फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजप्रामाणिकपणे महामार्ग बांधला आता कुटूंबियांसह आत्महत्या करतो!

प्रामाणिकपणे महामार्ग बांधला आता कुटूंबियांसह आत्महत्या करतो!

Advertisements

मुंबईचे कंत्राटदार बिष्णू चरण माेहंतीचा इशारा

अकोला जिल्ह्यातील अकोट हिवरखेड तेल्हारा राज्य महामार्गाची केली दोन वर्षां पूर्वी निर्मिती

सुधीर कंट्रक्शनला मिळाले सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामांचे देयक मात्र, मोहंतीला सुधीर कंट्रक्शनने घातला चार कोटी दोन लाखांचा गंडा!

मजुरांची उधारी फेडण्यासाठी मुंबईतील दोन्ही घरे विकली,मुरुम,गिट्टीवाल्यांचे पैसे देण्यासही पैसे नाही:मोहंतीची उद्ववीग्नता

नागपूर,ता.११ मे २०२४: अकोला जिल्ह्यातील अकोट, हिवरखेड, तेल्हारा रस्त्याचे काम विष्णु चरण मोहंती यांना मिळाले होते.हे काम त्यांना नागपूरातील सुधीर कन्ट्रंक्शन कंपनीकडून मिळाले होते.प्रामाणिकपणे २०१९ ते २०२१ दरम्यान काम केले.अगदी लॉकडाऊनच्या काळात देखील मजुरांना घेऊन हा महामार्ग बांधला मात्र,कराराप्रमाणे महामार्गाचे पूर्ण काम करुन देखील सुधीर कन्ट्रक्शन कंपनीने मोहंती यांचे चार कोटी दोन लाख रुपयांची देयके अडवून ठेवल्याने आर्थिक परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की लवकरच अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागासमोर संपूर्ण कुटूंबियांसह आत्मदहन करण्याचा इशारा आज पत्रकार भवनात,पत्रकार परिषदेत मोहंती यांनी दिला.

या महामार्गासाठी मोहंती यांना एकूण ५ कोटींची कामे सुधीर कन्ट्रंक्शन कंपनीने दिली होती.यातील एक कोटी रुपये आगाऊ रक्कम देऊन काम सुरु करण्यास सांगितले.मोहंती यांनी उधारीवर रक्कम उभी करुन करारानुसार हा महामार्ग पूर्ण केला मात्र,उर्वरित चार कोटी दोन लाख रुपयांची रक्कम देण्यास सुधीर कंपनीचे मालक शरद व शिषीर खंडार हे टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

या बांधकामासाठी नातेवाईक,मित्र व सावकरांकडून कर्ज घेऊन रस्त्याचे काम पूर्ण केल्याचे ते सांगतात.या रस्त्याची मोजणी,स्थळ निरीक्षण,पंचनामा अश्‍या सर्व बाबी पूर्ण ेझाल्यानंतर देखील तब्बल दोन वर्षांपासून माझे देयक संबंधित कंपनी देण्यास टाळाटाळ करीत असल्यानेच मी नागपूरात पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी तसेच सहाय्यक अभियंता प्रवीण सरनाईक यांना वारंवार भेटून देखील निधी उपलब्ध करुन देतो असे कोरडे आश्‍वासन ते देतात.त्यामुळे माझ्यासह माझ्या कुटूंबियांच्या आत्महत्येसाठी अकोला येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे दोन्ही अभियंते तसेच सुधीर कंपनीचे शरद व शिषीर खंडार कारणीभूत राहतील,असा इशारा मोहंती यांनी याप्रसंगी दिला.
मोहंती यांनी अकोट,हिवरखेड,तेल्हारा महामार्गाचे १३ किलोमीटरचे काम पूर्ण केले.मोहंती यांची मुंबई येथे विष्णू इंटरप्राईजेस नावाने कंपनी असून ते १३०१,साई-सिद्धी अर्पाटमेंट विक्रोली,मुंबई येथील रहीवाशी आहेत.प्रो.शिपमध्ये मोहंती यांनी नागपूरच्या सुधीर कन्सट्रक्शन्ससोबत रस्ता डांबरीकरण करण्याचा कंत्राट केला.सुधीर कंपनीसोबत झालेले करारपत्र देखील याप्रसंगी मोहंती यांनी माध्यमकर्मींना दाखवले.माझ्यावर कर्जाचा डोंगर उभा झाल्याने मी माझे मुंबईतील दोन्ही घर विकून मजुरांचे पैसे फेडले मात्र गिट्टी व मुरुमवाल्यांना देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत.सुधीर कंपनीचे मालक तसेच अकोला सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन्ही अभियंते हे गेल्या दोन वर्षांपासून माझी देयके देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे मोहंती यांनी सांगितले.

साहित्य उधारीत देणा-या व्यापारांचे पैसे देणे बाकी असून बँकेने सुद्धा मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली असल्याचे ते म्हणाले.कंपनीकडून त्यांना त्यांच्या कामाचे देयक मिळाले नाही तर संपूर्ण कुटूंबियांसह आत्महत्या करणार व यासाठी संपूर्ण जवाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.सुधीर कन्सट्रक्शन प्रा.लि.कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २० कोटींचे काम मिळाले होते त्यातील ५ कोटींचे काम मी केले असल्याचे त्यांनी सांगितले.त्यातील फक्त १ कोटीचीच रक्कम त्यांना मिळाली आहे.

पोलिसांकडे गुन्हा का दाखल केला नाही?असे विचारले असता पोलिसांकडे तक्रार दिली असल्याचे त्यांनी सांगितले.मुंबईत रहात असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांकडे का गुहार केली नाही?असे विचारले असता,मंत्रालयात मी कोणालाही ओळखत नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या