

रमेश गाढवे (रा. यशोधरानगर) असे अटकेतील पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो यशोधरानगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. पीडित मुलगी इयत्ता सहावीत शिकते. परिसरात राहत असल्याने गाढवे हा पीडित मुलीच्या आई-वडिलांना ओळखतो. बुधवारी सकाळी तिचे आई-वडील कामावर गेले होते. पीडित मुलगी व तिची लहान बहीण घरीच होती. गाढवे हा मुलीच्या घरात घुसला. विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड करताच गाढवे तेथून पसार झाला.




आमचे चॅनल subscribe करा
