

-स्थायी समितीच्या ८ सदस्यांची निवड
१० विशेष समिती सभापतींची नावे घोषित
नागपूर, ता. २२ :यंदाचं वर्ष हे निवडणूकीचं असणार आहे,या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या १० विशेष समित्यांच्या सभापती पदी कोणाची वर्णी लागते व कोणाची गच्छंती होते याकडे जनसामान्यांचे लक्ष् लागले होते. आज सोमवार दि. २२ फेब्रुवरी रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये स्थायी समितीच्या निवृत्त होणा-या ८ सदस्यांच्या जागी नविन ८ सदस्यांची निवड करण्यात आली तसेच स्थायी समितीच्या अध्यक्ष् पदावरुन पिंटू झलके हे पायउतार झाले असून त्यांच्या ठिकाणी आता भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश भोयर यांची वर्णी लागली आहे. मावळते सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव यांनी मनपा मुख्यालयात आयोजित पत्र परिषदेत या नावांची घोषणा केली.मनपाची विशेष सभा डॉ.पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.संदीप जाधव यांच्या जागी अविनाश ठाकरे यांचे नाव नवे सत्ता पक्ष् नेते म्हणून आधीच घोषित झाले आहे.
भाजपातर्फे सत्तापक्ष नेता संदीप जाधव यांनी प्रकाश भोयर, संजय बालपांडे, सुषमा चौधरी, प्रगती पाटील, भारती बुंडे, काँग्रेसतर्फे विपक्षचे नेते तानाजी वनवे यांनी नेहा राकेश निकोसे व मनोज गावंडे तसेच ब.स.पा.तर्फे पक्ष नेता वैशाली नारनवरे यांनी बंद लखोट्यात नरेन्द्र वालदे यांचे नांव महापौरांना दिले. सचिव रंजना लाडे यांनी या नावांचे वाचन केले. यामध्ये भाजपाचे ५, काँग्रेसचे २ व बसपाच्या १ सदस्याच्या समावेश आहे.
यानंतर सत्तापक्ष नेता जाधव यांनी स्थायी समितीचे उर्वरित ७ नावांची घोषणा केली. यामध्ये सुमेधा देशपांडे, वर्षा ठाकरे, वनिता दांडेकर, स्वाती आखतकर, रूपाली ठाकुर, वंदना भुरे, जयश्री लारोकर यांचा समावेश आहे. प्रकाश भोयर यांना स्थायी समिती सभापती पदाचे उम्मेदवार घोषीत करण्यात आले आहे. त्यांनतर नागपूर महानगरपालिकेच्या दहा विशेष समितीच्या सदस्यांची नाव घोषीत करण्यात आले. सोमवारी (ता.२२) ऑनलाईन पद्धतीने झालेल्या मनपाच्या विशेष सभेमध्ये महापौर दयाशंकर तिवारी यांनी दहाही विशेष समिती सदस्यांचे नाव घोषित केले. या समितीच्या सदस्यांची निवडणूक १ मार्च पूर्वी घेण्याचे निर्देश महापौरांनी सचिवालयाला दिले आहे.
सत्तापक्ष नेता संदीप जाधव यांनी या विशेष समितीच्या सभापती पदाचे उम्मेदवारांचे नावांची घोषणा केली. यामध्ये शिक्षण समिती सभापतीपदी प्रा. दिलीप दिवे तर कर संकलन व कर आकारणी समिती सभापतीपदी महेंद्र धनविजय यांना कायम ठेवण्यात आले आहे. स्थापत्य समिती सभापती म्हणून राजेंद्र सोनकुसरे, जलप्रदाय समिती सभापतीपदी संदीप गवई, विधी समिती सभापतीपदी ॲड. मिनाक्षी तेलगोटे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी दिव्या धुरडे, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापतीपदी दिपक चौधरी, दुर्बल घटक समिती सभापतीपदी कांता रारोकर आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती म्हणून हरीश दिकोंडवार, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती संजय महाजन यांची निवड करण्यात आलेली आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या निवड प्रक्रियेत पिंटू झलके यांची स्थायी समिती अध्यक्ष् पदी वर्णी लागली होती मात्र २७ जानेवारी रोजी मनपात आयुक्त पदी अवतरलेले महाराष्ट्रातील बहूचर्चित व सुविख्यात तुकाराम मुंढे यांची वर्णी मनपा आयुक्त पदी लागली तसेच ११ मार्च रोजी नागपूरात पहीला कराेना बाधित रुग्ण आढळला यानंतर संपूर्ण वर्ष सत्ताधारी विरुद्ध मनपा आयुक्त यांच्या संघर्षात तसेच करोनामुळे लागू झालेल्या लॉक डाऊनमध्येच पार पडला.
त्यामुळे पिंटू झलके यांना पुन्हा एकदा संधी मिळेल अशी अपेक्ष्ा व्यक्त केली जात होती मात्र पक्ष्ात अनेक ज्येष्ठ नेते आहेत त्यांना देखील निवडणूकीच्या शेवटच्या वर्षात संधी मिळायला हवी असे समर्थन संदीप जाधव यांनी पत्रकारांसोबत बोलताना केले.मात्र कर आकारणी समितीच्या तसेच शिक्ष् ण समिती सभापती पदी महेंद्र धनविजय व प्रा.दिवे यांना कायम का ठेवण्यात आले याबाबत बोलताना कर विभागात धनविजय यांनी वर्षभर चांगला अनुभव प्राप्त केला तर प्रा.दिवे यांचे शिक्ष् ण समितीचे सभापती म्हणून चांगले काम राहीले असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.लवकरच राज्याचा शैक्ष् णिक अभ्यासक्रम असणा-या ६ सीबीएसई इंग्रजी माध्यमांच्या शाळेची जवाबदारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेविका वर्षा ठाकरे यांची वर्णी देखील विशेष समितीच्या सभापती पदी होईल अशी अपेक्ष्ा असताना त्यांची वर्णी स्थायी समितीच्या सदस्य पदी लागली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिंटू झलके यांना कामाची पुन्हा संधी का नाही मिळाली या प्रश्नावर बोलताना हा पक्ष्ाच्या कोअर कमेटीचा निर्णय असल्याचे संदीप जाधव यांनी सांगितले.मनपात भाजपचे १०७ नगरसेवक आहेत त्यातील अनेक नगरसेवक हे ज्येष्ठ व अनुभवी आहेत त्यांना देखील संधी मिळणे हे गरजेचे होते असे ते म्हणाले.
सत्ता पक्ष् नेते पदावरुन कोणत्या वैयक्तिक कारणावरुन राजीनामा दिला,या प्रश्नावर बोलताना वैयक्तिक कोणतेही कारण नसून माध्यमांचा गैरसमज झाला.इतरांनाही संधी मिळावी हाच राजीनामा देण्यामागील हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.कोणत्या दवाबाखाली राजीनामा दिला या प्रश्नालाही बगल देत मी सामान्य कार्यकर्ता असून आतापर्यंत पक्ष्ाने तीन वेळा मोठी जवाबदारी दिली असल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.उपमहापौर,स्थायी समिती सभापती तसेच सत्ता पक्ष् नेता म्हणून माझ्यावर पक्ष्ा ने वेळोवेळी जवाबदारी सोपवली.आज झालेल्या निवडीमध्ये ‘जात फॅक्टर’कितपत प्रभावी आहे?यावर बोलताना भाजपमध्ये जातीच्या आधारावर निर्णय होत नाही असे ते म्हणाले.
आपल्या कारकीर्दीविषयी बोलताना माजी महापौर संदीप जोशी तसेच सर्व नेते व नगरसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.करोनामुळे जूनमधील एकमेव सभा ही ऑफ लाईन झाली इतर सर्व सभा या ऑन लाईनच झाल्यामुळे त्यातही पराकोटीचे विघ्न आल्याने फारसे काही करु शकलो नसल्याची कबूलीही त्यांनी या प्रसंगी दिली.
फडणवीस यांच्या हस्तक्ष्ेपातून दक्ष्ि ण-पश्चिमला झूकते माप देण्यात आले का?यावर ‘नाही’ असे उत्तर त्यांनी दिले.
सर्व नवनिर्वाचित विशेष समिती सदस्यांचे महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी अभिनंदन केले.




आमचे चॅनल subscribe करा
