारागृहात ‘जिवंत’आहे. मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर महिलांच्या विरोधात होणारे लैंगिक शोषण, हत्या,बलात्कारसंबधी कठोर कायदे केलेत.बाल लैंगिक अत्याचाराविरोधात ‘पोस्को’चा कायद्याही त्यांनी आणला मात्र बलात्कार थांबले का? नागपूरच्या पारडी भागात एका सहा वर्षांच्या अजाण बालिकेसोबत, जिला देहसुखाविषयी काहीही कळत नाही तिच्यासोबत त्या चाळीस वर्षांच्या नराधमाने काय केले? लोकांनी चोप दिल्यावर नागरिकांच्याच विरोधात कायदा हाती घेण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला कारण..कायदा हेच सांगतो! कायद्याची अंलबजावणी करणारे पोलिस प्रशासन आणि न्यायव्यवस्था हीच जर प्रभावी असती तर पुन्हा ‘प्रियंका’ घटना घडली असती का?

गाडी पंक्चर होणे हे फक्त निमित्त घडले…अंधाराला ते लेकरु घाबरलं…बहीणीला फोन केला..लगेच किती आशेने सांगितले..काळजी करु नको मला मदत मिळाली आहे.! आज हा समाज प्रश्‍न विचारतोय त्या क्ष् णी प्रियंकाकडे आत्मरक्षणासाठी बंदूक असती तर? त्या बंदूकीत गोळ्या भरल्या असत्या तर? तर…ते चार नराधम ज्यांना स्वस्थ,संस्कारी समाजामध्ये जगण्याचा कोणताही हक्क नाही ते जगले नसते पण जिचा काेणताही दोष नव्हता,फक्त ‘स्त्री’देह घेऊन समाजात वावरत होती त्या देहामुळे तिला अवघ्या २४ वर्षीच हे जग सोडून निघून जावे लागले असते का…!कोणाच्या भरवश्‍यावर ती समाजात वावरत होती?माणसांच्या समूहात जगत होती? पोलिस यंत्रणा किंवा न्यायव्यवस्थेच्या भरवश्‍यावर तिने किती मोठा दाव लावला होता याची साक्ष् तिचा अर्ध जळलेला मृतदेह नव्हता का देत?तो मृतदेह या समाजाला,या यंत्रणेला प्रश्‍नच विचरत होता… माझ्याकडे त्या क्ष् णी बंदूक असती तर? मी केले असते माझे आत्मरक्ष् ण….मला भरभरुन जगायचं होतं खूप…डॉक्टर व्हायचं होतं…!का नाही मोदी सरकारने कायदा केला मुलींना आत्मसरंक्ष् णासाठी आता बंदूक ठेवायची मुभा आहे,का नाही निर्भयाच्या मारेकर्यांना दयेची याचिका फेटाळून तात्काळ फाशीवर चढवण्यात आले?या ’का’मध्ये दररोज…सहा वर्षाची मुलगी..सहा महिन्याची मुलगी…युवती..तरुणी..महिला अगदी..आजीवरसुद्धा होणारे बलात्कार दडले आहेत.

पोलिस काय करतात तर हद्दी ठरवतात..गुन्हा अमूक हद्दीत घडला तिथे जा!सीसीटीव्ही कश्‍यासाठी आहेत तर गुन्हा घडल्यानंतर ‘पुरावा’म्हणून वापरण्यासाठी?का नाही त्या सीसीटीव्हीत अर्लाम सिस्टिीम होती जो गुन्हा घडण्यापूर्वीच एखादा पोलीस स्टेशनमध्ये वाजला? का एखाद्या शाळेच्या स्नेह संमेलनात शोळतील मुली मनोरंजनाचा निखळ आंनद घेऊ शकत नाही आहेत? नटून-थटून आले की शाळेबाहेरील टारगट मुले कसे त्यांना टार्गेट करतात,शाळेसमोर चक्क ‘पोलिस बंदोबस्त’लावण्याची वेळ येते याचा काय अर्थ आहे? शालेय जिवनापासूनच समाजातील ’मुली’या फक्त ’भोग्या’आहेत हेच बिंबवल्या गेल्याचं हे दिशादर्शक नाही का?पाशवी बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांमध्येही जेव्हा या देशात ‘धर्म’शोधला जातो तेव्हा वाटतं,असावी बंदूक निर्भयाच्या हाती..पोलिस स्टेशनमध्ये गुन्हेगाराला मारहाण केल्यास न्यायालयात हजर होताच न्यायाधीश गुन्हेगारालाच प्रश्‍न विचारतो,‘ तुला पोलिसांच्याबाबत काही तक्रार आहे का?’तेव्हा वाटंत असावी बंदूक निर्भयाच्या हाती..!अश्‍या या न्यायव्यवस्थेला आणखी किती निर्भया आणि प्रियंका रेड्डी हव्या आहेत डोळे उघडायला?

‘द सेकंड सेक्स’पुस्तकात जगप्रसिद्ध लेखिका सिमोन द बोव्हूआर लिहतेय देवाने स्त्री आणि पुरुष मिळूनच या सृष्टिची रचना केली आहे फक्त एक ‘अवयव’पुरुषाला देहाबाहेर दिला आहे आणि येथेच तो चूकला. या अवयवाचा दंभ पुरुष म्हणून पुरेसा नाही म्हणूनच झूंडीने तो हा पुरुषार्थ सिद्ध करतो..निर्भयाच्या वेळी ‘सात’होते,प्रियंकाच्या वेळी ‘चार’होते!अश्‍या पुरुषार्थासमोर काय करणार कराटेचे प्रशिक्ष् ण? त्यामुळेेच..तिच्या हाती आता फक्त बंदूक द्या…!

डॉक्टरांच्या पॅनलमध्ये चर्चा सुरु होती…न्यायव्यवस्थेने एकच करावं..गुन्हा सिद्ध झाला की फक्त एक इंजेक्शन टोचून देण्याची परवानगी द्यावी…बलात्कारी कायमचा नंपुसक झाला की सोडून द्या त्याला पुन्हा सभ्य समाजामध्ये..षंढ म्हणून जगण्याची शिक्षा द्या त्याला….त्यांना…अनेकांना..मात्र समाजातील ‘निर्भया आणि प्रियंका’ यांना वाचवा. या समाजाला निर्भयाची गरज आहे प्रियंकाची गरज आहे…झूंडीने बलात्कार करणारे गुन्हेगारांची नाही हे आता तरी माय-बाप सरकारला,न्याय यंत्रणेला कळणार आहे का? कुठे आहेत मध्यरात्री सर्वोच्च न्यायालायचे दरवाजे ठोठावणारे????

………………………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या