
राष्ट्रवादीच्या मिडीयाकर्मीची अशीही ’दादागिरी’
गेल्या दहा वर्षांपासून पोलिसकर्मीची मानसिक छळवणूक
मुलीची काढली होती छेड:सूडनाट्य सुरुच
नागपूर,ता. २४ जानेवरी २०२२: उत्तर नागपूरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता उर्फ मिडीया सेलचा अध्यक्ष उर्फ साप्ताहिक वृत्तपत्राचा संपादक अमित शिवमणी दुबे यासारख्या एका राजकारणीची ‘पैठ‘नागपूरच्या पोलिस विभागात इतकी खोलवर आहे की त्याला २०१२ साली ज्या मुलीसोबत लग्न करायचे होते,जिची त्याने सतत छेड काढली,पाठलाग केला,त्या वडील नसलेल्या मुलीने अमित दुबे याच्या त्रासाला व दहशतीला कंटाळून घरात स्वत:ला कोंडून घेतले,त्या मुलीच्या पाठीशी पोलिस विभागातील आनंद पुरुषोत्तम वानखेडे या नातेवाईकाने खंबीरपणे उभे राहून अमित दुबे याच्या त्रासापासून जिला मुक्त केले,त्या वैयक्तीक बाबीचा सूड शरद पवार यांच्यासारखे द्रष्टा नेते असणा-या, ज्यांनी राजकारण व वैयक्तीक बाबी यांची उभ्या आयुष्यात कधीही गल्लत केली नाही,त्याच पक्षाचा एक कार्यकर्त्याने मात्र गेल्या १२ वर्षांपासून या पोलिस शिपाईचे जीने हराम केले,पोलिस विभागात जिथे जिथे आनंद वानखेडे यांची बदली झाली त्या -त्या विभागात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा रुतबा वापरुन वानखेडे यांचा त्या विभागातील वरिष्ठांकडूनही छळ करुन घेतल्याने आज विवश होऊन त्यांची पत्नी नूतन पुरुषोत्तम वानखेडे यांनी प्रेस क्लब येथे पत्र परिषद घेऊन माध्यमांसमाेर आपली व्यथा मांडली.यावरुन पोलिसांवर देखील पुरोगामी महाराष्ट्रात एखादा राजकारणीच वर्षानूवर्षे कसा हावी राहू शकतो,याची दूर्देवी साक्ष नूतन वानखेडे यांच्या पत्र परिषदेतील अश्रूंनी दिली.
याप्रसंगी बोलताना नूतन यांनी सांगितले की,त्यांच्या पतीला पोलिस विभागात २५ वर्षे नोकरीला झाली.ज्या ही विभागात ते जातात त्यांचे नाव खूप चांगले घेतले जाते.इमाने इतबारे अानंद आपले कर्तव्य बजावतात.कोणाच्याही मदतीला धावून जातात.अशीच मदत त्यांनी आपल्या चूलत बहीणीला २०१२ साली केली होती.उत्तर नागपूरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा स्वत:ला नेता म्हणवून घेणारा अमित दुबे याची नजर पिडीतावर पडली.एकतर्फी प्रेमातून त्याने पिडीताला त्रास देण्यास सुरवात केली.पिडीताला वडील नसल्यामुळे आनंद यांनी अमित याला तिला त्रास देण्यावरुन हटकले.तिचे अमितच्या त्रासापासून भाऊ म्हणून संरक्षण केले.याचाच सूड अमित शिरोमणी दुबे आजपर्यंत घेत आहे.सूड भावनेतून अमित दुबे हा पोलिस विभागातील आपल्या ’उठबस’संबंधाचा फायदा घेत आहे.जिथे जिथे आनंद यांची बदली होते तिथे तिथे पोहोचून आंनद यांना जातिवाचक शिव्या देतो,त्यांच्या वरिष्ठांकडे पतीचे नाव खराब करतो,त्यांची बदली करवून घेतो,शिवीगाळ करतो एवढंच नव्हे तर आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत असल्याचा गंभीर आरोप नूतन यांनी केला.
एवढंच नव्हे तर साेशल मिडीयावर आनंद यांच्या चेह-याच्या जागी श्वानाचे फोटो लाऊन अश्लील,बदनामीकारक पोस्ट प्रसिद्ध करतो.सरकारी नोकरीमुळे आनंद हे गेल्या दहा वर्षांपासून अमित शिरोमणी दुबे याचा त्रास मुकाट्याने सहन करीत आहेत.त्यांच्या मानसिक व शारिरीक छळाविषयी विविध पोलिस ठाण्यात दुबे यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी देऊन देखील फक्त राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्यामुळे व राज्यात २०१२ साली तसेच आता देखील शरद पवार यांच्या पक्षाची सत्ता असल्यामुळे पोलिस विभागाकडून दुबे याच्यावर काेणतीही कारवाई झाली नाही,त्यामुळे दुबे याचे दु:साहस आणखीनच वाढले असून माझे संपूर्ण कुटूंबच त्याच्या दहशतीत जगत असल्याची व्यथा नूतन यांनी मांडली.आजच्या पत्र परिषदेला माझी मुले देखील माध्यमांसमोर येणार होती मात्र त्यांचे शैक्षणिक भवितव्य बघता एक आई म्हणून मीच त्यांना रोखले असल्याचे नूतन म्हणाल्या.
माझ्या पतीला जातीवाचक शिव्या देणा-या अमित दुबे याच्याविरुद्ध एकदा नव्हे तर दोन वेळा पाचपावली पोलिस ठाण्यात अट्रासिटीच्या तक्रारी नमूद आहे मात्र दलितांच्या आत्मसन्मानाचे भान जपणा-या या कायद्याची अंमलबजावणी फक्त कागदावरच दिसून पडते अशी उद्विग्नता त्यांनी मांडली. माझ्या पतीला ’महार,धेड’म्हणून उघडपणे शिव्या देणारा सवर्ण जातीच्या आरोपीविरुद्ध नागपूर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही,नागपूरातील पोलिस विभागच एका राजकारण्याच्या दवाबाखाली वावरत असेल व आपल्याच विभागातील एका प्रामाणिक पोलिसकर्मीला न्याय देऊ शकणार नसेल तर मी माझ्या पतीच्या आत्मसन्मानासाठी व माझ्या कुटुंबियांची अमित दुबे नावाच्या दृष्ट प्रवृत्तीपासून सुटका करुन घेण्यासाठी आंदोलनाला बसेल किवा आत्महत्या करेल असा इशारा नूतन यांनी दिला.
दोषींना पाठीशी घालणार नाही: अनिल अहिरकर(प्रदेश उपाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस)
अमित दुबे हा राष्ट्रवादीच्या अधिकृत मिडीया सेलचा प्रभारी नाही.शहरात पक्षाचा विस्तार व्हावा या उद्देशाने माझ्या शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात सोशल मिडीया सेलची मी निर्मिती केली होती,त्यातील एका सेलचा प्रमुख म्हणून अमित दुबे याची नियुक्ती केली होती मात्र ज्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखे द्रष्टे नेते आहेत त्यांच्याच पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता जर असा वैयक्तीक सूड घेण्यासाठी पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करीत असेल तर अश्या दोषींना पाठीशी घालणार नाही,या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.




आमचे चॅनल subscribe करा
