

चिटणवीस सेंटरमधील प्रदर्शनीला मनपाने ठोठावला २५ हजाराचा दंड! उद्योजकांमध्ये नाराजी
नागपूर, ता. २२ : गेल्या वर्षी नागपूरात पहीला कोराना बाधित रुग्ण हा ११ मार्च रोजी लक्ष्मीनगर भागात आढळला,त्यापूर्वी संपूर्ण जगभर ‘अज्ञात’करोनाच्या प्रादुर्भावाने धूमाकूळ घोतला होता,करोना ही काय बला आहे हे समजायलाच जगभरातील मानव जातीला एक वर्षाचा कालावधी लागला मात्र करोना विषाणूचा संसर्ग होऊन माणसाचा जीव ही जातो हे सिद्ध झाले होते त्यामुळे मायबाप केंद्र सरकारने २४ मार्च २०२० पासून देशात कडक लॉक डाऊन लावले मग,दुसरे,तिसरे,चौथे लॉक डाऊनचे टप्पे वाढत गेले यात होरपळला गेला सामान्य माणूस,व्यापारी,हातावर पोट असणारे मजूर,उद्योग धंधे ठप्प पडले,नोक-या सुटल्या,दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत सामान्य माणसाला पडू लागली यातच काही प्रमाणात नोव्हेंरपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आणि उद्योग व्यवसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.दोन पैसे कमविण्यासाठी हा लहान उद्योजक पुढे सरसावला,त्याच्या वर निर्भर असणारे कर्मचारी त्यांचे कुटुंबिय यांनाही जेवणाची भ्रांत आता संपेल अशी आशा वाटू लागली मात्र……पुन्हा नागपूरात कराेनाने फेब्रुवारीच्या पहील्याच आठवड्यात डोके वर काढले अन्……महानगरपालिकेने पुन्हा नियमांच्या बडगा उगारत जबर दंड वसूलीचा ‘श्रीगणेशा’ केला….!
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने आज सोमवार दि. २२ फेब्रुवारी रोजी चिटणवीस सेंटर, सिविल लाईन्स मध्ये ए.आर.जी.क्रिएशन प्रदर्शनीला कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबददल रु. चक्क २५ हजार चा दंड वसूल केला. क्रिएशनचे अंकित अग्रवाल यांनी शोध पथकाला दंडापोटी रु. २५,००० चा धनादेश सुपुर्द केला.
उपद्रव शोध पथकाला गुप्त सूचना मिळाली होती की चिटणवीस सेंटरच्या प्रदर्शनी मध्ये मोठया संख्येने नागरिक खरेदीसाठी आले आहे. कोरोना नियमांचा भंग केला जात आहे, सामाजिक अंतराचे पालन होत नाही. त्यामुळे शोध पथकाचे प्रमुख बिरसेन तांबे यांनी धरमपेठ झोनच्या जवानांना ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या कारवाईबाबत लहान उद्योगपतींमध्ये कमालीची नाराजी पसरली असून अश्या कारवाईमुळे पुन्हा एकदा हतबल होऊन घरी बसावे लागेल व त्यांच्यावर निर्भर असणा-या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची पुन्हा उपासमार घडणार असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.याची जवाबदारी मनपा घेईल का?कारवाईचा बडगा वारंवार उगारुन कठोर दंड वसूलणारे मनपा कर्मचारी हे लघु उद्योपतींच्या घरातील चूल पेटवणार आहे का?घरात रेशन भरुन देणार आहे का?असा संताप व्यक्त केला जात आहे.
करोनाचे नियम पाळले जात असताना अशी कारवाई योग्य नसल्याचे देखील सांगण्यात आले.संसद भरते,विधी मंडळाचे अधिवेशन होतात,राजकीय पक्ष्ांच्या आंदोलनात तूफान गर्दी होते तेथे मात्र करोनाचा प्रादुर्भाव होत नाही,लहान उद्योजक हा आपल्या रोजीरोटीसाठी असे प्रदर्शन भरवतो,तिथे थोडी जरी गर्दी झाली तर लगेच उपद्रव पथकाचे ‘सैय्या भये कोतवाल ’हे दंडा आणि दंडाची पावती घेऊन मानगुटीवर हजर असतात,असा संताप व्यक्त केला जात आहे.
पोटाच्या भाकरीपेक्ष्ा मनपाच्या उपद्रव पथकाचा दंडच लई भारी,असा त्रागा व्यक्त करुन कराेनाने आधीच जगणे महाग केले,यापेक्ष्ा मरण स्वस्त केले असते तर बरे झाले असते असे दु:खं हे लहान उद्योजक व्यक्त करीत आहेत.शेवटी नियम आणि निर्देश हे माणसाच्या जगण्यापेक्ष्ा तर महत्वाचे नाही होऊ शकत?ते ही एक वर्ष सर्व काम धंदे बंद करुन घराच्या चार भिंतीत उपासमार सहन केल्यावरही आणखी कडक र्निबंध लादण्याची भाषा उच्चारणारे राजकीय नेते,मायबाय सरकार त्यापेक्ष्ा करोनावर जालीम उपाय का शोधत नाही?असा ही त्रागा अनेकांनी खास ‘सत्ताधीश’कडे व्यक्त केला.
अनेकांना करोना हा राजकीय षडयंत्र वाटू लागला असल्याचेही बोलले जात आहे.संपूर्ण भारतात फक्त महाराष्ट्रातच करोनाचा एवढा उद्रेग का?हा सवाल अनेकांना आता भेडसावत आहे.सरकार यावर प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी लहान उद्योजकांचे,कलावंतांचे,सभागृह मालकांचे जगणेच महाग करीत असल्याचा संताप ही व्यक्त होऊ लागला आहे.
मात्र दुसरीकडे जगणे ‘सोपे’ करीत असताना या सर्वांनी जगणे ‘सुरक्ष्ति’ करणेही तेवढेच गरजेचे आहे त्यासाठीच नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपातर्फे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
नुकतेच पालकमंत्री नितीन राऊत यांनी शहरात करोनाची दुसरी लाट आली असल्याचा सूतोवाच केला आहे.त्यामुळे पोटापाण्याची सोय करताना जीवाच्या सुरक्ष्ेची काळजी वाहणे हे देखील प्रत्येक नागरिकांला राष्ट्रीय कर्तव्यप्रमाणेच गरजेचे आहे यात दुमत नाही.




आमचे चॅनल subscribe करा
