अखेर चौदा वर्षीय अथर्वचा मृतदेहच गवसला!
हात-पाय बांधून केली निघृण हत्या!
४ मार्च २०२६: गिट्टीखदान परिसरात गुरुवार दिनांक २ मार्च रोजी सायंकाळी हनुमान जयंतीच्या शोभायात्रेतून १४ वर्षीय अथर्व दिलीप नैनारे हा अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला होता,त्याचा मृतदेह आज शनिवार दिनांक ४ मार्च रोजी दूपारी नागपूर पासून दूर कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरतवाडा परिसरात रिंगरोडलगत एका पोत्यात हातपाय बांधून अतिशय वाईट अवस्थेत आढळून आला.अथर्वच्या वडीलांचा भाजीपालाचा व्यवसाय असून त्याचे काका,आते मामा इत्यादी सर्वांचाच भाजीपालाचा व्यवसाय असून ,अथर्वचा मृतदेह सापडलेल्या पोत्यावरील ट्रेड मार्कवरुन (बॅच क्रमांक)आता मारेकरीचा शोध गिट्टीखदानचे पोलिस घेत आहेत.हा ट्रेड मार्कच मारेकरांचा महत्वाचा पुरावा ठरणार आहे.

सायंकाळी ७ वाजता पासून सुरु झालेली ही शोभायात्रा रात्री उशिरापर्यंत सुरु होती.परिसरातील अनेक नागरिकांसह अथर्वही ही शोभायात्रा बघण्यात दंग होता.मात्र,मिरवणूक संपल्यानंतरही बराच वेळ उलटून देखील तो घरी परतला नाही.परिणामी,त्याच्या कुटूंबियांनी त्याचा सर्वदूर शोध घेतला.परंतू रात्री उशिरापर्यंत तो कुठेच आढळून न आल्याने गिट्टी खदान पोलिस ठाण्यात अथर्व बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
गिट्टीखदान पोलिसांनी तक्रार नोंदवून अथर्वला शोधण्यासाठी शोध मोहिम सुरु केली.शोभायात्रा मार्गावरील आर.आर.नर्सिग होम जवळील एका आईसक्रीम पार्लरच्या सीसीटीव्हीत तो दोन मित्रांसोबत असल्याचे दिसून पडला.यानंतर मित्रांनी त्याला घरी चलण्यास सांगितले परंतू त्याने नकार दिला.दोन्ही मित्र घरी परतले मात्र अथर्व घरी परतलाच नाही.महत्वाचे म्हणजे अथर्वचे अपहरण करुन हत्या करण्यात आली, परंतू मारेक-यांनी त्याला अश्या गल्लीबोळ्यातून नेले ज्यात सीसीटीव्ही लागलेले नव्हते.याचा अर्थ मारेक-यांना त्या संपूर्ण भागाची इतंभूत माहिती होती.यामुळे ते कोणत्याही सीसीटीव्ही कॅमरामध्ये कैद झाले नाहीत.
अथर्वचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला त्यावरुन मारेकरी हे एकापेक्षा जास्त होते,हे सिद्ध होतं.याशिवाय अथर्व ज्या विश्वासाने त्यांच्यासोबत वाहनात बसला, त्यावरुन ते त्याचे खूप जवळचेच नातेवाईक अाहेत,असा पोलिसांनाही संशय आहे.ही हत्या पैशांच्या वादातून झाली असावी,अशी दाट शंका व्यक्त केली जात आहे.
आज दूपारी कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरतवाडा परिसरात रिंगरोडलगत एका गोणीत अज्ञात मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गोणी उघडली असता त्यात अल्पवयीन अथर्वचा मृतदेह आढळला.मृतदेहाची अवस्था खूप वाईट होती.त्याचे हात-पाय बांधलेल्या स्थितीत होते.त्याच्या चेह-यावर व शरीरावर अनेक घाव होते.कपडे.बूट आणि ओळखपत्राच्या आधारे हा मृतदेह अथर्व नैनोरे याचा असल्याची पोलिसांना खात्री पटली.या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल यांनी स्वत: घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला.
अथर्वचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला असून,या हत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु असून,आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहे.वृत्त लिहेपर्यंत दोन संशयितांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
गोवारी समाज आणि पोर्णिमा-
गोवारी समाज हा शेती आणि निसर्गाशी जवळून जोडलेला असून पोर्णिमेच्या चक्रानुसार ते आपले सण साजरे करीत असतात.गोवारी समाज हा कष्टकरी समाज असून,त्यांची जीवनशैली निसर्गाशी जोडलेली आहे.पौर्णिमा त्यांना अध्यात्मिक आणि आरोग्यदायी उर्जा प्रदान करते.पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो ज्यामुळे मानवाला प्रचंड उर्जा मिळते या समजूतीतून पौर्णिमेला काही विधी देखील पार पाडली जातात.अथर्व हा गोवारी समाजाचा होता त्यामुळे ऐन पौर्णिमेच्या दिवशी त्याच्या हत्येमागे नरबळीसारखे वेगळे कारण तर नव्हते?या अनुषंगाने देखील पोलिस तपास करीत आहेत.
…………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
