फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजपब्लीक बायसीकल शेअरिंग प्रणालीसाठी मनपा, महामेट्रो व दोन कंपन्यांमध्ये त्रिपक्षीय करार

पब्लीक बायसीकल शेअरिंग प्रणालीसाठी मनपा, महामेट्रो व दोन कंपन्यांमध्ये त्रिपक्षीय करार

Advertisements

शहरातील विविध ठिकाणांसह शासकीय कार्यालय परिसरातही उभारणार नि:शुल्क सायकल पार्कींग स्टँड

नागपूर, ता. २८ एप्रिल २०२२: : नागपूर शहरात इंधनविरहित पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाउल उचलले आहे. नागपूर शहरात सायकल चालविण्यास प्रोत्साहन मिळावे, नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा यासोबतच सुरक्षितरित्या व शिस्तबद्धरित्या सायकल पार्क करता यावी, यासाठी शहरात विविध ठिकाणी सायकल स्टँड उभारण्यात येणार आहेत. यासंदर्भात नागपूर महानगरपालिका, महामेट्रो आणि शेअरींग तत्वावर सायकल उपलब्ध करून देणा-या कंपनी मे. विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि मे. ग्रीन पीडिया बाईक शेअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहात गुरूवारी  मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, बायसिकल मेयर डॉ. अमित समर्थ, महामेट्रोचे महाव्यवस्थापक सुधाकर उराडे, संयुक्त महाप्रबंधक महेश गुप्ता, मनपाचे वाहतुक अभियंता श्रीकांत देशपांडे, विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रशांत उगेमुगे, माय बाईकचे श्रेयस शाह, महामेट्रोचे अधिकारी दिलीप वराडे, दिलीप वरकड, रवींद्र परांजपे आदी उपस्थित होते.

या करारानुसार दोन्ही ऑपरेटर कंपनी द्वारे नागपूर षहरात विविध ठिकाणी सायकल स्टॅन्ड लावून नागरीकांसाठी सायकली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याद्वारे शासकिय, निमशासकिय, खाजगी कार्यालये, रहिवासी एरिया, शॉपींग मॉल्स, थिएटर, मल्टी प्लेक्स, बाजाराचा एरीया, मेट्रो स्टेशन्स, बस स्टँड्स, बगीचे, पार्क, सार्वजनिक स्थाने इत्यांदी ठिकाणी बायसिकल्स उपलब्ध करून देण्याची योजना आहे. मोबाईल अॅप द्वारे सायकल बुक करून ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा राहणार आहेत. याकरिता ऑपरेटरद्वारे भाडे आकारण्यात येईल. ही प्रणाली जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि महामेट्रो रेल कार्पोरेशन सहाय्य करणार आहेत.

नागपूर शहरात माय बाईक कंपनीद्वारे मेट्रो स्टेशनवर तर महा मेट्रोतर्फे शहरातील वेगवेगळ्या भागात लावण्यात आलेल्या सायकल स्टँडबाबत यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी आढावा घेतला. सध्या लावण्यात आलेले सायकल स्टँड हे प्रत्येक सायकलसाठी योग्य ठरत नाही. त्यामुळे सध्याच्या सायकल स्टँडची डिझाईन बदलविण्याची सूचना बायसिकल मेयर डॉ. अमित समर्थ यांनी केली. नागरिकांना सहजरित्या सायकल उपलब्ध व्हावी, त्यांना जवळच्या ठिकाणाहून शहरातील कोणत्याही भागात जाता यावे यासाठी चागंले आकर्षक सायकल स्टँड असणे आवश्यक आहे. बायसिकल शेअरींग प्रणालीद्वारे स्टँडवरील सायकल इतरांना वापरता येईलच मात्र याशिवाय स्वत:च्या सायकलने येणा-या व्यक्तींनाही सायकल पार्कींगसाठी हक्काची जागा असणे आवश्यक आहे. यादृष्टीने विचार करून शहरातील महत्वाचे बाजार, मॉल व ज्या ठिकाणी जास्तीत जास्त नागरिकांची ये-जा असते अशा सर्व ठिकाणी बायसिकल शेअरींगसह नागरिकांना त्यांच्या सायकलही नि:शुल्क पार्क करता यावे यासाठी नवीन डिझाईनचे सायकल स्टँड लावण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले.

याशिवाय मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी शहरातील सर्व शासकीय कार्यालयांच्या परिसरातही सायकल स्टँड उभारण्याबाबत निर्देशित केले. नागपूर महानगरपालिका आणि महामेट्रो यांच्या वतीने हे सर्व सायकल स्टँड उभारण्यात येणार आहेत. यासंदर्भात सर्व शासकीय कार्यालयांशी संपर्क साधून त्यांचेकडून उपलब्ध जागेची माहिती घेउन तिथे हे स्टँड उभारण्याबाबत कार्यवाही करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

ऑपरेटर कंपनी स्वतःच्या खर्चावर सायकली आणि सायकल स्टॅन्ड्स उपलब्ध करणार आहेत आणि त्याचे परिचालन करेल, देखरेख करेल सार्वजनिक बायसिकल्स टप्याटप्याने उपलब्ध करण्यात येणार आहेत. ऑपरेटर द्वारे सार्वजनिक सायकलीची उपलब्धता आणि बुकींगसाठी अॅप आधारित प्रणाली विकसीत करून नागरिकांना उपलब्ध करणार आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या