फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजप्रतिभावंत ड्रम वादक अशोक ठवरे यांचे दू:खद निधन

प्रतिभावंत ड्रम वादक अशोक ठवरे यांचे दू:खद निधन

Advertisements

कलाकार जग हळहळले

नागपूर,ता. २९ एप्रिल: गेल्या ४० वर्षांपासून संगीत क्ष्ेत्राशी जुळलेले नाव म्हणजे ड्रम वादक अशोक ठवरे.सत्तरीच्या दशकापासून विविध ऑकेस्ट्रा व संगीत संचामध्ये अापली अविरत सेवा देणारे ठवरे यांचे अचानक काल बुधवारी पहाटे साढे पाच वाजता जाणे कलाकार जगाला हादरा देऊन गेले.सोमवारी त्यांना हल्कासा ताप आला होता,त्यांची करोना चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली,याचा प्रचंड ताण त्यांना आला व काल पहाटे झोपेतच ह्दयविकाराच्या धक्क्याने त्यांचे दू:खद निधन झाले.ते ६३ वर्षांचे होते.

त्यांच्या मागे पत्नी,मूलगा व मुलगी आहे.इमामवाडा येथे राहणारे अशोक ठवरे यांची वस्ती ही सध्या करोनाबाधितांचा उच्चांक असल्याने कंटोनमेंट झोन म्हणून प्रतिबंधित आहे.अश्‍यावेळी गेल्या आठवड्यात त्यांच्या वहीनीचे करोनामुळे निधन झाले व भाऊ हा देखील अतिदक्ष् ता विभागात भर्ती आहे.याचा प्रचंड ताण त्यांनी मनावर घेतला होता असे त्यांची पत्नी सांगते.

सोमवारी हल्कासा ताप आल्याने त्यांची देखील करोनाची चाचणी करण्यात आली,मगंळवारी त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,मुलाने मात्र तो बाबांपासून दडवून ठेवला.काल रात्री त्यांनी जेवण केले,औषधे घेतली व झोपी गेले.मध्यरात्री त्यांना तहान लागली असताना मुलाने पाणी दिले. मात्र पहाटे पाच वाजता पत्नी पाणी भरण्यासाठी उठली असता पाणी वर चढत नव्हते त्यामुळे तिने मुलाला आवाज दिला.मुलगा उठला मात्र त्याला बाबा वेगळेच झाेपले असल्याची जाणीव झाली.

धंतोली येथे एका खासगी रुग्णालयात कर्मचारी म्हणून काम करीत असणा-या पत्नीने स्वत: त्यांची नाडी तपासली मात्र ती हाताला लागत नसल्याने तातडीने त्यांना ऑटोमध्ये मेडीकलमध्ये नेण्यात आले.त्यांना तपासले असता ते मृत पावले असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली.तेथूनच अशोक ठवरे यांचे पार्थिव घाटरोड येथील मोक्ष् धाम येथे आणण्यात आले.सकाळी १० वा.ते अनंतात विलीन झाले.
अशोक ठवरे हे प्रतिभावंत ड्रमर म्हणून कलाकार विश्‍वात गणले जातात.हफीज ऑकेस्ट्रा,खांडेकर ऑकेस्ट्रा अश्‍या अनेक ऑकेस्ट्रा संचामध्ये त्यांनी अप्रतिम ड्रमर म्हणून आपली कला सादर केली.८० च्या दशकात चित्रपट नगरीतील अनेक सेलिब्रिटींसोबत त्यांना एकाच मंचावर आपली कला सादर करण्याची संधी मिळाली.१९७७ साली रॉबर्ट लोबो यांच्या ‘ब्लास्टर’ऑकेस्ट्रापासून त्यांनी आपल्या सांगितीक कारकीर्दीची सुरवात केली.मायकल टोनी यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली होती.

याच काळात बलवंत बहादूरे यांच्या ‘मयूर मिलन’मध्ये म्हणजे नंतरच्या ‘कोहिनूर’ग्रूपमध्ये त्यांनी रिद् म वाजवले.पुढील काळात ‘शशिझंकार’संचासोबत देखील त्यांनी कार्यक्रम गाजवले.मधल्या काळात शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये त्यांनी ड्रमप्लेअर म्हणून काम केले.पुढे ‘मेलोडी मेकर्सला’ ज्वाईन केले.दहा वर्षे या ग्रूपसोबत काम केल्यावर त्यांनी १९८९ साली सुप्रसिद्ध ‘हफीज’ऑकेस्ट्रा ज्वॉईन केला.
मधल्या काळात त्यांचा अपघात झाला.ऑटोने धडक दिल्यानंतर ५ महिने ते अंथरुणावरच होते.जिवनात अनेक संकटांचा सामना त्यांनी धीराने केला.गेल्या वर्षी लॉकडाऊनपासून मात्र सगळे सांस्कृतिक कार्यक्रम बंद पडल्याने ते सतत तनावात राहत होते.

आज ड्रम्समधील बेस,स्नेअर,टॉम,साईड ड्रम,चोक,चोक सिम्बॉल,बेस ड्रम,पायडल यावरचं अधिपत्य कायमचं दूरावलं.

कलाकार विश्‍वात अशोक ठवरे यांच्या अश्‍यारितीने अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.अनेकांना या माहितीवर विश्‍वासच बसत नाही.नुकतेच त्यांनी ऑस्कर सांस्कृतिक संगीत कला अकादमीचे सदस्यत्व स्वीकारले होते.या माध्यमातून ते अनेक गरजू कलावंतांच्या मदतीला धावत होते.यश मदनकर या युवा ड्रम वादकाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या घरी जाऊन कलाकार म्हणून त्याचे जिवन किती अनमोल आहे याचे मार्गदर्शन अशोक ठवरे यांनी केले होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या