

उत्तर नागपूरातील मतदारांचे मानले आभार
नागपूर: पराभवानंतर बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष् सुरेश साखरे यांनी रविवारी उत्तर नागपूर मतदार आभार रॅली काढली. बसपाच्या इतिहासात प्रथमच पराभूत उमेदवाराने अशी आभार रॅली काढली. यंदाच्या विधान सभा निवडणूकीत बसपाच्या २६६ जागांवर कार्यकर्त्यांनाच उमेदवारी पक्ष्ातर्फे देण्यात आल्याचा दावा साखरे यांनी केला.
साखरे यांना निवडणूकीनंतर पक्ष्ातून निलंबित करण्यात आले आहे. तरी देखील त्यांच्या रॅलीला कार्यकर्त्यांनी गर्दी करुन पाठिंबा दिला. साखरे यांची रॅली इंदोरा मैदान येथून सकाळी सुरु झाली. ही रॅली मतदार संघातील सर्वच प्रमुख मार्गावरुन निघाली. मतदारांना हात जोडून अभिवादन करीत त्यांच्या सहकार्याबद्दल साखरे यांनी आभार मानले.
विशेष म्हणजे या वेळी बसपातर्फे देण्यात येणारे नेहमीच्याच घोषणाही देण्यात आल्या. रॅलीत जिल्हा प्रभारी उषा बौद्ध, माजी नगरसेवक मुरली मेश्राम,सुभाष गजभिये यांनीही सहभाग नोंदवला. रॅलीत नगरसेवक राजू चांदेकर, नगरसेवक इब्राहिम टेलर,माजी नगरसेवक राजेंद्र दरवाडे, राजेश नंदेश्वर, लल्लन मेहता, सुनंदा नितनवरे, माया ऊके, चंद्रशेखर भंडारे, ऊमेश मेश्राम, तपेश पाटील आदी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
