फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजपश्‍चिम नागपूरातील शोभायात्रेत ३१ चित्ररथ होणार सहभागी

पश्‍चिम नागपूरातील शोभायात्रेत ३१ चित्ररथ होणार सहभागी

Advertisements

करोनानंतर तीन वर्षांनी गुरुवारी रामनवमी उत्सव उत्साहात होणार साजरा

नागपूर,ता.२८ मार्च २०२३: पश्‍चिम नागपूर नागरिक संघ आणि श्री राम जन्मोत्सव शोभायात्रा समितीतर्फे ३० मोर्च रोजी रामनगरातील राममंदिरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे.यात ३१ चित्ररथ सहभागी होणार आहेत.सोबतच घोडेस्वार,स्केटिंग करणारे विद्यार्थी राहणार असून, शोभायात्रेच्या संपूर्ण मार्गावर संस्कार भारतीतर्फे आकर्षक रांगोळी काढली जाणार आहे,अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवी वाघमारे यांनी पत्रपरिषदेत दिली.

या शोभायात्रेचे व श्रीरामपादुका असलेल्या पालखीचे पूजन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी खासदार अजय संचेती,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे,माजी राज्यमंत्री परिणय फुके,आमदार विकास ठाकरे,प्रवीण दटके,माजी आमदार प्रकाश गजभिये,अनिल अाष्टनकर,विष्णू मनोहर यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे.

पश्‍चिम नागपूरात १९७६ पासून रामनवमीनिमित्त शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आले.शोभायात्रेतील मार्गांवर संस्कार भारतीतर्फे रांगोळ्या काढण्यात येणार असून आकर्षक देखावे देखील सादर करण्यात येणार आहे.

विविध मार्गावर प्रवेशद्वार आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.मागील वर्षीच्या शोभायात्रेत राममंदिरांची प्रतिकृती भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती.

यावर्षीच्या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र प्रायोजित विश्‍वगुरु भारत हा भारतमातेचा चित्ररथ,प्रभू रामचंद्राने रावणावर मिळवलेला विजय असे देखावे लक्ष वेधून घेणार आहे.

खास करुन विदर्भाचे दैवत आदासाचा गणपती,कोराडीची जगदंबा मात्रा,धापेवाड्याचे विठ्ठल रुक्मिणी,शेगावचे श्री गजानन महाराज विशेष आकर्षण असणार आहे.

शोभायात्रेत संचेती पब्लिक स्कूल,ग्लोबल स्कूल,ज्यूडो प्रात्यक्ष्क,प्रहार संघटना,संत गाडगे महाराज भजन मंडळ,एकल ग्राम संघटना समिती व इतरही अनेक चित्ररथ राहणार आहेत.

असा आहे शोभायात्रेचा मार्ग-
श्रीराम मंदिर रामनगर येथून शोभायात्रा प्रारंभ,बाजीप्रभू चौक,लक्ष्मीभूवन चौक,कॉफि चौक,बजाज नगर चौक,लक्ष्मीनगर चौक,अभ्यंकर नगर चौक,व्हीएनआयटी गेट चौक,शंकरनगर चौक,कै.पुष्पलता तिडके चौक,हिल रोड मार्ग, बाजीप्रभू चौक ते पुन्हा मंदिरात समारोप.
………………….
पोद्दारेश्‍वर राम मंदिरातर्फे गजरथासह भव्य शोभायात्रा

मंदिराचे शताब्दी वर्ष व शोभायात्रेचे ५७ वे वर्ष असून या वर्षी विशेष असा ‘गजरथ’ शोभायात्रेचे मुख्य आकर्षण असणार आहे.या गजरथावर भगवान गणेश विराजमान असतील त्याच बरोबर मंदिरातील भगवान श्रीराम,सीता व लक्ष्मणाची मुख्य मूर्ती देखील विराजमान असतील.

एकूण ८५ चित्ररथ शोभायात्रेत राहणार असून ३० हजार मार्ग व्यवस्थेचे कार्यकर्ता शोभायात्रेच्या मार्गाचे संचालन करणार आहेत.

करोना नंतर तीन वर्षांच्या कालखंडानंतर ही शोभायात्रा निघणार आहे तसेच ९ ते १० लाख नागपूरकर नागरिक ही शोभायात्रा बघतील असा अनुमान आहे.

शोभायात्रेच्या अनुषंगाने पोलिस विभागातील चार डीसीपी,इतर पोलिस अधिका-यांची , इतर प्रशासकीय अधिका-यांची काल मंदिरामध्ये या संदर्भात एक बैठक पार पडली.प्रशासनाचा संपूर्ण सहयोग शोभायात्रेला मिळत आहे.
……………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या