फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजप्रश्‍नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेतर्फे राज्यस्तरीय बाल साहित्यिकांचा मेळा

प्रश्‍नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेतर्फे राज्यस्तरीय बाल साहित्यिकांचा मेळा

Advertisements

२३ व २४ जानेवरी रोजी आयोजन
मकरंद अनासपुरे,अनंत राऊत,नरहरी झिरवाळ यांची विशेष उपस्थिती
नागपूर,ता.२० जानेवरी : अनाथ,निराधार,शिकार करणा-या,भिक्षुकी करणा-या अशा फासेपारधी समाजाच्या मुलांची शाळा असलेल्या ‘प्रश्‍नचिन्ह आदिवासी आश्रमशाळे’[#Prashnachinha Adiwasi Ashramshala]मध्ये दिनांक २३ व २४ जानेवारी २०२५ रोजी पहिल्या राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनाचे अयोजन करण्यात आले असल्याची माहिती आश्रमशाळेचे संस्थापक व आदिवासी फासेपारधी समाजसेवक मतीन भोसले यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनाचे उद् घाटन सुप्रसिद्ध अभिनेते व समाजसेवक मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार आहे.संमेलनाध्यक्ष पदी सुप्रसिद्ध कवी व लेखक अनंत राऊत असणार आहेत.
याशिवाय उद् घाटन कार्यक्रमाला राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,ज्येष्ठ साहित्यिक दगडू लोमटे,‘चला हवा येऊ द्या ’या लोकप्रिय कार्यक्रमाचे लेखक अरविंद जगताप,युवा दिग्दर्शक मल्हार नाना पाटेकर,सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ,सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अरुंधती भालेराव आदींची विशेष उपस्थिती राहणार आहे.
संमेलनात राज्यभरातील शाळांमधील अनेक विद्यार्थी त्यांच्या स्वरचित कथा,कविता,पथनाट्य तसेच इतर साहित्य प्रकार सादर करतील.विशेष निमंत्रितांचे स्वागत,परिचय,मुलाखती आदी देखील प्रश्‍नचिन्ह आश्रमशाळेचे विद्यार्थी घेणार असल्याची माहिती या प्रसंगी मतिन भोसले यांनी दिली.ही स्पर्धा तीन गटात होणार असून,५ वी ते ८ वी पर्यंत दोन गट तर ८ वी ते १२ वी एक गट असे एकूण तीन गट सहभागी होणार आहेत.
या शिवाय विजेत्यांना पारितोषिक वितरण देखील प्रश्‍नचिन्ह आश्रमशाळेचे विद्यार्थी करणार असल्याची माहिती मतिन भोसले यांनी दिली.साहित्य,कविता,नाट्य,पथनाट्य इत्यादी विविध स्पर्धांचे परिक्षण करण्यासाठी ५ पर्यवेक्षकांची चमू नेमण्यात आली आहे.स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांद्वारे संगीताचे सादरीकरण हा वेगळा मनोरंजनाचा कार्यक्रम राहील,असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमा मागील उद्देश्‍य विशद करताना,प्रश्‍नचिन्ह आश्रमशाळेतील एकूण ४५८ मुलांना राज्यातील इतर शाळेतील विद्यार्थ्यांकडून प्रेरणा मिळावी,त्यांचा बौद्धिक विकास व्हावा तसेच त्यांचात मैत्री भाव निर्माण व्हावा,हा असल्याचे मतिन यांनी सांगितले.आजकालची पिढी ही ‘मोबाईल’लाच आपले आई-वडील मानणारी असल्याची खंत व्यक्त करीत मोबाईल पलीकडे देखील एक सुंदर विश्‍व असून,साहित्याचे एक जग असल्याची माहिती करुन देण्यासाठी हा कार्यक्रम राबवित असल्याचे ते म्हणाले.
याशिवाय २७ जानेवरी रोजी सर्वधर्म समभाव हे मूल्य घेऊन ग्रंथ दिंडी निघणार असून विविध धर्मातील संतांच्या वेशभूषा धारण करुन विद्यार्थी, ग्रंथ दिंडी काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हा कार्यक्रम प्रश्‍नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा,मंगरुळ चवाळा,ता.नांदगाव खंडेश्‍वर,जि.अमरावती येथे हाेणार असून राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमात सहभाग नोंदवण्याचे अावाहन याप्रसंगी मतिन भोसले यांनी केले.
याप्रसंगी नामशेग पवार,नुरदास भोसले,आधीन भोसले,रजित पवार आदी उपस्थित होते.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official you tube चॅनलवर बघू शकता)
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या