फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजप्रशासनाच्या अपयशातून सात मृत्यू भाजप मंत्र्याच्या लेखी ‘घंटा’

प्रशासनाच्या अपयशातून सात मृत्यू भाजप मंत्र्याच्या लेखी ‘घंटा’

Advertisements
इंदूरच्या घटनेवर एनडीटीव्हीच्या पत्रकाराची सडेतोड भूमिका

माध्यमातील बदनामीनंतर कैलास विजयवर्गीयांना ‘उपरती’:केली खंत व्यक्त
वाचाळवीर विजयवर्गीयाच्या लेखी बलात्कार पिडीतांचा मृत्यू ‘बलिदान!’
विजयवर्गीयाच्या पूत्राची शासकीय अधिका-यालाही बेदम मारहाण!
अमित शहांचे ‘खास‘सर्वात बदमाश!समाज माध्यमातील टिका
नागपूर,ता.२ जानेवरी २०२६:  देशात एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल आठ वेळा सर्वात स्वच्छ शहर म्हणून नामांकन मिळवणा-या मध्यप्रदेशच्या इंदूर शहरातील भागीतरथपुरा भागात दूषित पाणी प्यायल्यामुळे शंभरच्या वर नागरिकांना अतिसार अन् उलट्यांचा प्रादुर्भाव होऊन यातील पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची दूर्दवी घटना घडली.महत्वाचे म्हणजे मध्यप्रदेशचे नगर विकास मंत्री व देशाचे गृहमंत्री अमित शहांचे अत्यंत लाडके असलेले नेते कैलाश विजयवर्गीय यांना एनडीटीव्हीच्या पत्रकाराने यावर प्रश्‍न विचारला असता त्यांनी चक्क  ‘फोकट का सवाल मत पूछो’,असे उर्मट उत्तर दिले,यावर पत्रकाराने हा फोकटचा प्रश्‍न नही,मैं वहा गया था,असे म्हणताच, ’छोडो यार क्या घंटा गया?असे उन्मत उत्तर देऊन त्यांच्याच मंत्रालयातील प्रशासनाचे अपयश झाकण्यासाठी या दूर्देवी मृत्यूंना चक्क ’घंटा’ठरवले!
यावर एनडीटीव्हीच्या पत्रकाराने त्यांना ’तमीज से बात करने ’चा सल्ला दिला.हा व्हिडीयो सध्या सर्व समाज माध्यमात प्रचंड व्हायरल झाला आहे.यानंतर विजयवर्गीय यांना उपरती झाली व त्यांनी चार ओळींचे निवेदन खरडून आपल्या उन्मत व उर्मटपणाची इतिश्री मानली.कैलास विजयवर्गीय हे केंद्रातील अमित शहांचे खासमखास असून त्यांना केंद्राच्या राजकारणातून मध्यप्रदेशच्या विधानसभेच्या निवडणूकीत आमदाराकीची निवडणूक लढण्याची सूचना झाली तेव्हा ते प्रचंड अस्वस्थ झाले होते.मात्र,केंद्राच्या शीर्षस्थांसमोर डाळ न शिजल्याने त्यांनी आमदारकी लढवली व जिंकून ही आले.त्या काळी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार अशी सर्वांना खात्री असताना,नेहमीसारखाच धक्कातंत्राचा वापर करीत मोदी-शहांनी कोणाच्याही खिजगणतीत नसणारे संतोष यादव हे नवखे नाव मुख्यमंत्री पदासाठी निवडले.
सुरवातीला दूषित पाणी पिऊन मृत्यू पावलेल्या मृतकांना शासनाने घोषित केलेल्या रिफंडचा निधी अद्याप मिळाला नसून अजून देखील दूषित पाण्याचा प्रश्‍न सूटला नाही,असा प्रश्‍न या पत्रकाराने केला,यावर कैलास विजयवर्गीय यांनी ’छोडो यार फोकट का प्रश्‍न मत पुछो’असे उर्मट उत्तर दिले,यावर ’हा फोकटचा प्रश्‍न नही है’असे पत्रकाराने म्हणताच या पत्रकाराने ’मी तिथे जाऊन आलो आहे’असे म्हणताच ’क्या,क्या,क्या घंटा होकर आया तू’असे अरेरावीचे उत्तर दिले.यावर संतप्त होऊन पत्रकाराने ’शब्दो का चयन ठिक से किजीये,आप ढंग से बात नही कर रहे है,ये क्या शब्द होता है,घंटा,घंटा क्या शब्द होता है,लहजा सुधारने को कहीये,इतने सिनीयर मंत्री है,घंटा,घंटा क्या बोलते है,बात करने की तमीज नही है’असे खडे बाल सुनावले.
यावर विजयवर्गीय यांचा एक निष्ठावंत, पत्रकाराला दमदाटी करण्यासाठी पुढे येत,‘वो हमारे लीडर है’असे म्हणताना या ५३ सेंकदच्या व्हिडीयोमध्ये दिसून पडतो,यावर पत्रकार पुन्हा चिडून,‘तो क्या हूअा?हम पुछे नही क्या सवाल?हमने गाली दि है क्या?जाओ अपना काम करो’असा सज्जड दम त्या निष्ठावंताला देताना दिसून पडतो.
कैलास विजयवर्गीय सारख्या इतक्या मोठ्या नेत्याची भाषा ऐकून समाजमन चांगलेच संतप्त झाले व विविध समाज माध्यमात ते प्रचंड ट्रोल झाले.यानंतर त्यांना उपरती झाली व माझ्याकडून चूकून अशा भाषेचा प्रयोग झाल्याचे सांगून मी व माझे प्रशासन गेल्या दोन दिवसांपासून या आपदेत सतत जागून काम करीत आहोत,माझी झोप झाली नाही आहे.दूषित पाणी से मेरे लोक पिडीत है,कुछ हमे छोड कर चले गये है,ईसी अवस्था में मिडीया के एक प्रश्‍न पर मेरे शब्द गलत निकल गये इसके लिये मैं खेद प्रकट करता हूं,लेकीन जब तक मेरे लोक पुरी तरह से सुरक्षीत और स्वस्थ नही होते,मैं शांत नही बैठूंगा!‘अशी मखलाशी‘ एक्स’ वर केली.
मात्र,या पूर्वी देखील त्यांनी अनेकदा अशीच वादग्रस्त विधाने ‘बिंदास’केली आहे कारण काहीही झालं तरी ते शहा यांच्या खास मर्जीतले असल्याने कोणी त्यांचे काहीही वाकडे करु शकत नाही,असा ‘माज’त्यांना आलेला दिसून पडतो.तसेही भाजपला ते कसेही वागलेत तरी जनतेला ’घंटा’फरक पडत नाही,जनता पुन्हा पुन्हा त्यांनाच निवडून देणार आहे,या माजोरेपणात ते असतात.ज्या इंदूरमध्ये आमदार,खासदार,नगरसेवक,महापौर भाजपचेच आहे त्या शहरात इतकी मोठी दुघर्टना घडते.चक्क दूषित पाण्यातून इतक्या जणांचा मृत्यू होतो,महत्वाचे म्हणजे सहा ते सात दिवसांपूर्वी ही घटना घडते तरी देखील कोणावरही दोषारोपण करीत कारवाई केली गेली नव्हती,एका ही अधिका-याला किवा लोकप्रतिनिधीला इतक्या अमूल्य जीवांचे कोणतेच मोल वाटले नाही.मात्र,ज्यावेळी हा व्हिडीयो व्हायरल होतो तेव्हा संपूर्ण देशाला भाजप सरकारची ही मुजोरी आणि जनतेप्रतिची बे-फिकरी कळते.
भीगीरथपुरा येथील एका पोलिस ठाण्याच्या बांधकामात शौचालयातील पाईप लाईन लीकेज होऊन स्थानिकांच्या पिण्याच्या पाण्यात मिसळली व त्यामुळे हे दूषित पाणी पिऊन १६० लोकांना अतिसाराची लागण झाली.त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यातील सहा दिवसात १५ लोकांचा मृत्यू झाला,यातील अनेक अतिदक्षता विभागात उपचार घेत होते.यात अनेक लहान बालके व स्त्रिया आहेत.प्रशासनाच्या इतक्या मोठ्या हलगर्जीपणावर भाजपचा इतका माेठा मंत्री पत्रकाराच्या संवेदनशील प्रश्‍नावर ’घंटा’म्हणून उत्तर देतो!महत्वाचे म्हणजे ज्या भगीरथपुरा मध्ये ही घटना घडली तो भाग कैलास विजयवर्गीय यांच्याच मतदारसंघातील असून तेच राज्याचे नगर विकास मंत्री आहेत!मध्यप्रदेशच्या घटनेत स्थानिकांनी जरी पंधरा मृत्यू झाल्याचा आरोप केला असला तरी मध्य प्रदेश सरकारचे आकडे न्यायालयात फक्त चार मृत्यू सांगत आहेत !
कैलास विजयवर्गीय हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी व वर्तवणूकीसाठी नेहमीच चर्चेत राहीले आहे.मूळात या महान मंत्र्याची प्रवृत्ती ही गुंडशाहीची असून यांच्या मुलाने एका शासकीय अधिका-याला केलेली मारहाण ही घटना देखील सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली होती.

या पूर्वी ऑस्ट्रेलियन क्रीकेट संघासोबत मॉलिस्टेशनची घटना घडल्यावर हे महनीय सांगतात की त्यांच्या संघाने प्रशासनाला ही बाब सांगायला हवी होती याशिवाय ज्या बलात्कार पिडीत महीलांची हत्या होते त्याला ते ‘बलिदान’म्हणून संबोधतात.इतिहासात देखील असे बलिदान महिलांने दिले आहे,असे ज्ञान ते अज्ञानातून पाजळतात,यावरुन त्यांच्या वृत्तीची साक्ष पटते.लोकप्रतिनिधी म्हणून अश्‍या प्रवृत्तीच्या नेत्यांना संवैधानिक जवाबदारी कळणे दुरापस्त असून, पोलिस सुरक्षेत समर्थक,चाटूकार व लाभार्थ्यांच्या गोतावळ्यात फिरणा-यांची यादी भाजपमध्ये फार मोठी आहे.गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीची जबाबदारी शाह यांनी याच महान नेत्यावर सोपवली होती,हे विशेष! महत्वाचे म्हणजे,या नेत्यांच्या कपाळावर हिंदू धर्माचा टिळा असतो,मात्र….?
एनडीटीव्ही म्हणजे ज्या वृत्त वाहीनीची मालकी मोदी यांचे खासमखास उद्योगपती गौतम अदानीकडे आहे त्या वृत्तवाहीनीच्या पत्रकाराने अत्यंत धाडसाने या मंत्र्यांची बोलती बंद केली. इतक्या मोठ्या सत्ताधारी नेत्यासमोर एनडीटीव्हीचा पत्रकार अनुराग द्वारी यांनी जो संताप व्यक्त केला याचे ही कौतूक झालेच पाहिजे.मिडीयाचे नेमके उत्तरदायित्व काय आहे हे गेल्या ११ वर्षात खरा माध्यमकर्मी विसरला आहे,यात शंका नाही.
अलीकडेच ‘रिपब्लीकन भारतचे ’संचालक व संपादक अर्णव गोस्वामी यांची देखील ‘भाजपई’ झूल उतरलेली दिसून पडतेय,ते देखील पंतप्रधान मोदी यांना थेट प्रश्‍न विचारताना दिसून पडत आहे.या मागे जरी जाहीरातींचे अर्थकारण दडले असले तरी निश्‍चितच हे चित्र ख-या भारतीयांसाठी सुखावह आहे.
…………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या