फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशपत्रभेटची आता युवकांसाठी 'भेट'

पत्रभेटची आता युवकांसाठी ‘भेट’

Advertisements

आठवडाभर देशविदेशातील तज्ञांचे लाभणार मार्गदर्शन

नागपूर,१ जून: लहान मुलांसाठी ऑनलाईन संस्‍कार शिबिर, ज्‍येष्‍ठांसाठी ‘अक्षयदान’ सारखा विद्यादानाचा कार्यक्रम यशस्‍वीपणे पार पाडल्यानंतर आता पत्रभेट संपादक मंडळ युवकांसाठी नवीकोरी ‘भेट‘ घेऊन येत आहेत.

स्वप्नांना सत्यात उतरविण्याचे, नव्या उत्साहाचे, उमेदीचे, आकाशात उंच गरुड झेप घेण्याचे १६ ते २५ हे वय असतं. ‘पत्रभेट’ च्‍यावतीने या वयोगटातील युवकांसाठी २५ जून ते १ जुलै या सायंकाळी ७ ते ८ वाजतादरम्‍यान विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प. पू. विष्णुदास स्वामी महाराजांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त प. पू. सद्गुरुदास महाराजांच्या आर्शिवचनाने या कार्यक्रमाला सुरूवात होईल. या कार्यक्रमात देशविदेशातील तज्ञ,विद्वान मार्गदर्शन करणार आहेत.

२५ तारखेला व्‍ही स्‍क्‍वेअर सिस्टिमचे सीईओ अजेय देशमुख यांची ‘परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे’ या विषयावर पियुष उद्धव मुलाखत घेतील. युएसएच्‍या मेडिस्‍पेंडचे डाटा ऑपरेशन संचालक व्‍ही. बालचंद्रन यांचे २६ तारखेला ‘टू लर्न, ग्रो अँड प्रॉस्‍पर‘ विषयावर मार्गदर्शन लाभेल. २७ तारखेला पुण्‍याच्‍या टिळक महाराष्‍ट्र विद्यापीठाच्‍या प्रा. वसुंधरा काशीकर भागवत ‘संवाद कौशल्य आणि मुलाखत कौशल्य’ या विषयावर मार्गदर्शन करतील तर २८ तारखेला आयआयटी मुंबईचे डॉ. पराग भार्गव ‘फाइंडिंग इन्स्पिरेशन फॉन लर्निंग’ विषयावर भाष्‍य करतील.

२९ रोजी प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरींग अँड टेक्‍नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी ‘चॅलेंजेस अँड अपॉच्‍युर्निटीज फॉर युथ’ विषयावर आपले विचार मांडणार आहेत. ३० रोजी म्‍युझिअम ऑफ ब्रेन अँड माइंडचे संचालक डॉ. अविनाश जोशी ‘जॉब व्‍हर्सेस करीअर‘ वर तर १ जुलै रोजी गुगलच्‍या प्रिन्सिपल अकाउंट मॅनेजर नीरज हुद्दार यांचे ‘एमबीए ऑर नॉट : हाऊ टू डिसाईड वॉट्स राईट टू यू अँड व्‍हेन’ विषयावर आपले विचार मांडणार आहेत.

हा कार्यक्रम केवळ १६ ते २५ या वयोगटातील पत्रभेटच्‍या सदस्यांकरिताच असल्‍यामुळे या तज्ञांच्‍या मार्गदर्शनाचा लाभ घेण्‍यासाठी लवकरात लवकर पत्रभेटचे सभासद व्‍हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रभेट सदस्‍यत्‍वासाठी वार्षिक वर्गणी रु. २५१ इतकी असून त्‍याकरिता मंगेश बरबडे पुणे (099212 37999), शारदा राजळे मुंबई (098928 27005) किंवा प्रणोती रोटीवार नागपूर (099605 28318) यांच्याशी संपर्क साधता येईल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या