Homeनागपूर न्यूजप्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाच्या अध्यक्षपदी प्रा. प्रकाश सोनवणे यांची नियुक्ती

प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाच्या अध्यक्षपदी प्रा. प्रकाश सोनवणे यांची नियुक्ती

Advertisements
Advertisements

मुंबई, दि. १५ ऑक्टोबर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिक्षक विभागाच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रा. प्रकाश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने त्यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीचे पत्र देऊन त्यांच्या कार्यास प्रदेशाध्यक्षांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रा. प्रकाश सोनवणे यांनी काँग्रेसच्या विविधपदांची जबाबदारी चांगल्या प्रकारे हाताळलेली आहे. त्यांचा जनसंपर्क दाडंगा आहे, विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. शिक्षकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकर घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, सहाय्यक प्रदेश निवडणूक अधिकारी यासह विविध पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिक्षक विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

“पक्षाने आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस पक्षासाठी निष्ठेने काम करत आलो आहे व यापुढेही काम करेन. शिक्षक विभागाच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली असून या पदालाही न्याय देण्याचा प्रयत्न करेन. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना वाढवण्याचे प्रयत्न करेन. माझ्या नियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आभार व्यक्त करतो.” असे सोनवणे म्हणाले.

Latest बातम्या