

नागपूर,ता. १३ जून: पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिनांक १७ जून २०२१ रोजी सकाळी १० वा.च्या सुमारास अलंकार सभागृह,पोलीस मुख्यालय,नागपूर शहर येथे ‘विशेष तक्रार निवारण दिन‘चे आयोजन केले आहे.
पोलीस विभागाशी संबधित असलेल्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी पोलीस आयुक्त,नागपूर शहर यांच्या समक्ष् मांडायच्या असल्यास कोणालाही या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.
संबंधितांनी आपली तक्रार लेखी स्वरुपात इमेल आयडी application1ngp@gmail.com वर किंवा ९९२३००४९९५ या व्हाॅट्स ॲप क्रमांकावर दिनांक १६ जून २०२१ पूर्वी खाली दिलेल्या नमुन्यामध्ये पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१) तक्रारदाराचे नाव/पूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांक
२) विरोधकाचे नाव व पत्ता
३)संबंधित पोलीस स्टेशन/विभाग
४)तक्रारीची थोडक्यात माहिती
…………………




आमचे चॅनल subscribe करा
