

दारुड्या पिताने घेतला चिमुकल्याचा जीव
नागपूर,ता.२७ मे: आधीच एक मुलगा त्यात दूसरा ही मुलगा झाल्याने दुस-या मुलाप्रति मनात पराकोटीचा राग मनात होताच.संपूर्ण गर्भारपणात पत्नीला त्याने बजावले होते यावेळी मला मुलगीच हवी!मात्र नियतीच्या मनात जे असतं तेच शेवटी घडतं.खाप्याजवळील वाकोडीत संतापलेल्या दारुड्या पित्याने दगडावर डोके आपटून एक वर्षीय चिमुकल्याची हत्या केल्याची दूर्देवी घटना मंगळवार दि.२५ मे रोजी रात्री १० वा. घडली.
सत्यम करवती असे मृतक बालकाचे तर भजन महेताब करवती वय वर्षे ४० असे अटकेतील मारेक-याचे नाव आहे.
मथुरा यांचे २०१६ मध्ये भजन यांच्यासोबत लग्न झाले होते.दोघेही मजूर आहेत.२०१७ मध्ये त्यांना मुलगा झाला.यानंतर २०२० मध्ये पुन्हा त्यांना मुलगाच झाला.त्याचे नाव सत्यम असे ठेवण्यात आले.भजन याला मुलगी हवी होती.मुलगी हवी असे सतत तो पत्नीला सांगत होता.यावरुन तो सतत वाद ही घालायचा.तिला मारहाण करायचा.
मंगळवारी भजन याने मुथरा हिला दारु पिण्यासाठी पैसे मागितले.मथुरा हिने पैसे देण्यास नकार दिला.त्यामुळे भजन संतापला.त्याने मथुरासोबत वाद घालायला सुरवात केली.त्यानंतर अवघ्या एका वर्षाच्या सत्यमचे पाय पकडले.दोन्ही पाय पकडून भजन याने दगडावर त्याचे डोके आपटून सत्यमची हत्या केली,याबाबत कोणालाही सांगितल्यास मथुरा हिलाही ठार मारण्याची धमकी दिली.
सत्यमची हत्या केल्यानंतर भजन याने त्याचा मृतदेह घरात नेला. रात्रभर त्याने सत्यमचा मृतदेह घरातच ठेवला.तो सत्यमच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होता.दरम्यान,या घटनेची माहीती पोलिस पाटीलला मिळाली.पोलिस पाटलाने खापा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्ष् क अजय मानकर यांना माहिती दिली.
माहिती मिळताच मानकर यांच्यासह खापा पोलिसांचा ताफा वाकोडी येथे पोहोचला.पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.मथुरा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन भजन याला अटक केली.
आज गुरुवारी,त्याला न्यायालयात हजर करुन पोलिस कोठडीची माणगी करण्यात आली.
बाप हा आधारवड समजला जातो.कोणत्याही संकटात बाप हा खंबीरपणे पाठीशी उभा राहील अशीच आजपर्यंत सभ्य समजाची समजूत होती मात्र वाकोडीच्या घटनेने या समजुतीलाच जणू खोटे ठरवले आजवर माता न तू वैरीणी….हेच अधोरेखित केले जात होते आता मात्र पिता ना तू वैरीच…असेच तो अनंतात कायमचा विलीन झालेला चिमुकला म्हणत असेल!




आमचे चॅनल subscribe करा
