फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपाप्रभाग २६च्या मतदार यादीत मोठा घोळ

प्रभाग २६च्या मतदार यादीत मोठा घोळ

Advertisements

निवडणूक आयोग व मनपा प्रशासन झोपलेले ; माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा आरोप

वारंवार तक्रार करूनही प्रशासन ढिम्म, टोलवाटोलवी चा आरोप

नागपूर,१ डिसेंबर २०२५: नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग २६ मधील वाठोडा भागातील मतदार यादीमध्ये मोठा घोळ आहे. याबद्दल वारंवार तक्रार करूनही निवडणूक आयोग आणि मनपा प्रशासन झोपलेले आहेत, असा गंभीर आरोप माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

प्रभाग २६ वाठोडा येथील काही बुथमध्ये मतदार यादीत घोळ स्पष्ट झालेला आहे. या प्रभागातील काही बूथ मधील नावे ही दुसऱ्या प्रभागामध्ये अंतर्भूत झालेली आहेत. प्रभाग २६मधील बूथ क्रमांक १८६ मधील ४६६ मतदार, बूथ क्रमांक ३३४ मधील पूर्ण मतदार आणि बूथ क्रमांक २५०, २४९, २३६, २३५, २८८ (तुलसी नगर, अबूमिया नगर, सुरज नगर) येथील अनेक मतदारांचे नाव प्रभाग २५ व २३ मध्ये अंतर्भूत झालेली आहेत.

हे सर्व मतदार प्रभाग २६ वाठोडा येथील रहिवासी आहे. या गंभीर प्रकाराबाबत निवडणूक आयोग आणि मनपा प्रशासनाला अवगत करण्यात आले, वारंवार तक्रारही करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जात आहे, असाही आरोप माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

………………………………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या