फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजपदवीधर निवडणूक: ॲड. अभिजीत वंजारी यांची दक्षिण नागपुरात सभा

पदवीधर निवडणूक: ॲड. अभिजीत वंजारी यांची दक्षिण नागपुरात सभा

Advertisements

नागपूर, २० नोव्‍हेंबर: महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूकीचे वातावरण हळूहळू तापू लागले असून नागपुर विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी कॅांग्रेस , शिवसेना , पिरिपा ( कवाड़े गट) , आरपींआय( गवई गट)आणि मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांनी प्रचाराचा सपाटाच लावला आहे. दिवसातून दोन ते तीन प्रचार सभा ते नागपुरातील विविध भागात घेत आहे. गुरुवारी सायंकाळी त्‍यांनी दक्षिण नागपुरातील महाकाळकर सभागृहात सभेचे आयोजन केले होते.

 

या प्रचार सभेला नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव गिरीश पांडव, नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे महामंत्री गजराज हटेवार, नगरसेवक संजय महाकाळकर, सर्व माजी नगरसेवक प्रशांत धवड, वासुदेव ढोके, अशोक यावले, यशवंत कुंभलकर, किशोर गजभिये, धरमा पाटील, विविध ब्‍लॉकचे अध्‍यक्ष प्रविण गवरे, विश्‍वेश्‍वर अहिरकर व दिनेश तराळे यांची उपस्‍थिती होती.

या सभेत प्रचाराच्‍या तयारीचा आढावा घेण्‍यात आला सोबतच प्रचाराची दिशा ठरविण्‍यात आली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या