

नागपूर,ता. ८ मार्च: गेल्या वर्षी ६ मार्च २०२० रोजी मी स्थायी समिती अध्यक्ष् पदाची सूत्रे स्वीकारली. मात्र २२ मार्च रोजी संपूर्ण देशातच पहीला लॉक डाऊन घोषित झाला.१६ मार्च रोजी स्थायीची मी पहीली बैठक घेतली होती. प्रदीर्घ काळानंतर अनलॉक पहीला,दुसरा,तिसरा टप्पा सुरु झाला आणि पुन्हा अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली.आधीच्या अध्यक्ष्ापेक्ष्ा ऑक्टोबर महिन्यातच मी ५०० काेटींनी कमी अर्थसंकल्प दिला होता तरीही नाकर्त्या प्रशासनाने गेल्या एक वर्षात कोणताच प्रकल्प मार्गी लावला नसल्याचा संताप आज मावळते स्थायी समिती अध्यक्ष् पिंटू झलके यांनी मनपा मुख्यालयात आयोजित पत्र परिषदेत व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की आपल्या अर्थसंकल्पात त्यांनी आरोग्यवर विशेष लक्ष् दिले तसेच कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला होता.याशिवाय गेल्या वर्षी मंजूर झालेल्या कामांनाही सरसकट मंजूरी प्रदान करुन त्या सर्व प्रकल्पांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्याची प्रशासनाला सूचना ही केली होती.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाला ३०० कोटींचा विशेष निधी उपलब्ध करुन दिला होता त्यातील १३१ कोटी हे अद्यापही सुरक्ष्ति ठेवी मध्ये जमा आहेत.एकीकडे प्रशासन निधी नाही म्हणून ओरड करतो दूसरीकडे जनतेच्या सोयी सुविधांवर खर्च होण्यासाठी आलेला निधी आणि त्यावरील व्याज हे प्रशासन सुरक्ष्ति निधीतून काढण्यास धजावलीच नाही.
शहरात मनपाकडे पैसाच नाही असा समज आहे मात्र दुसरीकडे कोट्यावधीचा निधी तसाच पडून असल्याचे चित्र आहे.माझ्या कारकीर्दीत अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचा मी प्रयत्न केला.काही सुरु झाले काही सुरु होतील.लवकरच २० कोटींच्या कामांनाही अनुमती मिळेल,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
माझ्या कारकार्दीतील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे कोविड काळात निर्माण झालेल्या प्रचंड बेरोजगारीमुळे अनेकांच्या या महामारीत नोक-या गेल्या त्यामुळेच पाणी करावरील मी ‘अभय योजना’राबविली.काही प्रमाणात ती यशस्वी पण झाली पण प्रशासनाचे प्रयत्न हे अपूरे पडले.याशिवाय गांधी सांगर तलावाचे,सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.अंबाझरी तलाव,संविधान चौकाचे सौंदर्यीकरण हे देखील लवकरच पूर्ण होणार असून नवीन अध्यक्ष् लवकरच त्याचे लोकापर्ण करतील,असे ते म्हणाले.
अर्थसंकल्पात लोकहिताच्या ज्या गोष्टी मी पूर्ण करु शकलो नाही ते प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे घडले.प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच मी अत्यंत महत्वाचे प्रकल्प पूर्ण करु शकलो नाही,अशी स्पष्टोक्ती देत याचे शल्य कायम असणार आहे,असे ते म्हणाले.
यात चालता फिरता दवाखाना,याशिवाय नागपूर शहरात ब-याच ठिकाणी असलेले अतिक्रमण किवा नागरिकांचे नळ कनेक्शन कापण्याचा प्रशासनाने राबविलेला निर्णयामुळे निर्माण होणा-या समस्यांवरील उपाय,मनपाचे स्वतंत्र पोलीस ठाणे,कोविडमुळे होणा-या मृत्यूमुळे दहा झोनमध्ये दहा शीतपेट्या देण्याची तरतूद मी अर्थसंकल्पात केली होती मात्र नागपूरकरांना ज्या सोयी मिळणे गरजेचे होते ते प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शक्य झाले नाही,असा घणाघाती आरोप झलके यांनी याप्रसंगी केला.
मी पदभार स्वीकारला तेव्हा शहरात करोनाने उच्चांक गाठला होता.५ मार्च २०२० रोजी मनपाच्या मालमत्ता कराची रक्कम होती २१६ कोटी ती ५ मार्च २०२१ रोजी २२४ कोटी झाली याचा अर्थ ८ कोटींची वाढ ही माझ्या काळात झाली.
एलबीटीची रक्कम होती ३.३२ कोटी ती ५.२७ कोटी झाली.स्थावर विभागाची रक्कम होती ३.१० कोटी ती ४.३६ कोटी झाली.बाजार विभागाची रक्कम होती ५.५९ कोटी ती २.११ झाली कारण कोविडच्या काळात शहरातील बाजारच बंद होते.जाहीरात विभागाची एकूण आय होती २.१३ ती २.३७ कोटी झाली.जलप्रदाय विभागची अाय होती १३०.७६ ती १४३.१४ झाली याचा अर्थ १२.३८ कोटींनी अधिक.सर्वात जास्त नुकसान नगर रचना विभागात झाले.३१ मार्च २०१० पर्यंतची या विभागाची आय होती १९३.४७ ती ३१ जानेवारी २०२१ पर्यंत निव्वळ ४०.११ झाली.गुंठेवारीतून या विभागाला ४२ कोटी प्राप्त झाले होते ती आता फक्त १३ कोटी एवढी आहे.एकमेव नगर रचना विभाग सोडल्यास सर्व विभागाने उत्तम कामगिरी केली असल्याचा निर्वाळा देत नगर रचना विभागाने कुठलीही कामगिरी केली नाही असा माझा सरळ आरोप आहे,असे ते म्हणाले.
नगर रचना विभागाच्या अत्यंत ढिसाळ कारभारासाठी कारण म्हणजे अनेक चांगल्या अधिका-यांचा बदल्या केल्या गेल्या.ज्यांना साधा प्रस्ताव तयार करता येत नाही ,अश्या अधिका-यांना या विभागात अाणून बसवल्या गेलं.झोनमधील अनुभव नसलेली माणसे आणून बसवली गेली,असा आरोप त्यांनी केला.
महापौर दयाशंकर तिवारी म्हणतात प्रशासनासोबत समन्वयाने कामे होऊ शकतात,तुम्ही समन्वय नाही साधला का?असा प्रश्न विचारला असता मी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला मात्र जिथे जिथे अर्थकारण आले तिथे तिथे प्रशासनाने सतत आडकाठी आणली असल्याचे ते म्हणाले.




आमचे चॅनल subscribe करा
