फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजपदवीधर आणि शिक्ष् क निवडणूकीत पक्ष् का बरं मध्ये आणता?नितीन रोंघे यांचा...

पदवीधर आणि शिक्ष् क निवडणूकीत पक्ष् का बरं मध्ये आणता?नितीन रोंघे यांचा सवाल

Advertisements

नागपूर,ता. २३ नोव्हेंबर: मी एक सामान्य विदर्भवादी आहे. नागपूरातील हनुमान नगरात साधारणत: तीन खोल्यांमध्ये माझा निवास असून याच घरात लहानाचा मोठा झालो.इंजिनिअरिंग केलं,एमबीए केलं. विदर्भातील इतर मुलांसारखच मी देखील पुणे-मुंबईत जाऊन अनेक वर्ष नोकरी केली.मात्र नागपूरात परत आलाे आणि स्वत:ची कंपनी सुरु केली.

मात्र नागपूरात आल्यानंतर पुणे-मुंबईची तुलना कायम आपल्या नागपूर शहराशी करीत राहीलो. विदर्भावर मी खूप अभ्यास केला.विदर्भावर जो अन्याय होतो तो खूप भयंकर आहे. मी मामा किंमतकर यांच्या विचारांचा सखोल अभ्यास केला. रणजित बाबू यांच्या सहावासातही राहण्याचा योग आला.या अभ्यासातून माझ्या लक्ष्ात आलं की विदर्भावर जो अन्याय होतोय तो फार भयानक आहे.आपण गरीब नाही पण आपल्याला गरीब करण्यात आले.आपण लाचार नाही पण महाराष्ट्राचा एक विशिष्ट भाग विकसित राहीला पाहीजे म्हणून आपल्याला लाचार ठेवण्यात येत आहे. त्यामुळे कोणीतरी बंडखोरी करुन पेटून उठायला पाहिजे.मी सामान्य विदर्भवादी आहे.एक सामान्य मनुष्य आहे,मी ही बंडखोरी करु शकतो,प्रत्येक विदर्भवादी ही बंडखोरी करु शकतो,म्हणूनच मी ठरवलं की पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही विदर्भाच्याच मुद्दावर लढावी.

मला जुने विदर्भवाद्यांनी यांचा या निवडणूकीचा अनुभव खूप काही चांगला नव्हता,त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र मला विदर्भातील सुज्ञ मतदारांवर पुर्ण विश्‍वास आहे.म्हणूनच ही निवडणूक मी विदर्भ राज्याच्या मुद्दावरच लढत आहे.

मी गेली सोळा वर्षे विदर्भाच्या आंदोलनात सहभागी होत आहे.२०१५ पासून मी महाविदर्भ जनजागरण कार्यक्रम विदर्भातील सर्व तालुक्यांमध्ये राबवतोय..मी विदर्भातील सर्वसामान्य लोकांकडे गेलो,त्यांना समजावून सांगितले ३७१(२) काय आहे?विदर्भावर पश्‍चिम महराष्ट्रातील नेत्यांकडून कसा-कसा सातत्याने अन्याय होत आहे,आणि आता या आंदोलनाचा पुढचं स्वरुप किवा पुढचं पाऊल म्हणून मी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.

मला पक्ष्ांकडूनही निवडणूक लढवण्याचा पर्याय देण्यात आला होता मला एबी फॉर्म द्यायला तयार होते मात्र मी सर्व विदर्भवादी पक्ष्ांचा पाठींबा मिळवत अपक्ष् म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.जेव्हा तुम्ही पदवीधर आहात तर तुम्ही पदवीधर आणि शिक्ष् क मध्ये पक्ष् का बरं आणता? हे इथल्या शिकल्या सवरल्या पदवीधरांचे प्रश्‍न आहेत ते तुम्ही पक्ष्ाच्या माध्यमातून का बरं सोडवता?घ्या तुम्हाला ज्यांचे समर्थन घ्यायचं आहे पण याच्यात पक्ष् आणनं बरोबर नाही,असे माझे स्पष्ट मत आहे.

तूम्ही जर महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जुना रेकॉर्ड बघितला तर जी लोकं कुठल्याही पक्ष्ाशी बांधित नाही बी.टी. देशमुख सारखे पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधी हे माझे आदर्श आहेत,ते अपक्ष् होते म्हणूनच ते भांडू शकत होते, ते कुठल्याही पक्ष्ाच्या दावणीला बांधले गेले नव्हते. ते विधान परिषदेत पदवधीरांची बाजू घेऊन प्रश्‍न मांडू शकत होते.बी.टी.सरांचाच आदर्श घेऊन मी ही निवडणूक लढतोय.

संदीप जोशींनी अर्ज भरताना सांगितले हा भाजपचा गड आहे,माझं त्यांना आव्हान आहे, फक्त पाच कामे दाखवा. राजकारणात कुठलीही गोष्ट ही कायम नसते.जेव्हा सामान्य माणसांचा आत्मा जागृत होतो तेव्हा परिवर्तन घडत असतं.म्हणूनच मी म्हणतोय गेल्या ५० वर्षात जे घडले नाही ते आता घडेल.एक विदर्भवादी तुमच्या गडाचा सुरुंग लावणार आहे.गेल्या ५० वर्षात तुम्ही केलेले फक्त पाच कामे दाखवा. राजकारणात कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नसतो.भाजपच्या मंत्र्यांनी विदर्भातील युवकांशी बेईमानी केली आहे,माजी मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी विधी मंडळात सांगितलं की विदर्भातील २६.२८ युवकांना नोक-या मिळणार आहेत. २०१९ साली मुनगंटीवार म्हणाले की २२८ टक्के नोक-या मिळाल्या मात्र २०१४ साली  पाच ते सहा टक्के नोक-या आहेत ,एमपीएससीचे अध्यक्ष् यांनी हे सांगितलं होतं.त्यांनी राज्यपालांना पत्र लिहलं होतं.कोणीतरी एकदाही हे बघितलं का गेल्या ५ वर्षात ज्या काही सरकारी नोक-या भरल्या गेल्या त्यात फक्त विदर्भातील युवकांचीच भरती करण्यात आली?असे अजिबात घडले नाही,हे यांनी फक्त वेळ मारुन न्यायला आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील मतदारांना खूश करण्यासाठी खेळी खेळली गेली आहे.त्यांच्या या राजकीय खेळीमुळे मात्र विदर्भाच्या बेरोजगारांचे प्रचंड प्रमाणात आताचं आणि येणा-या पिढीचं जे नुकसान झालं आहे इतिहास त्यांना यासाठी कधीही माफ करणार नाही.

मी फळाची अपेक्ष्ा करत नाही. सोळा वर्षे झाली मी विदर्भाच्या अन्यायाच्याच प्रश्‍नावरच लढत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील दिलेल्या निवेदनात मी कार्यक्ष्ेत्राबाहेर जाऊन विनंती केली नाही. नाही.नागपूर करारात जे कलम ८ घटनेतील कलम ३०१(२) आणि ५ ऑगस्ट १९९५ चे राज्यपालांचे आदेश याचा आधार घेऊन तुम्ही जर साढे बारा हजार पोलीसांची भरती करतात आहे त्याची टक्केवारी काढा.२३ टक्के हा विदर्भाचा हक्काचा आहे उर्वरित तुम्ही मराठवाडा किवा इतर ठिकाणाहून भरा,ही कायद्याला धरुन केलेली मागणी आहे. मागच्या अर्थमंत्र्यांनी जे नुकसान केलं. ते काही प्रमाणात भरुन काढण्याची ही संधी गृहमंत्र्यांना आहे.

विदर्भाचा जोगवा हे फक्त मत मागण्यासाठीच-
ही लढाई त्रिकोणी आहे एवढं तुम्ही पकडून चला. उदाहरणच द्यायचे असेल तर भारतीय जनता पक्ष्ाचे उमेदवार संदीप जोशी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाहेर येऊन माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत विदर्भावर सध्याचं सरकार करीत असेल्या अन्यायाच्या विरोधात मी ही निवडणूक लढतोय,असे म्हटले. मात्र सहा वर्षे तुमची सरकार केंद्रात आहे, गेले पाच वर्षे महाराष्ट्रात तुमचीच सरकार होती मग तेव्हा तुम्हाला विदर्भ का नाही आठवला?यांचे विदर्भावरचं प्रेम म्हणजे पुतना मावशीसारखं असतं. आपली प्रतिज्ञा असते ना की ‘भारत माझा देश आहे’यांचे कधी-कधी विदर्भ यांचा असतो,विदर्भवादी कधी-कधी माझे भाऊ-बांधव आहेत,यांचं हे असं असतं,आता विदर्भाचा मुद्दा बरोबर आठवला,हे उलट आमचंच पहीलं यश आहे.आता जसजशी निवडणूक जवळ येत जाईल हे पुन्हा विदर्भाचाच प्रसाद वाटणं सुरु करतील मात्र विदर्भातील जनता ही हूशार आहे. त्यांना हे कळून चूकलं आहे की विदर्भाचा जोगवा हे केवळ मत मागण्यासाठीच वापरतात. खात्री देतो यांच्या मनात वेगर्ळा विदर्भ देण्याची मंशाच नाही,यांना विदर्भाच्या समस्यांशी काहीही देणे-घेणे नाही त्यांना मुंबई-दिल्लीच हवा लागली आहे,असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

मी विधान परिषद सदस्य झाल्यानंतर ‘जय विदर्भ’ म्हणत सर्वात पहीले मी शपथ घेईल आणि मी सर्वात आधी दक्ष्ि ण -पश्‍चिम नागपूर,कामठी आणि हिंगणा या ठिकाणच्या आमदारांना तसेच नागपूर तसेच रामटेकचे खासदार यांना सोबत घेऊन आजच्या तारखेला मिहानमध्ये ज्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांचा अभ्यास करणार आहे. या ठिकाणी कोणकोणते उद्योग येऊ शकतात,मी एखाद्या सेल्समन सारखं या उद्योगामंध्ये जाणार आहे.त्या उद्योगजकांशी भेटणार. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना देखील आम्ही अप्रोच करणार आहे,आम्ही त्यांना सांगणार आहे की सध्या या या सुविधा या ठिकाणी आहेत तुम्ही येथे उद्योग लावा,माझे एक स्वप्न आहे, मला २५ हजार रुपये पगार देणा-या एक लाख नोक-या मला या मतदार संघात तयार करायच्या आहेत. यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.

याशिवाय स्वतंत्र विदर्भाचं आंदोलन देखील जाेरात चालवणार आहे त्यासोबतच आता जी पोलीस भरती आहे व महावितरणातील भरती असेल त्यात विदर्भातील युवकांनाच नोकरी मिळायली पाहीजे मग नंतर इतर भागातील युवकांना नोकरी द्या.सहा वर्ष मी विदर्भाच्या न्याय हक्कासाठी भांडणार असल्याचा खुलासा त्यांनी केला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या