

जन आशीर्वाद यात्रेत विकास ठाकरेंनी पिंजून काढला पूर्व नागपूर
नागपूर, ता. ५ एप्रिलः देशातील बोकाळलेली महागाई, तरुणांमध्ये वाढलेली बेरोजगारी याला सामान्य माणून कंटाळला आहे. आता नागरिकांना “मन की बात” करणारा नव्हे तर “काम की बात” करणारा नेता हवा आहे. त्यामुळे यंदा नागपुरात परिवर्तनाची हाक नागरिकांनी दिली असून विकास ठाकरेंचे जल्लोषात स्वातग पूर्व नागपूरकरांनी केले. शुक्रवारी इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रेद्वारे पूर्व नागपुरातील नागरिकांशी संवाद साधला.

यात्रेत प्रामुख्याने आमदार अभिजीत वंजारी, धूनेश्वर पेठे, शेखर सावरबांधे, पुरुषोत्तम हजारे, उमाकांत अग्निहोत्री यांच्या सह मोठ्या संख्येत पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यात्रेला जगनाडे चौक येथून सुरुवात झाली. त्यानंतर नंदनवन पोलीस स्टेशन, संजय नगर, रमना मारुती मार्गे शेषनगर, श्रीकृष्ण नगर, एमआयजी, एलआयजी कॉलनी, कुंभारटोली येथून निघून अभिजीत वंजारी यांच्या कार्यालय आजच्या यात्रेचा समारोप झाला. यावेळी लहान मुलांपासून तरुण वर्ग, महिला ज्येष्ठ नागरिक यांनी विकास ठाकरेंवर पुष्पवर्षाव करत यंदा परिवर्तन घडणारच अशी हाक दिली.
शनिवार सकाळची जन आशीर्वाद यात्रा-
उद्या सकाळी ८ वाजता सुरु होणाऱ्या मध्य नागपुरातील जन आशीर्वाद यात्रेत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला प्रामुख्याने उपस्थित असणार आहे. यात्रेची सुरुवात भारतमाता चौक येथून होणार असून गोळीबार चौक-टिमकी-तीनखंबा-पाचपावली-तांडापेठ-विणकर कॉलोनी-बन्सोड चौक-चाकना चौक-मस्कासाथ-बंजाली पंजा-पिली मारबत चौक-कुंभारपुरा पर्यंत जाईल.
दिनांक : ०६ एप्रिल २०२४
वेळ : सायंकाळी ०५ वाजेपासून
स्थळ : शहीद चौक, मध्य नागपूर येथून
…………………………………..




आमचे चॅनल subscribe करा
