

महाराष्ट्राच्या इतिहासात पहील्यांदा पोलिस आयुक्तांचे गृहमंत्र्यांवर आरोप!
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप!यासाठीच हवी होती का सत्ता?
नागपूर,ता.२० मार्च: महाविकास आघाडी सरकारमध्ये सचिन वाझे प्रकरणावरुन जे वादळ सुरु झाले त्याची पुढची एक महाभयंकर लाट आज चक्क गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावापर्यंत येऊन धडकली.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिरसिंग यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या ‘पत्र बॉम्ब’च्या माध्यमातून चक्क गृहमंत्र्यांवरच आरोप करीत अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला शंभर कोटींची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले असल्याचे नमूद केले!
नुकतेच परमबिरसिंह यांना पोलीस आयुक्त पदावरुन हटविण्यात आले असून त्यांना होमगार्ड अश्या कनिष्ठ समजल्या जाणा-या विभागाचे प्रमुख म्हणून पाठविण्यात आले होते.आज दूपारी ४ वाजून ३७ मिनिटांवर ई-मेलने पाठविलेल्या मात्र स्वाक्ष् री नसलेल्या पत्रात परमबिरसिंह यांनी नमूद केले की खंडणी वसूल करण्याची बाब स्वत: सचिन वाझे यांनी मला येऊन सांगितली तेव्हा मला धक्काच बसला होता!
मी मार्च महिन्यात तुम्हाला एंटिलिया प्रकरणासाठी भेटायला आलो होतो तेव्हाच तुम्हाला याची माहिती दिली होती की गृहमंत्री यांनी वाझे यांना मुंबईतील १७५० बार आणि रेस्टॉरेंटमधून दर महा १०० कोटींची खंडणी वसूल करण्याची सूचना दिली होती.यावेळी अनिल देशमुख यांचा स्वीय सहाय्यक पलांडे हा देखील हजर होता.एवढंच नव्हे तर हे पैसे कसे वसूल करायचे?याचे देखील मार्गदर्शन केले.
मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरेंट आहेत त्यांच्याकडून दर महा तीन-चार लाख रुपयांची खंडणी वसूल करावी,यातून ५० कोटी रु.हे वसूल होतील,उर्वरित ५० कोटी इतर ठिकाणाहून वसूल करण्यात यावे,असे गृहमंत्र्यांनी वाझे यांना सांगितले असल्याचे परमबिरसिंह यांनी पत्रात नमूद केले.
एवढंच नव्हे तर परमबिरसिंह यांनी पत्रात नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात देखील हस्तक्ष्ेप केला!त्यांनी डेलकर यांना आत्महत्येसाठी प्रोत्साहन देण्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी पहील्या दिवसापासूनच दवाब आणला.जरी डेलकर यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करायचा असल्यास तो मुंबई ऐवजी दादरा नगर हवेलीच्या अधिकार क्ष्ेत्राअंतर्गत दाखल झाला पाहीजे होता.
याबाबत परमबिरसिंह यांनी त्यांचे आणि पोलीस विभागाचे पाटील यांच्यासोबतचे व्हॉट्स ॲप चॅट्स देखील यांचा देखील उल्लेख केला.या चॅट्समध्ये त्यांनी गृहमंत्री,वाझे व खंडणीच्या संदर्भातील संपूण तपशील नमूद केला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पियो ठेवण्यात आलेल्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत वाझे यांना अटक झाली आहे.वाझे यांच्या अटकेनंतर चौकशीचे तार मुंबई पोलीस आयुक्त परमबिरसिंह यांच्यापर्यंत ही पोहोचणार असल्याचे बोलले जात होते.यामुळे महाराष्ट्र पोलीस विभगाची बदनामी झाली असती तत्पूर्वीच परमबिरसिंह यांना पदावरुन हटविण्यात आले.मात्र परमबिरसिंह यांनी आज शनिवार दि. २० मार्च रोजी टाकलेल्या ‘पत्र बॉम्ब’मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे.
परमबिरसिंहचा बोलविता धनी कोण?
परमबिरसिंह यांनी त्यांच्यावर होणा-या कारवाईची पर्वा न करता टाकलेल्या पत्र बॉम्बमागे त्यांचा बोलविता धनी कोण?अशी चर्चा सुरु झाली आहे.अातापर्यंत परमबिरसिंह हे चूप कसे बसले?आज अचानक त्यांना ‘सत्य’सांगण्याची उपरती कशी झाली?त्यांना एनआयएच्या चौकशी फे-यातून वाचविण्यासाठीच पत्र बॉम्बचा उपयोग करण्यात आला का?महाराष्ट्राची सरकार या मुद्दावर गडगडेल तर त्याचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार आहे?महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या दिशेने ही वाटचाल आहे का?आज फडणवीस यांनी संपूर्ण प्रकरणात माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक ही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही मात्र तात्काळ गृहमंत्र्यांचा राजीनामा त्यांनी मागितला,यावर देखील चर्चेला उधाण आले आहे.पुढील काही काळात पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची सरकार स्थापन होणार का?यावर देखील समाज माध्यमांवर चर्चेला उत आला आहे.
नुकेतच माध्यमांना प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख यांनी सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलिस अधिका-यांच्या चूका माफ करण्यासारख्या नव्हत्या असे सांगितले होते.आता हे पत्र बॉम्ब पुढे आल्यानंतर गृहमंत्री यांची ही चूक ‘अक्ष्म्यच’अश्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
पवार यांची संमती होती का?
गृहमंत्री अनिल देशमुख हे आज जरी संपूर्ण महाराष्ट्राला खलनायक व खंडणीखाेर वाटत असले तरी अनेक बुद्धिवंतांना ते अतिशय सज्जन राजकारणी असल्याची खात्री आहे,त्यामुळेच १०० कोटींची खंडणी आपल्याच पोलिस विभागाला देण्याची सूचना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या इशा-याशिवाय ते देऊ शकत नाही,असा कयास लावला जात आहे..परमबिरसिंह यांनी पत्रात देखील याचा उल्लेख करीत,मी जेव्हा तुम्हाला हे खंडणीचे सत्य सांगितले तेव्हा तिथे उपस्थित इतरांना देखील हे सत्य माहिती असल्याचे जाणवले,असा स्पष्ट उल्लेख केला आहे.
सत्तेपासून ५ वर्ष दूर असल्याची भरपाई!
समाज माध्यमांवर उमटलेल्या प्रतिक्रियांचा पाऊस बघता राष्ट्रवादी काँग्रेस ही ५ वर्ष सत्तेपासून दूर होती,तसेच सध्या महाराष्ट्राच्या तिजोरीत पैश्यांचा खडखडात आहे,त्यामुळेच येनकेन प्रकरणे २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये सत्ता बळकावताच राष्ट्रवादीला पैशा ओरबडण्याची घाई झाली,यासाठीच त्यांनी सत्तेचा वापर खंडणी उकळण्यासाठी करण्यासाठी देखील मागे पुढे पाहीले नाही,शेवटी प्रत्येक पक्ष् हा पैश्यांच्या जोरावर तग धरु शकतो,पक्ष् चालवायचा तर पैसा गरजेचा आहे,राष्ट्रवादीने पैसा कमविण्याचा हा सोपा मार्ग निवडला,मात्र त्यांचे बिंग फूटेल ते ही एक पोलीस आयुक्त फोडतील,असा विचार ही त्यांनी स्वप्नात केला नसल्याची चर्चा माध्यमांवर झडत आहे.
एवढंच नव्हे तर शिवसेना तर पूर्वीपासून खंडणीखोरांचा पक्ष् असल्याचा आरोप होत आला आहे.शिवसेना ज्याप्रमाणे महाराष्ट्रात रुजली,वाढली तो पूर्व इतिहास बघता खंडणीचे अनेक आरोप या पक्ष्ावर आधीपासूनच लावल्या जात आहे.परिणामी परमबिरसिंग यांच्या आरोपात म्हटल्याप्रमाणे अप्रत्यक्ष् पणे शिवसेना देखील सहभागी असावी किवा शिवसेनाचा देखील वाटा असावा,या कयासाला माध्यमांवर ऊत आला आहे.
फडणवीस यांनी मागितला राजीनामा-
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला असून या प्रकरणात आणखी अनेक बाबी पुढे येणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली. व्हॉट्स ॲप चॅट्समधून देशमुख यांच्या विरोधात पुरेसे पुरावे असून या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरीत कारवाई करावी,केंद्रिया तपास यंत्रणेने देखील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी,अशी मागणी केली.
देशमुख यांनी नाकारले आरोप-
या प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटद्वारे मुकेश अंबानी प्रकरणात परमबिरसिंह यांची चौकशी होणार असल्याची शक्यता असल्यानेच त्यांनी अश्या प्रकारचे आरोप केल्याचे सांगितले. हे सगळे आरोप चुकीचे आहेत.
राज ठाकरे यांचेही ट्वीट-
या संपूर्ण प्रकरणावर मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील ट्टीट करुन हा संपूर्ण प्रकार अतिशय धक्कादायक असून महाराष्ट्राच्या प्रतिमेवर काळीमा फासणारी असल्याचे सांगून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ताबडतोब राजीनाम्याची मागणी केली आहे.
मात्र दूसरीकडे मंत्री जयंत पाटील यांनी हा संपूर्ण प्रकार सरकारची बदनामी करण्यासाठी असल्याचे सांगून परमबिरसिंग यांच्या आरोपात तथ्य नसल्याची पाठराखण केली.
(जाता जाता-मनसुख हिरेन हत्या किवा कथित आत्महत्या प्रकरण याची देखील चौकशी गृहमंत्री अमित शहा यांनी एनआयएला आज सोपवली.नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी एनआयए ही फक्त जिलेटीन प्रकरणाचा तपास करीत असून हिरेन हत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसच करणार असल्याचे ठामपणे सांगितले होते मात्र आजच केंद्राकडून हा आदेश देखील येऊन धडकला,आता एनआयए ही मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोरील जिलेटीन प्रकरणासोबतच मनसुख हिरेन हत्याकांडाचाही तपास करणार असून,यामुळे पुढे आणखी किती धक्के महाराष्ट्राच्या जनतेला बसणार आहे?याकडे आता जनतेचे लक्ष् लागले आहे.)




आमचे चॅनल subscribe करा
