Homeनागपूर न्यूजपेपर ट्रेडर्स समोर गंभीर संकटे:रशिया-युक्रेन युद्धाचेही सावट

पेपर ट्रेडर्स समोर गंभीर संकटे:रशिया-युक्रेन युद्धाचेही सावट

Advertisements

६१ वी अखिल भारतीय पेपर ट्रेडर्स परिषद १७ सप्टेंबरपासून नागपुरात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार उद् घाटन

असीम बोर्डिया एफपीटीएचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार

नागपूर १२ सप्टेंबर २०२२ : पेपर ट्रेडर्स असोसिएशन, नागपूरतर्फे १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत ६१ वी ऑल इंडिया पेपर ट्रेडर्स कॉन्फरन्स अर्थात अखिल भारतीय पेपर ट्रेडर्स परिषद, फेडरेशन ऑफ पेपर ट्रेडर्स असोसिएशन आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचे उद् घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता हॉटेल रेडिसन ब्लू, वर्धा रोड येथे होणार आहे.

सेंच्युरी पल्प आणि पेपरचे सीईओ विजय कौल यांचे बीज भाषण होईल. ए.एस. मेहता, अध्यक्ष आणि संचालक, जे.के. पेपर लिमिटेड आणि वदिराज कुलकर्णी, विभागीय मुख्य कार्यकारी, आयटीसी हे सन्माननीय अतिथी यावेळी उपस्थित असतील तर एफपीटीएचे अध्यक्ष दीपक मित्तल समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील.

असीम बोर्डिया हे वर्ष २०२२-२३ साठीचे एफपीटीएचे नामनिर्देशित अध्यक्ष आहेत. एजीएम आणि कॉन्फरन्स दरम्यान, बोर्डिया एफपीटीएचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्‍वीकारतील.

या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील पेपर उद्योगातील मान्यवर आणि आघाडीचे ब्रँड सहभागी होत आहेत. या तीन दिवसीय कार्यक्रमात व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील ६०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या परिषदेत कागद उद्योगाची सद्यस्थिती, आव्हाने आणि संधी यावर सादरीकरण होणार असून, नजीकच्या भविष्यात या उद्योगात संभाव्य व्याप्तीवर चर्चा करण्यासाठी विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींद्वारे तपशीलवार चर्चा केली जाईल,अशी माहिती आज प्रेस क्लब येथे अायोजित पत्र परिषदेत पीटीएचे अध्यक्ष आशिष खंडेलवाल यांनी दिली.

गेल्या फेब्रुवारी पासून जागतिकस्तरावर रशिया-युक्रेन युद्ध सुरु असल्याने देखील पेपर ट्रेसर्डसमोर कागद आयातीच्या संदर्भात गंभीर संकटे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.कागद घेऊन येणा-या माल वाहतूक जहाजांचे देखील आवागमन कमी झाल्याचे आशिष खंडेलवाल यांनी सांगितले.या सर्व विविध संकटातून मार्ग काढण्याचा,त्यावर चर्चा करण्याचा,निर्णय घेण्याचा व तो अहवाल सरकारला सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पेपर ट्रेडर्स असोसिएशन नागपूरने वर्ष २००० च्या सुरुवातीला नागपुरात राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती त्‍यावेळी नागपूरचे महेश खंडेलवाल हे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

दरम्यान, आशिष खंडेलवाल, अध्यक्ष, पीटीए, नागपूर, हर्षित भन्साळी, सचिव, स्वागत समितीचे अध्यक्ष विजय खंडेलवाल आणि आयोजन समितीचे अध्यक्ष असीम बोर्डिया, उपाध्यक्ष ललित
सूद, कोषाध्यक्ष संदीप अग्रवाल, सह-सचिव किशोर कुशलानी आणि सर्व पीटीए सदस्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे पत्र परिषदेत त्यांनी सांगितले.

Latest बातम्या