

पालकमंत्री साहेब…सोशल डिस्टेन्स पाळा!
मेयामध्ये पाहणी करताना उर्जा मंत्री नितीन राऊत यांनीच केली नियमांची पायमल्ली
नागपूर: राज्याचे उर्जा मंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूर शहरवासीयांना ‘करोना’च्या विषाणूपासून वाचवण्यासाठी कोणतीही जनजागृतीची कसर ठेवली नाही. सातत्याने विविध विभागांच्या,विविध पदाधिका-यांसोबत बैठकांचा तडाखा त्यांनी लावला असून नागपूर शहरातील अनेक चौकात त्यांच्या नावे जनजागृतीपर फलकही झळकतात आहेत. मात्र असे असतानाही ते स्वत:च शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे किती पालन करीत आहेत,याचे बोलके उदाहरण आज गुरुवार दि. २६ मार्च रोजी मेयो रुग्णालयात बघायला मिळाले.

नेहमीप्रमाणे आपल्या २५-३० कार्यकर्त्यांसोबत ते दूपारी मेयो रुग्णालयात करोना संसर्गितांची माहिती घ्यायला पोहोचले मात्र त्यांच्यासोबत असणा-या कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा सोशल डिस्टेन्स मेंटेन केलेला नव्हता,स्वत: पालकमंत्री कार्यकर्त्यांच्या या गराड्यात कोणतेही अंतर न राखता चालत होते. त्यांनी तोंडावर मास्क लावला होता मात्र रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांनी किवा त्यांच्या ३० कार्यकर्त्यांनी सेनिटायझरचा उपयोग केला नाही,परिणामी इतरांना करोनाबाबत जनजागृतीपर संदेश देणारे राज्याचे उर्जा मंत्री हे स्वत: कितपत नियमांचे पालन करतात,हा संदेश जनतेमध्ये गेला.
आज दूपारपासून बरीच चर्चा यावर रंगली.उर्जा मंत्र्यांच्या नियमित घेतल्या जाणा-या बैठकांमध्येही लहानश्या सभागृहात त्यांच्या कार्यकर्त्यांचाच गराडा अधिक असतो,असे खाजगीत बोलल्या जात आहे. त्यातील एक जरी करोनाबाधित निघाल्यास अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो,परिणामी पालकमंत्री नितीन राऊत यांनीच कार्यकर्त्यांना योग्य ती समज द्यावी,अशी मागणी केली जात आहे.
कोणत्याही पक्ष्ाचा आमदार असला तरी कार्यकर्त्यांशिवाय त्यांची आमदारकी ही ‘फिकी’मानली जाते. जेवढ्या जास्त कार्यकर्त्यांची फौज तेवढा तगडा आमदार मानला जातो मात्र संपूर्ण देश करोनाच्या संकटात सापडला असताना,अश्यावेळी उगाचच प्रत्येक संवेदनशील ठिकाणी २५-३० कार्यकर्त्यांची फौज घेऊन जाने हे कितपत योग्य आहे?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
आम्हाला आपल्या पालकमंत्र्यांची देखील काळजी आहे,त्यांनी करोना या विषाणू संबंधित शासनाच्या प्रत्येक सूचनाची कडक अंमजबजावणी करावी व जनतेसमोर आदर्श निर्माण करावा,एकीकडे त्यांच्याच नावे शहरातील अनेक चौकात जनजागृतीपर फलक झळकत असताना,त्यांनीच सोशल डिस्टेन्स मेंटेन न करण्यावर अनेक नागरिकांनी सोशल मिडीयावर नाराजी देखील जाहीर केली आहे.
व्हिडीओ साभार- विदर्भ मेल




आमचे चॅनल subscribe करा
