फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमपोलिस अधिका-याला मारहाणीची अफवा: सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिस अधिका-याला मारहाणीची अफवा: सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Advertisements

नागपूर,ता.१० जानेवारी २०२२: शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिका-याला मारहाण झाल्याची अफवा पसरविणा-याविरुद्ध सदर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.

प्रथम श्रेणी न्यायदंडाधिका-यांनी या प्रकरणाचा तपास करण्याची परवानगी पोलिसांना दिली असून,त्यानुसार पोलिसांनी अफवा व खोटे वृत्त पसरविणा-याचा शोध सुरु केला आहे.२५ डिसेंबरला सदर भागात चार ते पाच जणांनी पोलिस अधिका-याला मारहाण केल्याची अफवा शहरात पसरली.

पोलिसांनी या घटनेची सत्यता पडताळली.पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हेतुपुरस्सरपणे ही अफवा पसरविण्यात आल्याचे समोर आले.त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिस अधिकारी यांना मारहाण झाल्याबाबत अफवा पसरवणारी खोटी बातमी पसरविण्यात आली होती.नमूद बातमीच्या अनुषंगाने पोलिस स्टेशन सदर येथे प्राथमिक चौकशी करण्यात आली असता,अश्‍या प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसताना कोणीतरी खोटी माहिती दिल्याने पोलिसांची प्रतिमा मलीन होऊन त्यांचे मनोधैर्य खचविणारी अफवा पसरविण्यात आली.

वरील खोट्या अफवेमुळे जनसामान्यात पोलीस दलाची प्रतिमा मलीन होऊन पोलिस विभागाची बदनामी करण्याची मानसिकता दिसुन येत असल्याचे पोलिस विभागातर्फे सांगण्यात आले.सध्या कोरोना काळात पोलिस विभाग आपल्या जिवाची पर्वा न करता,अहोरात्र कर्तव्य करुन जनतेची सेवा करीत आहे.अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरविण्यामुळे पोलिसांचे मनोबल खचुन कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.अशा प्रकारची अफवा पसरवून पोलिस विभागाची बदनामी करुन जनतेच्या मनात भय निर्माण होऊन असुरक्ष्ततेचे वातावरण निर्माण होत आहे.

पोलिस विभागाने या प्रकरणाची गांर्भीयाने दखल घेऊन वरील कृत्य कलम ५००,५०५ भा.दं.वि.अन्वये होत असल्याने या संबधाने पो.स्टे.सदर येथे कलम ५००,५०५ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.नमूद गुन्ह्याचा पुढील तपास करण्याची परवानगी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्र.४ नागपूर शहर यांच्याकडून प्राप्त झाली असल्याचे पत्रकाद्वारे पोलिस विभागाने कळवले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या