
(रविवार विशेष)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२६ जुलै: ‘करोना’ या वैश्विक महामारीने सर्व काही उलथापलथ केले,जगात हाहाकार माजवतानाच वैभवशाली संस्कृतिचा वारसा असणा-या लोकशाही देशात,भारतात देखील कहरच केला. मात्र २१ व्या शतकातील या विषाणूरुपी महामारीचे नियोजन करताना प्रगतीशील देश असणा-या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष् डोनाल्ड ट्रम्प असो किवा विकसनशील भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असोत किवा मनपाचे आयुक्त तुकाराम मुंढे, या सर्वांनीच अनेक चूका या महामारीच्या नियोजनात केल्या ज्याचे परिणाम सर्वसामान्य देशवासीयांना भाेगून दयावे लागत आहेत, विशेष म्हणजे, देशाची असो किवा राज्याची,निवडणूका येण्यास अद्याप चार वर्षांचा काळखंड शिल्लक आहे, तोपर्यंत करोनावरची लस बाजारपेठेत येईल आणि…जनतेला हेच राजकारणी सांगतील, बघा आम्ही तुमचा जीव वाचवला…!
नेहमीप्रमाणे भारतातली जनता आजच्या या महाभयंकर लॉक डाऊन काळातील सर्व ‘उधवस्तपणा’ विसरतील आणि पुन्हा काँग्रेस किवा भारतीय जनता पक्ष्ाच्या विचारसरणीवर भाळून मते टाकतील…!या लॉक डाऊनने एक ही क्ष्ेत्र असे नाही जे उधवस्त नाही केले. शिक्ष् ण असो, देवळे असो,व्यापार उद्दीम,कलावंतांचे जगणे असो, कीर्तनकारांचे जीवन असो, शेतकरी,उद्योजक,लघू उद्योजग,खाजगी नोकरदार,एक सरकारी नोकर सोडलेत तर सगळेच आज उधवस्त झाले आहेत. नाभिक,शिंपी, चहा टपरीवाले, फळ विक्रेते,फूल विक्रेते,फूलांची शेती करणारे, सनई चौघडेवाले, सभागृह-लॉनवाले, बॅण्डवाले, ऑटो चालक,गायक,वादक, बॅक स्टेजवाले,खासगी शाळांचे शिक्ष् क पत्रकार इ.सगळेच कोलमडून पडलेत.
त्यातही नागपूरात शिस्तप्रिय,कर्तव्यकठोर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची आयुक्त पदी नियुक्ती झाली आणि ‘करोना’नेमका काय आहे हे जनमानसात रुजवण्यापेक्ष्ा करोना किती ‘भीतीदायक’आहे,हे रुजवण्यात ते यशस्वी झालेत….!साथ रोग प्रतिबंधरोधक कायद्याने त्यांना दिलेले अमर्याद अधिकार यामुळे तर त्यांनी ‘शासनाच्या निणर्या’अंतर्गत निर्णय शहराच्या बाबतीत घेतले,मग ते निर्णय विलगीकरण केंद्रांच्या बाबत असोत,प्रतिबंधित क्ष्ेत्राबाबत असो किवा लॉक डाऊनच्या संदर्भातील असो.यात भरडली गेली मात्र फक्त जनता….!
कुटुंबात एखादे संकट कोसळले तर त्याचा सामना कसा केला जातो? आर्थिक असेल तर संपूर्ण कुटुंबच त्यातून पर्याय शोधतो,हातभार लावतो, कायदेविषयक असेल तर चांगल्यात चांगला वकील नेमला जातो, शैक्ष् णिक असेल तर चांगल्यात चांगला शिक्ष् क नेमला जातो, आरोग्य विषयक असेल तर चांगल्यात चांगल्या डॉक्टरकडे उपचारांसाठी कल असतो,मात्र देशावर करोनाचं संकट आलं तर केंद्र असो किवा राज्य सरकार त्यांनी एकच उपाय योजिला तो म्हणजे ’घरात बसा…!’काहीही काम धंदे करु नका,शिक्ष् ण घेऊ नका,साथ रोग कायदा लागू झाला असल्यामुळे न्यायालयात आमच्या निणर्यांना आव्हान देऊ नका,उपचारांसाठी आम्ही स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत कोणतीही सोय केली नसल्यामुळे आणि १३० कोटींच्या देशात ‘आरोग्य’हा आमच्यासाठी कायम नगण्य विषय असल्याने,रस्ते,पूल,बुलेट ट्रेन,मेट्रो हे महत्वपूर्ण विषय असल्याने उपचारा अभावी मरणापासून वाचायचे असेल तर ‘घरात बसा…!’
जनतेचा कोणीच वाली नाही….
करोनाने देशातील जनतेला हा एक संदेश दिला आहे की तुमचा कोणीच वाली नाही. वेळोवेळी केंद्राने दिशानिर्देश बदलले,ज्यात होरपळून निघाली ती मुकी बिचारी जनता.राज्याने फक्त होकारार्थी मान हलवली, आणि स्थानिक प्रशासनावर ते निर्णय सोपवून दिले.नागपूरात काय झाले? मुंढेच्या विलगीकरणात नागरिकांचे किती हाल झाले?प्रतिबंधित क्ष्ेत्रातून गर्भवती महिलांना बांबू,टिनांवरुन उड्या मारुन बाहेर पडावे लागले…!निगेटीव्ह असणारे विलगीकरणात जाऊन पोझिटिव्ह झालेत अशी देखील ओरड अनेकांनी केली.आजही एखाद्या इमारतीत कोणी पॉझिटीव्ह निघताच संपूर्ण भागातच ‘भयाण शांतता’पसरते. तो पोझिटीव्ह सात दिवसात बरा होऊन घरी परत येतो आहे मात्र,प्रतिबंध उठवल्याानंतर देखील नागरिक त्या गल्लीतूनही जाण्यास घाबरतात आहेत. त्या इमारतीकडे विशिष्ट नजरेने बघितले जाते,काही तरी भयंकर घडले,असे त्या नजरेतले भाव असतात.तो एक विषाणू आहे,त्याचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो,वेळेवर उपचार घेऊन बरे होऊन काळजी घ्यावी,एवढाच प्रसार न करता,त्याचा इतका पराकोटीचा ’बाऊ’करण्यात आला की नागपूरात अनेक भागात शेजा-यांनीच भीतीतून ’माणूसकी’सोडल्याचे अनेक उदाहरणे माध्यमात उमटली.
महापौरांनाही हवे लॉक डाऊन पण….
मुंढे यांना शहरात कर्फ्यूसह लॉक डाऊनच हवा कारण करोनाचा संसर्ग हा तीन हजार पलीकडे पोहोचला असून,आरोग्य व्यवस्था ही पूर्णपणे कोलमडू शकते,ही भीती त्यांच्या मनात आहे. अश्यावेळी त्यांच्या प्रतिमेला तडा बसू शकतो,जनतेच्या जिविताची भीती यापेक्ष्ाही ’स्व-प्रतिमा’याला जाणारा तडा ते सहन करु शकत नाही,असे शहराॅतील काही बुद्धिजीवी सांगत आहेत तर दूसरीकडे महापौरांनी देखील लॉक डाऊनला विरोध न करता,मुंढेंनी लॉक डाऊन करावे मात्र…ते आम्हाला विचारुन,सांगून करावे..ही भूमिका मांडली!
याच भूमिकेच्या अनुषंगाने शुक्रवारी त्यांनी बैठक घेतली आणि अचानक दोन दिवसांचा ’जनता कर्फ्यू’नागपूरकरांवर लादला. जरी त्याचे नाव जनता कर्फ्यू असले तरी कर्फ्यू तो कर्फ्यूच असतो. महापौर असो किवा मुंढे, जनतेच्या उस्फूर्त सहकार्याचे गोडवे गात आहेत मात्र आतमध्ये काय ’धगधगतंय’याची जाणीव त्यांना असती तर असा कर्फ्यू त्यांनी नागपूकरांवर लादला नसता,असे देखील खासगीत बोलले जात आहे.जो तो आपलीच पोळी भाजून घेत आहे…जनतेचा,दूकानदारांचा,व्यापारी वर्गाचा कोणीही वाली नाही…हेच दृष्य आज शहरात उमटले आहे.
मुंढेंच्या दूरदृष्टिकोणातून दूकानामंध्ये गर्दी….
मुंढेंनी शहरात लावलेल्या ’ऑड इवन’चा फार्मूला किती तकलादू आहे याची बरीच चर्चा व्यापारी वर्गामध्ये रंगते. का होते दूकानांमध्ये गर्दी?याचा साधा अभ्यास एका आयएएस अधिका-याला नाही कारण ‘जनेतेचे अर्थशास्त्र’ हे त्यांच्या अभ्यासक्रमातच नव्हता अशी ओरड व्यापारी वर्ग करीत आहे.
मुंढेमुळेच दूकानांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे त्यामुळे करोनाही झपाटयाने वाढत असल्याचा खुलासा व्यापारी वर्ग करतोय. शहरातील सगळीच दूकाने,ती ही दररोज आणि ती ही उशिरा रात्रीपर्यंत उघडी ठेवल्यास ३० लाख लोकसंख्या असणारे शहरवासी का ठराविक दूकानामंध्ये गर्दी करतील?मुंढेंच्या ऑड इवन फार्म्यूल्यामुळे मागणी आणि पुरवठाचे गणित पार बिघडले, नागरिक त्यांच्या गरजेच्या वस्तूंसाठी मग एका-एका दूकानात गर्दी करतात.
एकीकडे मुख्यमंत्री हे लॉक डाऊन हा पर्याय होऊ शकत नाही असे म्हणतात तर दूसरीकडे ते मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीची प्रशंसा करतात.हा विरोधाभास नाही का?मुंढेंना नागपूरात कर्फ्यूसह १५ दिवसांचे लॉक डाऊन हवे आहे.महापौरांचाही त्याला विरोध नाही फक्त मुंढेंनी त्यांना विचारुन निर्णय घ्यावा एवढीच त्यांची ’रास्त’मागणी आहे.मुख्यमंत्र्यांच्या कौतूकामुळे आता मुंढें यांना आपले निर्णय नागपूरात राबविण्यास आणखीनच ’बळ’ मिळाले,यात शंका नाहीच.
तीन महिन्यांच्या कडकडीत लॉक डाऊननंतर आता शहरात कोणालाही लॉक डाऊन नको आहे. गरज आहे मुंढे असो किवा महापौर जनतेचे हित लक्ष्ात घेऊन एकदिलाने निर्णय घेण्याची. बाजार उघडावे,दूकाने उघडावी,ऑड इवनचा फामूर्ला रद्द करण्यात यावा,दूकानदारांमध्ये आणि जनतेमध्येही करोनाबाबत पुरेशी जागरुकता आली आहे,भाजी बाजारांची संख्या वाढवावी,जनतेला घरी डांबून ठेवण्यापेक्ष्ा शहरातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था अधिक चांगली करण्याकडे मुंढे व पदाधिकारी यांनी लक्ष् द्यावे,ग्रामीण भागातील करोना बाधितांचा अत्यधिक बोजा नागपूर शहरावर पडत असून,त्यांच्याही आरोग्याची काळजी अधिक जोमाने वाहणे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
पंधरा दिवसांचा कर्फ्यूसह लॉक डाऊन जनतेवर लादल्यानंतरही पुन्हा पुढील ७ दिवसातच करोनाचा उद्रेग होणारच आहे. पुन्हा साखळी खंडीत करण्याच्या नावाने पुन्हा लॉक डाऊनमध्ये राहण्याची मनस्थिती आता जनतेची राहीली नाही
विद्यापीठ थांबविले,वीज बिले थांबवली,एस टी.महामंडळाच्या बसेस थांबवल्या,पगार मात्र चालूच आहे,रेल्वे थांबवल्या,शहरातील परिवहन थांबवले,नवरा-बायकोही शहरात डबलसीट जाऊ शकत नाहीत,आॅटोंना परवानगी नाही,‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’असा हूंकार इंग्रजांच्या काळात लोकमान्य टिळकांनी भरला होता,आज तीच वेळ भारतातील जनतेवर ओढवली असल्याचे चित्र आहे.
एवढेच आहे की चार वर्षांनंतर पुन्हा निवडणूका आल्या की, १३० कोटींपैकी जरी ४ टक्के जनता ही करोनामुळे जग सोडून गेली असेल तरी माय-बाप सरकार हेच म्हणेल….बघा आम्ही लस तयार केली आणि…तुमचे जीव वाचवले बरे का!’




आमचे चॅनल subscribe करा
