फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजपदवीधर निवडणूक:बळीराजा पक्षाचे नितिन रोंघे यांना समर्थन जाहीर

पदवीधर निवडणूक:बळीराजा पक्षाचे नितिन रोंघे यांना समर्थन जाहीर

Advertisements

बळीराजा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष् डॉ.महेंद्र धावडे यांची सभा संपन्न

भंडारा,ता. २१ नोव्हेंबर: महाराष्ट्रात सध्या पदवीधर निवडणूकीचा ज्वर चढला असून १ डिसेंबर रोजी मतदान आहे. परिणामी सर्वच उमेदवारांच्या नागपूर,भंडारा,गडचिरोली आदी जिल्हयात बैठका मोठ्या प्रमाणात पार पडत आहेत.बळीराजा पक्ष्ाचे संस्थापक अध्यक्ष् डॉ. महेंद्र धावडे यांनी देखील भंडारा जिल्हा बळीराजा पदवीधर संघ जिल्हा कार्यकारिणीची सभा आज २१ नोव्हेंबर २०२० रोजी आशिष वंजारी यांच्या कार्यालयात घेतली.

या सभेत संपूर्ण जिल्ह्यातील दौरा हा उद्या रविवार दिनांक २२ नोव्हेंबर पासून सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले.
कॉर्नर बैठका तसेच प्रमुख कार्यकर्ते,पक्ष् पदाधिकारी,इतर पक्ष्,संघटना,पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा,विचारविनिमय करुन यावेळी बळीराजा पक्षाचे उमेदवार अभियंते नितिन रोंघे यांना विजयी करण्याचे अवाहन करण्यात आले. बैठकीला पक्ष्ाचे सर्व प्रमुख तसेच विभागाध्यक्ष् उपस्थित होते.

अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक ९५१२९१२७२७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या