फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजपदवीधर निवडणूक:नेत्यांची नसून कार्यकर्त्यांची परिक्षा!

पदवीधर निवडणूक:नेत्यांची नसून कार्यकर्त्यांची परिक्षा!

Advertisements

विखुरलेला मतदारसंघ:मतदारांना मतदार केंद्रापर्यंत आणण्यास लागणार कस

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १८ नोव्हेंबर: सध्या नागपूरच्या सहा जिल्ह्यात पदवीधर निवडणूकीचा ज्वर चांगलाच चढला असून उमेदवार नेत्यांची चांगलीच दमछाक होताना दिसतेय.सर्वात महत्वाचे म्हणजे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महापौर संदीप जोशी व आघाडीचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांच्यातील तुल्यबळ लढत बघता ही निवडणूक आता नेत्यांची राहीली नसून ‘कार्यकर्त्यांची’ झाली असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सध्या सर्व उमेदवार हे मतदार संघ असणा-या सहाही जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यस्त आहेत.कालच निवडणूक आयोगातर्फे मतदार यादीही प्रसिद्ध करण्यात आली. पदवीधर निवडणूकीत एकूण १ लाख ८२ हजार २१० मतदार असून,या सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवरांचा चांगलाच कस लागत आहे.एकट्या नागपूर जिल्ह्यात ८७ हजार ६५ मतदार आहेत.चंद्रपूर ३२ हजार ११३,वर्धा २२ हजार ४५२,भंडारा १७ हजार ९४१,गोंदिया १६ हजार २४६,गडचिरोली १२ हजार ३९१ मतदारांची नोंदणी झाली आहे.काल १७ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, आता एकूण १९ उमेदवार मैदानात उरले आहेत. एकूण ७ उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतली.१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी आहे.

मात्र हा मतदार हा इतर निवडणूकीतील मतदारांप्रमाणे सर्वसामान्य नसून सुजाण व सुशिक्ष्ति वर्गातील असल्यामुळे या मतदाराला मतदानासाठी प्रत्यक्ष् मतदान केंद्रापर्यंत आणणे सोपे नसल्यामुळेच ही निवडणूक नेत्यांची नसून ख-या अर्थाने कार्यकर्त्यांची मानली जात आहे. सहसा मतदानाच्या दिवशी शेवटच्या क्ष् णापर्यंत पदवीधर मतदारांचा कल हा स्पष्ट आकलन होत नसतो. इतर निवडणूकीतील मतदारांप्रमाणे या मतदाराला कोणत्याही प्रलोभनाने ‘प्रभावित’ देखील करता येत नसल्यानेच या निवडणूक कार्यकर्त्यांच्या परिश्रमाची कसौटीच लागत असते.

याशिवाय इतर निवडणूकीत मतदार हा बूथनिहाय जोडलेला असतो.परिणामी राजकीय पक्ष्ांचे बूथ अध्यक्ष् त्या-त्या मतदारांपर्यंत सहज पोहचत असतात मात्र पदवीधर मतदारसंघातील मतदार हे एका प्रभागातील चार-पाच बूथपर्यंत मर्यादित राहत नसून ते सर्वदूर विखुरलेले असल्याने त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणने म्हणजे कार्यकर्त्यांसाठी ‘दिव्यच’ ठरतं.

या निवडणूकीत भाजपतर्फे विद्यमान आमदार प्रा.अनिल सोले यांना डावलून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संपूर्ण दक्ष्णि-पश्‍चिम मतदार संघ गेल्या दोन निवडणूकीत एकहाती सांभाळणारे महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली व भाजपच्याच गोटात प्रकर्षाने‘गटबाजी’चे प्रकर्षाने दर्शनही घडले.सध्या महापौर संदीप जोशी हे नागपूर जिल्हयात प्रचारात व्यस्त आहेत,तर दूसरीकडे महाआघाडीचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांनी देखील गेल्या दोन वर्षापासूनच पदवीधर मतदार संघ ‘बांधण्यास’सुरवात केली होती,या निवडणूकीवर डोळा ठेऊनच त्यांनी गेल्या वर्षी पार पडलेल्या विधान सभेच्या निवडणूकीत विशेष रस दाखवला नसल्याचे बोलले जात आहे.त्यांच्या अनेक शैक्ष् णिक संस्था आहेत मात्र केवळ शैक्ष् णिक संस्था असणं हे निवडणूक जिंकण्याचं गणित असू शकत नाही.कारण हा मतदार सुशिक्ष्त असून शेवटच्या क्ष् णा पर्यंत तो त्याचा कल कळू देत नाही तसेच‘एकगठ्ठा’मतदान पदवीधर निवडणूकीत शक्य नाही.

दूसरीकडे भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्यासाठी देखील ‘करो या मरो’सारखी स्थिती उद् भवली असून त्यांचे यश हे संपूर्णपणे बूथ लेवलपर्यंत रुजलेली पक्षाची भक्कम संघटना व कार्यकर्ते यांच्या मेहनतीवर अवलंबून असल्याचे दिसून पडतंय.हा कार्यकर्ता आता उमेदवार बदलल्यानंतर मतदारांना मतदानासाठी कसा बाहेर काढतो,हे बघण्यासारखे राहणार आहे.दूसरीकडे काँग्रेस पक्षाने एका नंतरच्या एक अपयशानंतर देखील पक्षाची बांधणी केलीच नसल्याचे चित्र आहे.हा पक्ष् फक्त निवडणूकीपुरता सक्रिय होतो,अपयशानंतर पराभवाचे आत्मचिंतन तर करत नाही, बूथ लेवलवर देखील कार्यकर्त्यांच्या बांधणीसाठी भरीव कामगिरी करताना दिसत नाही.नुकत्याच पार पडलेल्या बिहारच्या निवडणूकीतील अपयशानंतर देखील या पक्षाच्या कार्यशैलीमध्ये कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही.परिणामी पक्षाच्या चिन्हावर जरी ही निवडणूक वंजारी लढताना प्रत्यक्ष् पणे दिसत असले तरी त्यांनाच आपली संपूर्ण ताकद यश खेचून आणण्यासाठी झोकावी लागणार आहे.

विशेष म्हणजे वंजारी यांना या निवडणूकीत गमावण्यासारखे काहीच नाही मात्र संदीप जोशी यांची संपूर्ण पुढील राजकीय कारर्कीर्द या निवडणूकीशीच निगडीत झाली असल्याने त्यांनी जोमात आपला प्रचार दौरा जिल्हेवारी सुरु केला आहे.त्यांच्या यशाची संपूर्ण दारोमदार ही सर्वस्वी पपक्षाच्या कार्यकर्त्यांवरच आहे हे देखील त्यांना मान्य करावं लागणार आहे.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या