

फेब्रुवारीपासूनच विमानतळावर स्क्रिनिंग का नाही?
नागपूर: ‘करोना विषाणू’च्या प्रसाराची तिसरी स्टेज उलटल्या गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही लक्षात याची भयाणता आली असून त्यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे कळकळीचे आव्हान केले आहे. या विषाणूचा प्रसार संसर्गजन्य असल्यामुळे तो परदेशातून आलेल्या प्रवाश्यांच्या माध्यमातून नागपूर शहरात देखील झपाट्याने पसरत आहे. महत्वाचे म्हणजे नागपूरात फेब्रुवारी महिन्यातच करोना संशयित आढळ्यापासून विमानतळावर तेव्हाच परदेशी नागरिकांची स्क्रिनिंग प्रशासनाने का केली नाही?असा सवाल आता उपस्थित केल्या जात आहे.आजही प्रशासनाकडे फेब्रुवारी महिन्यात परदेशातून आलेल्या प्रवाश्यांची माहिती नसल्याचे सांगितले जात आहे.
हे परदेशी नागरिक करोना विषाणूची लागण घेऊन स्वस्थ समाजामध्ये नकळत मिसळले. त्यामुळे या संसर्गाचा धोका कितीतरी पटीने वाढला,परिणामी प्रशासन आता खडबडून जागे झाल्याचे दृष्य दिसत आहे.नागपूरात आज दि. २१ मार्च सायंकाळपर्यंत एकूण संशयितांची संख्या २४७ एवढी झाली असून २१ मार्च या एकाच दिवसात ३५ संशयितांची नोंद झाली आहे. एकूण १४८ संशयित रुग्णालयात भर्ती आहेत.एकूण १५६ रुग्णांचे नमूने आजच्या तारखेपर्यंत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.यात ४ हे पॉझिटिव्ह निघाले.पाठपुरावा सुरु असणारे एकूण ७२९ व्यक्ति असून १४ दिवस पाठपुरावा केलेल्या संशयितांची संख्या ही ३५ झाली आहे.
विमानतळावर स्क्रिीनिंग केलेल्या प्रवाश्यांची संख्या ११०५ झाली असून अलगीकरण केलेल्यांची संख्या २० आहे. सध्या अलगीकरण कक्षात ६३ प्रवासी असल्याचा आकडा प्रशासनाकडून जाहीर झाला . याला ’उशिरा आलेली जाग’ असेच म्हणावे लागेल. परदेशातून आलेले संक्रमित हे विदर्भात व शहरात चांगलेच मिसळले आहेत.१४ दिवसांचा विषाणूच्या सुप्ततेचा काळ असतो,या काळात कोणतीही लक्ष् णे दिसत नाही,हाच सर्वाधिक धोकादायक काळ प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात लक्षात घेतला असता व विमानतळावरुनच प्रत्येक प्रवाश्याची रवानगी आयसोलेशनमध्ये केली असती खबदारी म्हणून तर करोनाचा धोका कितीतरी पटीने कमी झाला असता मात्र ती वेळ आता निघून गेली असून करोना संक्रमणाची तिसरी स्टेज आपण पार केली असल्याचे आता प्रशासनच सांगत आहे.
परिणामी चौथ्या स्टेजचं गांर्भीय आता कुठे प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृतीवर भर दिल्या जात आहे. एवढंच नव्हे तर नागपूर शहर ३१ मार्च पर्यंत‘लॉक डाऊन’करण्यात आले. तरी देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे गंभीर परिणाम हे पुढच्या १४ दिवसांनंतर लक्षात येणार असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर वैद्यकीय क्षेत्रातील एका खाजगी डॉक्टरने सांगितले आहे.
शहरात कर्फ्यू लावण्यात आला असून कलम १४४ लागू करण्यात आली,नागरिकही मोठ्या प्रमाणात प्रशासनाला सहकार्य करीत आहे ही जमेची बाजू असली तरी संसर्गितांची संख्या मात्र पुढील काळात झपाट्याने वाढणार असल्याचे सांगितले जात आहे,याला एकमेव कारण म्हणजे प्रशासनाने वेळीच खबरदारीची उपाययोजना अंमलात आणली नाही. ‘करोना’हा विषाणू काही वस्तीतून किवा झोपडपट्टीतून संक्रमित झाला नाही तर तो परदेशी नागरिकांनी शहरात संक्रमित केला..त्यांच्या संपर्कात नकळत जे आले त्यामुळे ही संख्या झपाट्याने वाढत जात आहे,आता याला रोखण्याचा एकमेव उपाय म्हणजे,नागरिकांना घरातच सुरक्षित ठेवणे हेच आहे.
१०८ क्रं.च्या रुग्णवाहिकेचे र्निजंतुकीकरण केले जात आहे का? नागरिकांना असंख्य प्रश्न पडले आहेत. ज्या मनपाच्या किवा १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून संशयितांना मेडीकल,मेयोमध्ये भर्ती करण्यास घेऊन जात आहे,त्या रुग्णवाहिकेचे र्निजंतुकीकरण केले जात आहे का?दिवसातून किती वेळा केले जात आहे?ज्या आमदार निवासात परदेशी नागरिकांना १४ दिवस सक्तीच्या आयसोलेशनमध्ये ठेवले जात आहे,ते घरी निघून गेल्यावर आमदार निवासातील त्या खोल्यांचे तरी र्निजंतुकीकरण केले जात आहे का?केले जात असल्यास त्याचे व्हिडियो माध्यमांना का उपलब्ध केले जात नाही?किवा पत्रकारांना योग्य ती काळजी घेऊन प्रात्यक्षिक का दाखवले जात नाही?
नुकतेच मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात सक्तीच्या विजनवासात ठेवण्यात आलेल्या एका परदेशातून आलेल्या वकील नागरिकाने मुंबई उच्च न्यायालया त अर्ज दाखल केला असून या रुग्णालयात घूशी व उंदीर असल्याचे सांगितले.याशिवाय जेवणाचा स्तर देखील निम्न असल्याची तक्रार केली आहे.नागपूरच्या मेयो,मेडिकल रुग्णालयात ज्या करोना बाधितांसाठी वेगळे सुसज्ज वॉर्ड ठेवण्यात आले आहेत,त्यांची काय दशा आहे?तिथे प्रशासनातर्फे कोणालाही परवानगीशिवाय जाण्याची मुभा नाही,अश्या वॉर्डांचे प्रात्यक्षिक योग्य ती खबरदारी घेऊन पत्रकारांना का दाखवली जात नाही?विशेष म्हणजेे जे रुग्ण आज मेयो,मेडिकलमध्ये करोना संसर्गाची धास्ती घेऊन जात आहेत त्यांच्यासाठी प्रशासनाने कोणती वेगळी व्यवस्था केली आहे?
त्यांना वेगळ्या रंगाची स्लीप इश्यू केली का?त्यांच्यासाठी मेडीकल व मेयाेमध्ये वेगळे काऊंटर ठेवण्यात आले का?मेडीकल व मेयाेच्या प्रवेशद्वारावर करोना संशयितांसाठी दिशा-दर्शक फलक लावण्यात आले आहेत का? हे संशयित अद्यापही सरळ अनेकांना कुठे जाऊ?कोणाला भेटू असे प्रश्ना विचारताना आढळतात, मग योग्य ठिकाणी पोहोचतात,यामुळे किती नागरिकांना बाधा होण्याची शक्यता वाढली असावी?शहरभर हिरव्या रंगाचे नामफलक अमूक अमूक ठिकाणचे झळकतात मात्र करोनासारख्या गंभीर रोगाविषयी भर्ती होण्यासाठी माहिती घेण्यासाठी करोना संशयितांसाठी दोन्ही रुग्णालयात कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याचे सांगितले जात आहे,यावरुन प्रशासन अद्यापही किती जागृत झाले अाहे याची झलक पहायला मिळते.
राजकीय नेते,मंत्री व प्रशासन आता फक्त दररोजची करोना बाधितांची आकडेवारी सादर करणे व जनजागृतीपर उपक्रमांची माहिती देण्यासाठीच पत्र परिषदा घेत असल्याचे चित्र शहरवासी बघत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री यांच्यापासून तर विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त,राज्याचे नागपूरातील मंत्री,महापौर,इतर नेते हे आता आक्रमकतेने स्टेज ४ रोखण्यासाठी गांर्भियाने कामाला लागले अाहेत. कारण पुढील १४ दिवसानंतर कदाचित याची भीषणता लक्षात येणार आहे. ही खबरदारीची पाऊले प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यातच उचलली असती आणि परदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाश्याला सक्तीने आयसोलेशनमध्ये भर्ती केले असते तर हा धोका कितीतरी पटीने रोखता आला असता,असे म्हटले जात आहे.
दूर्देवाने आताही विमानतळावर हातावर शिक्का मारुन घर बंदी असणारे अनेक नागरिक हे त्यांच्या भागात खूलेआम सामान्य नागरिकांमध्ये मिसळत असल्याची घटना मनीष नगरमध्ये समोर आली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना ही तक्रार प्राप्त होताच त्यांनी तातडीने कारवाई करत पोलिसांच्या मार्फत एकाला आमदार निवासात सक्तीने भर्ती केले तर दूस-याची चौकशी सुरु आहे. याचा अर्थ करोना संक्रमणाचा धोका हा किती धोकादायक आहे नागरिकांना याची जाणीवच झाली नाही,याचेच हे उदाहारण आहे.
करुणा कपूर या गायिकेच्या हलगर्जीपणाने करोनाचा संसर्गाचा धोका अगदी संसदेपर्यंत पाहोचवला असताना नागपूरात अद्यापही नागरिकांध्ये या संसर्गाविषयी हवी जशी जनजागृती झाली नाही,याचेच हे उदाहरण आहे.विमानतळावरुन ६२ पैकी ५९ परदेशातून आलेल्या नागरिकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला मात्र ३ हे लापता झाले असल्याची माहिती मिळाली आहे. ते ३ प्रवाशी करोनाग्रस्त असल्यास याचे भयंकर परिणाम स्वस्थ समाजालाच भोगून द्यावे लागणार आहेत.
एक संसर्गिंत पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांना संसर्गित करु शकतो याचे उदाहरण नुकतेच इटली या देशात बघायला मिळाले.फेब्रुवारी महिन्यात इटलीत देखील भारतासारखीच करोनाग्रस्तांची संख्या ही ३७ असताना मार्च महिना उजाडताच ५,००० लोकांना संसर्ग झाल्याचे इटलीत निर्दशनास आले.यावरुन या विषाणूची भयाणता सिद्ध होते.म्हणूनच नागरिकांनी आतातरी प्रशासनाला सहकार्य करावे व सर्व सूचनांचे पालन करणे हेच नागरिकांच्या हिताचे उरले आहे,असेच म्हणावे लागेल.




आमचे चॅनल subscribe करा
