फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजप्रसिद्ध अभिनेते संजय दत्‍त यांच्‍या हस्‍ते खासदार सांस्‍कृति‍क महोत्‍सवाचे उद् घाटन

प्रसिद्ध अभिनेते संजय दत्‍त यांच्‍या हस्‍ते खासदार सांस्‍कृति‍क महोत्‍सवाचे उद् घाटन

Advertisements

– प्रसिद्ध पार्श्‍वगायक सुखविंदर सिंग यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट ‘चक दे इंडिया’

– मध्‍य भारतातील सर्वात मोठ्या सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे व्‍हा साक्षीदार

नागपूर, १५ डिसेंबर: मध्‍य भारतातील सर्वात मोठा सांस्‍कृतिक उत्‍सव – खासदार सांस्कृतिक महोत्सव -२०२१ चा शानदार उद् घाटन सोहळा शुक्रवार, १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्‍यात आला आहे. ‘मुन्‍नाभाई’, ‘रॉकी’ अशा अनेक नावांनी चाहत्‍यांमध्‍ये लोकप्रिय असलेले बॉलिवुडचे प्रसिद्ध अभिनेते संजय दत्‍त यांच्‍या हस्‍ते खासदार महोत्‍सवाचे उद् घाटन होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आयोजन समितीचे अध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍यासह खासदार, आमदार व इतर अनेक मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून २०१७ साली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला होता. भारतीय कला व संस्‍कृतीचा प्रचार-प्रसार व्‍हावा, विदर्भातील प्रतिभावंतांना मोठा मंच मिळावा, राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीच्‍या कलाकारांची कला नागपूरकरांना अनुभवता यावी, या हा त्‍यामागील उद्देश होता.

कोविड महामारीमुळे दोन वर्षांच्‍या खंडानंतर परत एकदा खासदार महोत्‍सवाचे भव्‍य आयोजन करण्‍यात आले आहे. यावर्षी देश स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करीत असून त्‍याच संकल्‍पनेवर महोत्‍सवाची आखणी करण्‍यात आलेली आहे. मान्‍यवरांच्‍या उपस्‍थ‍ितीत खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे उद् घाटन झाल्‍यानंतर लगेच ‘चक दे इंडिया’ या थीमवर फिल्‍मफेअर अवॉर्ड विजेते पार्श्‍वगायक सुखविंदर सिंह यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ होणार आहे.

‘स्‍लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ या त्‍यांच्‍या चित्रपटाला आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर नावाजले गेले असून अॅकॅडमी आणि ग्रॅमी पुरस्‍कारही प्राप्‍त केले आहेत. ‘दिल से’ चित्रपटातील ‘छय्या छय्या’, ‘चक दे इंडिया’ चित्रपटातील ‘चक दे इंडिया’ या त्‍यांच्‍या गीतांनीही लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडले आहेत. सुखविंदर सिंह खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात देशभक्‍तीपर गीतांच्‍या माध्‍यमातून स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव धुमधडाक्‍यात साजरा करणार आहेत.

नागपूरकरांनी या दहा दिवसीय खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा पुरेपुर आनंद घ्‍यावा, असे आवाहन खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रा. अनिल सोले व पदाधिका-यांनी केले आहे.

घरबसल्‍या मिळवा पासेस
नागपूरकरांना या सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा आस्‍वाद घेता यावा, या उद्देशाने यंदा ऑनलाईन माध्‍यमातून घरबसल्‍या पासेस मिळवता येणार आहेत. त्‍याकरीता नागरिकांनी 9158880522 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यायचा असून एक डिजिटल लिंक तयार होईल. ही लिंक क्‍लीक केल्‍यानंतर कार्यक्रमाची पास घरबसल्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करता येईल.

कोविड नियमांचे होणार काटेकोर पालन-
खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात दरवर्षी होणारी गर्दी बघता यंदा कोविडच्‍या पार्श्‍वभूमीवर सरकारने त्‍यासंदर्भात घालून दिलेल्‍या सर्व अटी व नियमांचे पालक केले जाणार आहे. आपत्‍ती व्‍यवस्‍थापन समितीची त्‍यासाठी मदत घेतली जात असून आयोजनस्‍थळी दररोज ८ ते १० हजार N- 95 मास्‍क वितरीत केले जाणार आहे. दोन खुर्च्‍यांमध्‍ये सुरक्षित अंतर राखले जाणार असून पटांगणाच्‍या सहा प्रवेशद्वारांवर सॅनिटायझरची व्‍यवस्‍था राहणार आहे

पार्किंग व्यवस्था अशी राहील-
टू व्हीलर पार्किंग – संताजी सभागृह, संत रविदास सभागृह, ओसीडब्लू ऑफिस, प्रेरणा कॉलेज
फोर व्हीलर पार्किंग – संताजी सभागृह, ओसीडब्लू ऑफिस
व्हीआयपी पार्किंग – नागपूर सुधार प्रन्यास
शासकीय व पोलीस कर्मचारी वाहन – धन्वंतरी रुग्णालय

खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे वेळापत्रक-

शुक्रवार, १७ डिसेंबर : उद् घाटन व सुखविंदर सिंग यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट – चक दे इंडिया’
शन‍िवार, १८ डिसेंबर : ‘कैलाश खेर अँड कैलासा’ बँड लाईव्‍ह परफॉर्मन्‍स
रव‍िवार, १९ डिसेंबर : ‘कविसंमेलन’ सहभाग – कुमार विश्‍वास, विमल त्‍यागी, शिखा पचौरी, विनीत कुमार आणि शंभू चौधरी
सोमवार, २० डिसेंबर : काणेबुवा प्रतिष्‍ठानचा ‘व्‍होकल क्‍लासिकल अँड लाईट क्‍लासिकल’ कार्यक्रम
मंगळवार, २१ डिसेंबर : ‘नॉर्थ – साऊथ’ जुगलबंदी
बुधवार, २२ डिसेंबर : निराली प्रॉडक्‍शनचे ‘आम्रपाली’ महानाट्य
गुरुवार, २३ डिसेंबर : ‘संस्‍कृतिका उत्‍सव’ डॉ. सय्यद पाशा आणि चमूचा ‘डान्‍स ऑन व्हिल्‍स’
शुक्रवार, २४ डिसेंबर : ‘महाराष्‍ट्राची हास्‍य जत्रा’
शन‍िवार, २५ डिसेंबर : शंकर महादेवन यांचा ‘माय इंडिया… माय म्‍युझिक’ कार्यक्रम
रव‍िवार, २६ डिसेंबर : ‘राधारासबिहारी’ हेमामालिनी यांची नृत्‍यनाटिका

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या