फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजप्रवीण दटके इनकाे गुस्सा क्यो आता है?

प्रवीण दटके इनकाे गुस्सा क्यो आता है?

Advertisements

सभेत उपस्थित केलेला प्रश्‍न घेतला मागे

नागपूर,ता. ८ सप्टेंबर: नागपूर शहरात किती आऊटडोर जाहीरातींच्या होर्डींग्ज लागलेल्या आहेत?त्यात मनपाचे किती खासगी कंपन्यांचे किती तसेच व्यवसायिक विविध आकाराचे शॉप बोर्ड व होर्डींग्ज हायकोर्टाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार आहेत का?या धोरणानुसारच जाहीरातींना परवानगी देण्यात आली आहे का?याशिवाय हे होर्डिंग्ज लावताना ना-हरकत प्रमाणपत्रांची पुर्तता करण्यात आली आहे का?तसेच जाहीरात विभागाच्या इतर कामांबाबत सभागृहात घेण्यात येणा-या निर्णयाबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी माजी महापौर व भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी आजच्या मनपाच्या सभेत नोटीस दिली होती.मात्र या मुद्दावर उत्तर देण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी कर विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांना सांगताच दटके यांचा पारा चढला व आयुक्तांकडे कोणत्याही प्रश्‍नावर उत्तर देण्यासाठी एकमेव कर्तुत्वान अधिकारी मेश्रामच आहेत का?असे म्हणत मेश्राम हे जर उत्तर देणार असतील तर मी माझा प्रश्‍नच परत घेतो,असे म्हणत दटके यांनी आपला प्रश्‍न परत घेतला.

सभेनंतर ‘प्रवीण दटके इनको गुस्सा क्यो आता है?‘अशी चांगलीच चर्चा मनपात रंगली.दटके यांनी माझ्या नोटीसवर प्रशासनाकडून मला लिखित उत्तर मिळाले आहे मात्र त्या उत्तराने मी समाधानी नसल्याचे सांगितले.गेल्या ५ वर्षांपासून जाहीरातदारांकडे मनपाची थकबाकी आहे,याबाबत हायकोर्टानेही नियमावली लागू केली आहे,त्या अनुषंगाने या नियमावलीचे उल्लंघन करणा-या जाहीरातदारांवर काय कारवाई केली असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला होता.

यावर  उपायुक्त मिलिंद मेश्राम यांना आयुक्तांनी उत्तर देण्याची सूचना केली,यावर दटके यांनी मेश्राम हे कोणत्या अधिकाराने उत्तर देणार आहेत,अशी विचारणा करता मेश्राम यांच्याकडे नुकतेच जाहीरात विभागाचा देखील कार्यभार देण्यात आल्याचे मेश्राम यांनी सांगताच दटके यांचा पारा चढला.

मेश्राम यांनी मुरलेल्या नोकरशाहीप्रमाणे, अटी व शर्थीचे पालन न केल्यास कलम २२५ प्रमाणे जाहीरात काढून टाकण्याचे अधिकार आहेत तर मनपाच्या ४३९ अधिनियमाप्रमाणे मालमत्ता कराबाबत जसा थकीत कर वसूल केला जाताे त्याचप्रमाण जाहीरातदारांकडून कर वसूल करण्याचे प्रावधान असल्याचे सांगितले.

यावर सत्ता पक्ष् नेते अविनाश ठाकरे यांनी मुद्देसूद उत्तर द्या,कायदा काय सांगतो हे नका सांगू तर गेल्या ५ वर्षांपासून कारवाई काय केली ते सांगा,अशी विचारणा केली.यावर महापौरांनी प्रशासनाला मुद्देसूद उत्तर देण्याचे निर्देश दिले असता मेश्राम यांनी अतिक्रमण विभागाकडून सहायता मागण्यासाठी पत्र दिले असून त्यांना माणसे उपलब्ध करुन देण्याची विनंती केली असल्याचे नेहमीसारखेच ‘गोलमोल’उत्तर दिले.अशी चमू उपलब्ध होताच नियम न पाळणा-यांच्या जाहीराती काढण्यात येतील,असे मेश्राम म्हणाले.

यावर हा विभाग मेश्राम यांच्याकडे गेला असता यांच्याकडून कुठल्याही प्रश्‍नाच्या समाधानकारक उत्तराची अपेक्ष्ा ठेवणे निरर्थक असल्याचा त्रागा दटके यांनी व्यक्त केला व आपला प्रश्‍न मी मागे घेतो,माझा प्रश्‍न मागे घेण्यात यावा अशी विनंती महापौरांना केली.यावर अविनाश ठाकरे यांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला असता दटके यांनी अविनाश ठाकरे यांना न बोलण्याची विनंती करीत आता आयुक्तांना ‘याच’ अधिका-यांचे शेल्टर घेण्याची वारंवार गरज वाटत असल्याची परखड टिका करीत मेश्राम यांच्या कर व संकलन विभागात कोट्यावधीचे गौडबंगाल झाल्याचे जाहीर असताना पुन्हा हा देखील विभाग ‘परम श्रद्धेय ’मेश्राम यांच्याचकडे दिल्या जातो,यानंतर मला आता काहीच बोलायचे नसल्याचे दटके म्हणाले.

यावर महापौरांनी दटके यांनी त्यांचा प्रश्‍न का परत घेतला त्यांच्या नाराजी विषयी मला माहिती नाही पण त्यांनी उपस्थित केलेला विषय गंभीर असल्याचे सांगितले.एकीकडे मनपाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण सांगून विकास कामे थांबवली जातात,दूसरीकडे महसूल मिळवून देणा-या जाहीरात विभागाकडून गेल्या ५ वर्षांपासून नियमबाह्य जाहीराती लावणा-यांवर दंडच लावला जात नाही.एकीकडे महसूल विभाग हा लाखाचा कर भरला नाही तर लगेच सामान्य माणसावर कारवाई करते दूसरीकडे कोट्यावधींचा कर भरणा होत नसला तरी मूग गिळून गप्प बसते.

नियमबाह्य जाहीराती लावणा-या व मनपाचा महसूल बुडविणा-या जाहीरात एजंसीवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.यासाठी मनपा आयुक्तांनी वेळेची मर्यादा घालून द्यावी.गेल्या ३० वर्षांत जाहीरातींसाठी कोणतीही नवीन जागाच निश्‍चित करण्यात आली नाही याबाबत आश्‍चर्य व्यक्त करीत प्रशासनाच्या या अश्‍या धोरणांमुळेच मनपाचा हक्काचा कोट्यावधींचा महसूल बुडतो,अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

नेहमी प्रशासनाला अडचणीत आणना-या प्रश्‍नांचा मारा करुन सभा गाजविणारे दटके यांनी आज अचानक अशी माघार घेतल्याने त्यांच्या ‘रागावर’मनपा अधिका-यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या