फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजपालकमंत्री नितीन राऊतांच्या दबावात अतिरिक्त आयुक्तांची नोटीस!

पालकमंत्री नितीन राऊतांच्या दबावात अतिरिक्त आयुक्तांची नोटीस!

Advertisements


ॲड.मेश्राम यांचा घणाघाती आरोप: मोर्चामध्ये मनपा बसेसचा वापर प्रकरण

आघाडी सरकारने दिले रमाई घरकूल योजनेच्या ४० कोटींपैकी फक्त पावणे दोन कोटी

नागपूर,ता. १ नोव्हेंबर: नुकतेच २७ ऑक्टोबर रोजी भाजपतर्फे रमाई घरकूल योजनेच्या अनुदानासाठी संविधान चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विशाल मोर्चा काढण्यात आला,या पार्श्वभूमीवर मनपाचे अति.आयुक्त मीणा यांनी मला मनपा परिवहनच्या ‘आपली बसचा ’ वापर राजकीय उद्देशासाठी केल्याचा ठपका ठेवीत नोटीस बजावली आहे मात्र या मोर्च्याला घाबरुन पालकमंत्री नितीन राऊत यांच्या दबावातून अशी नोटीस अति.आयुक्तांनी काढली असल्याचा घणाघाती आरोप माजी विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी आज मनपा मुख्यालयात अायोजित पत्र-परिषदेत केला.

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की मनपा परिवहन व्यवस्थापक भालवे यांनी अशी नोटीस सहीनिशी काढली असल्याचे मला कळले असून अद्याप तरी मला अशी नोटीस प्राप्त झाली नाही.मी मोर्च्याचा आयोजक असल्याने मला कारणे दाखवा नोटीस पाठवली असल्याचे कळले .त्यात राजकीय कार्यक्रमासाठी शासकीय बसेस देता येत नसल्याचे नमूद असल्याची माहिती आहे.

मात्र ‘आपली बस’ संबंधी असा करार,कायदा,कंपनीसोबतचा करारनामा,मेमोरेंडम ऑफ अंडरस्टॅण्डिंग(एमओयू) कधी झाला? याला मनपाच्या सभागृहाची मान्यता कधी मिळाली?असा प्रश्‍न उपस्थित करुन मग अति.आयुक्त मीणा यांना हे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला?त्यांचे बोलविता धनी कोण आहे?ते कोणाच्या दबावात काम करीत आहे?पागे यांनी कोणाच्या आदेशाने नोटीस काढली?त्यांना कोणी आदेश दिले?७ ते ८ हजार रमाई घरकूल अन्यायग्रस्त लाभार्थ्यांचा मोर्चा बघून पालकमंत्री घाबरले व लाभार्थ्यांचे लक्ष मूळ मुद्दावरुन हटावे यासाठी पालकमंत्री नितीन राऊत यांनी अति.आयुक्तांवर दबाव निर्माण केल्याचा आरोप ॲड.मेश्राम यांनी याप्रसंगी केला.

मात्र मनपात काेणत्याही पद्धतीने असा प्रयत्न चालू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.दलित,वंचित,शोषित,पिडीतांचे लक्ष भरकटवण्यासाठी राऊत यांची ही घृणित खेळी असल्याचा संताप यावेळी ॲड.मेश्राम यांनी व्यक्त केला.

४० कोटींऐवजी सरकारने दिले अटींसह १ कोटी ८० लाख रुपये-
नुकतेच पालकमंत्री यांनी आघाडी सरकारकडून रमाई घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना १ कोटी ८० लाख रुपये दिले असल्याचे घोषित केले मात्र आघाडी सरकारने १० झोन मिळून प्रत्येक झोनमध्ये १८ लाभार्थ्यांची यादी मागवली आहे.एकूण १८० लाभार्थ्यांची यादी ट्रेझर्सला दिल्यानंतरच सरकार ही रक्कम वळती करणार आहे,नियमानुसार मनपा ही नोडल एजंसी आहे,मात्र एक तर सरकार हा चूकीचा पायंडा पाडत आहे,याशिवाय एकूण ४० कोटींचे हक्काचे अनुदान न देता फक्त १ कोटी ८० लाखांची भलावण,ती देखील ‘अटीं’सह आघाडी सरकारने केली असल्याचा आरोप ॲड.मेश्राम यांनी केली.

मीणा यांचेच सरकारी वाहन गोंदियात-
प्रामाणिकपणाचा आव आणनारे अति.आयुक्त मीणा यांचे स्वत:चे ‘MH-३ B2 317’.क्रमांकाचे शासकीय वाहन दि.१८ सप्टेंबर २०२१ रोजी आयुक्तांची किवा महापौरांची परवानगी न घेता गोंदियात गेले.त्यांच्या वाहन चालकांनी आधी परवानगी घ्यावी लागेल,असा नियम असल्याचे सांगताच त्यांनी त्या प्रामाणिक वाहनचालकाला घरी बसवले.प्रवास संपल्यानंतर आता ते आयुक्तांची परवानगी घेण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप ॲड.मेश्राम यांनी केला.

याशिवाय मीणा यांनी स्वत:च्या कक्षाच्या नुतनीकरण,सुशोभिकरण,वातानुकूलीनावर मार्च २०१९ पासून लक्षावधींचा खर्च केला असल्याचा आरोप ॲड.मेश्राम यांनी केला.आपल्या कक्षात मीणा यांनी जनतेच्या पैश्‍यावर टी.व्ही पासून सर्व सुविधा करुन घेतल्या.त्यांनी केलेल्या या संपूर्ण खर्चाचा तपशील मागवणारे पत्र दि.२९ ऑक्टोबर रोजी पाठवले मात्र अद्याप त्याचे उत्तर मला मिळाले नसल्याचे ते म्हणाले.

आजपर्यंत मनपाच्या इतिहासात काँग्रेस पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांच्या कस्तूरचंद बाग येथील सभेसाठी तसेच इतर अनेक नेत्यांच्या सभांसाठी मनपाच्या बसेसचा उपयोग झाला आहे.याशिवाय नेत्यांनी लग्न समारंभ,खासगी सोहळे यांच्यासाठी देखील बसेसचा वापर केला आहे मात्र अपंग,ज्येष्ठ व गरजूंसाठी मी मोर्चामध्ये एकूण ६० बसेस उपलब्ध करुन घेतली त्यावर परिवहन व्यवस्थापक भेलावे यांच्या सहीनिशी कारणे दाखवा नोटीस निघते?

मोर्चा हा थेट आघाडी सरकारच्या दुटप्पी कारभारावर व दलित,शोषित,पिडीतांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करणारा होता त्यामुळेच पालकमंत्री यांनी ही खेळी केली आहे जो भाजप पक्ष कदापि सहन करणार नाही,असे खडे बोल ॲड.मेश्राम यांनी याप्रसंगी पालकमंत्र्यांना ऐकवले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या