

पत्रकारांसाठी कोर्टाची पायरी पहीली कि शेवटची?मजिठीयाचा वचपा कोरोनातून काढला भरुन
पत्रकारांचा आरोप
डॉ.ममता खांडेकर
(Senior journalist)
नागपूर, ता. २९ मे: तीन महिन्यांपूर्वी जगभरात कोरोनाने उच्छाद मांडला त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती हा विषाणू लवकरच त्यांच्या फूफ्फूसावर नव्हे तर त्यांच्या अस्तिवावर,त्यांच्या आत्मसन्मानावर,समाजातील त्यांच्या ओळखीवर,स्थानावरच घाला घालणार आहे! ‘नोकरी’ ही कोणत्याही क्ष्ेत्रातील असली तरी ती फक्त पोट भरण्यापूरतीचे माध्यम नसते. तर ती असते त्या-त्या व्यक्तिची समाजातील ओळख.नोकरीच्या स्वरुपावरुन समाजात मिळणारा मान-सन्मान,पैसा,प्रतिष्ठा,रुतबा सगळं काही या नोकरीवरच निर्भर करतं.मात्र नागपूरात आता ‘नोबल’समजल्या जाणा-या पत्रकारीतेच्या जगतातच कोरोनानी अक्ष् रश: भूकंप आणला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारीतेच्या जगतालाच कोरोना नावाच्या भूकंपाचे हादरे बसले असले तरी नागपूरात ते गेल्या महिन्यापासून तीव्र स्वरुपात जाणवले आहेत.अनेकांना राजीनामे मागण्यात आले आहे.जे कायम होते त्यांना ‘करारावर’ येण्यास बाध्य केले जात आहे. जे राजीनामे देण्यास नकार देत आहेत त्यांना शहरापासून दूरवरच्या ग्रामीण भागात बदलीचे प्रस्ताव दिले गेले आहे. हे विदारक वास्तव आता पत्रकार जगतात लपून राहीले नाही.काहीही झाले तरी कंपनीला आता तुमची गरज नाही’गेट आऊट’चे धोरण या नोबेल प्रोफेशन कंपनीने २१ सा व्या शतकाच्या दूस-याच दशकातच स्वीकारले असल्याचे सत्य जगापुढे आले आहे. जे मान्य करावेच लागेल.
पत्रकारिता हा आता ‘सेवाधर्म’ राहीला नसून ‘व्यवसाय’असल्याची ओरड गेल्या २० वर्षांपासून भारतासारख्या संस्कृतीप्रधान देशात ऐकू येत होती मात्र त्याचे परिणाम’कोरोनाने’जगापुढे आणले इतकंच.कंपनीही नफ्यासाठी व्यवसाय करीत असते,कर्मचा-यांच्या उदर निर्वाहाचा ठेका किवा त्याचा समाजातील आत्मसन्मान जपण्याचा ठेका कंपनीने घेतला नसतो. आतापर्यंत तुम्ही उपयोगी होता,तुमच्या माध्यमातून भरमसाठ नफा कमावला,आता कंपनीवर तुम्ही,तुमचं अस्तित्व,तुमचा तो तथाकथित आत्मसन्मान हा डोईजड झाला आहे त्यामुळे ‘गेट आऊट’!
सन्मानाने राजीनामे द्या,नाही तर बडतर्फीची नोटीस देऊ,पुढे या नोटीसमुळे कुठेही नोकरीही मिळणार नाही….!कंपनीच्या या आदेशाने नागपूरातील अनेक पत्रकारांची रात्रीची झोप उडवली असून ते अनेकांचा सल्ला घेत असल्याचे दृष्य सर्वदूर पाहायला मिळतंय.मूळात प्रश्न हा खूप गंभीर आहे तो योग्यरित्या सोडवणेही गरजेचे आहे. अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा सल्ला आहे,नोटीस स्वीकारा मात्र राजीनामे देऊ नका,तशीही नोकरी जाणार,तशीही जाणार मग ’लढून’बाहेर निघा ना. कंपनीकडील कोणतंही पत्र अंडर प्रोसेस स्वीकारा.तुमची ही नोटीस आम्हाला अमान्य आहे असं पत्र द्या व हेच पत्र नोटीस समजावी अशी पुस्ती जोडा.पुढे या पत्राचा उपयोग कायदेशीर लढाईत होणार हे मात्र नीट लक्ष्ात ठेवा.मात्र कोर्टाची पायरी ही पहीली ठेवावी.
तर दूसरीकडे काही ज्येष्ठ पत्रकारांचा सल्ला अाहे कोर्टाची पायरी ही शेवटची ठेवावी.कंपनीला सांगा तीन महिने पगार देऊ नका,त्या पुढील तीन महिने अर्धा पगार द्या,मात्र कामावरुनच काढून टाकणे असा अस्त्विावरच घाव घालू नका….!मात्र हे कोणाला शक्य आहे?ज्या कंपनीला थोडा तरी ’मानवीय चेहरा’आहे तेच हे करतील.जे केवळ बिजनेससाठी एवढ्या कुटुंबांच्या जीवावर उदार झाली अश्या कंपनी या ३५ टक्के मानवी कपात करणारच. इतर विभागात टक्केवारी ठरवून देणार. एवढा व्यवसाय मिळवून दिला तर आणि तरच…पगार निघेल!
इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील कर्मचा-यांची दशा तर आणखीनच वाईट असून या माध्यमाला स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षांत देखील भारतीय कायद्याच्या कोणत्याच श्रेणीत स्थान मिळाले नसून,या माध्यमातील माध्यम प्रतिनिधी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक तिकडम लढवित असतात.आपले संबंध उभे करतात,जे मिळवायचे ते मिळवून घेतात आणि ‘नोकरी व अस्मिता’या भावनेपासून अगदी अलिप्त राहून कामे करतात.
मजिठीया लागू झाला तेव्हापासूनच वृत्तपत्र मालकांचे हे कर्मचा-यांप्रतिचे धोरण हे पूर्णपणे बदलले होते. मजिठीया लागू झाल्याने मायबाप सरकारकडून त्यांनी जाहीरातींचे दर ही अमाप वाढवून घेतले. मात्र अाता कोरोनामुळे आयतीच संधी कंपनी मालकांना मिळाली असल्यामुळे जे मजिठीयाच्या वेळी नाही साधता आलं ते कोरोनाच्या काळात साधून घेत असल्याचा खुलासा एका माजी ज्येष्ठ संपादकांनी केला.
संपादकांचे ‘खास’ व संपादकांची ’खून्नस’
नागपूरच्या पत्रकार वर्तुळात आणखी एक चर्चा सध्या चांगलीच व्हायरल होत असून संपादक हा शेवटी मॅनेजमेंटचा खास माणूस असतो त्यामुळे ३५ टक्के कर्मचारी कपातीमध्ये त्यालाच ‘फ्री हॅण्ड’मिळाला आहे कोणाला काढावे?कोणाला ठेवावे?संपादकांचेही शेवटी काही ‘खास’माणसे ही असतात ज्यांच्या नोकरीवर गदा येण्याची कोणतीच शक्यता नसल्याने एवढ्या तनावाच्या काळात ही त्यांचे चेहरे अगदी आनंदीत,प्रफुल्लीत आहेत,हास्य विनाेदात ते रंगले असून दूसरीकडे ज्यांच्यावर संपादकांची आधीपासूनच ‘खून्नस’ आहे त्यांची रात्रीची झोप मात्र उडाली असून त्यांचे चेहरे काळवंडलेले आहेत.येत्या जूनमध्ये ७ तारखेपर्यंत शेवटचा पगार हातात येऊन सोबतच त्यांनाच राजीनामा देखील मागितला जाईल,या धास्तीने त्यांचे श्वास अडकून पडले आहेत.ना जेवण गोड लागत ..ना जगणं…जगाला फक्त त्यांचं ’ बाह्य निष्प्राण जगणं’दिसतंय…..!
मानेवरच सूरी:एका ज्येष्ठ पत्रकाराची व्यथा
हा संपूर्ण मे महिना संपादकांनी मानेवरच सूरी ठेवली आहे. ती सूरी खोलवर नसांना चोवीस तास टोचतेय..खूप वेदना होते मात्र बोलता येत नाही.बाहरे रक्त न सांडता..आतमध्ये झिरपतंय…. ती संपूर्णपणे टोचावी व मुडदा पाडावा नाही तर तुमचा राजीनामा घेणार नाही,तुम्ही कंपनीसाठी आवश्यक आहात असे सांगून मोकळे तरी करावे अशी मनोव्यथा एक ज्येष्ठ पत्रकार व्यक्त करतोय.
ज्याचे गावात स्वत:चे घर आहे तो नक्कीच या भयाण संकटातून तरुन जाईल असा आशावाद ही हा पत्रकार व्यक्त करतो. खूप झाली पत्रकारिता,गावातच एक छोटेसे किराणा दूकान टाकेल,किवा इतर व्यवसाय करेल मात्र आता चाकरी करणार नाही.उमेदीचे जे काही १५-२० वर्ष हातात आहेत ते आता कायमचं स्थिरस्थावर होण्यासाठी खर्ची घालणार.स्वत:सोबच कुटुंबियांची,मुलांची अबाळ आता होऊ देणार नसल्याचा निर्धार हा धाडसी पत्रकार व्यक्त करतो.पुरे झाली १५ वर्षांची पत्रकारीता. नवीन पिढीला हेच सांगिल काहीही झाले तरी पत्रकारितेत येऊ नका. इतर कोणत्याही नोकरीपेक्ष्ा पत्रकारितेतील नोकरी ही…अस्मितेवरच घाला घालते!
आणि नियती हसली…..
दिल्लीवरुन नागपूरचा असाच एक पत्रकार आपलं चंबूगबाळं उचलून नागपूरात आला.तेथील संपूर्ण वृत्तपत्र संचच बंद करण्यात आला. त्यानेही एक भावनिक पोस्ट टाकली व ‘बेभरवश्याची पत्रकारिता’यावर चांगलीच लेखणी खरडून काढली मात्र….नागपूरात एका मोठ्या वृत्तपत्रात काम करीत असताना संपादकांची चाटूकारिता करुन त्याने अनेकांच्या नोक-या घेतल्या हे तो सोयीस्करपणे विसरला.पplanning,plotting,gossiping;office politics मध्येच संबंध पत्रकारितेतील वर्षे घालवून आता नियतीने सूड उगवल्यावर त्याला जिवनाचे आणि पत्रकारितेचे ‘तत्वज्ञान‘पाजळायला सूचले असल्याची चर्चा आहे.
त्याच्या सततच्या छळामुळे एका पत्रकाराच्या नोकरीचा बळी २१ जून २०१६ मध्ये गेल्यानंतर दूस-या दिवशी २२ जून २०१६ रोजी नेहमीची संपादकीय विभागाची मिटींग संपल्यानंतर त्याला जेव्हा कळले ती पत्रकार व्यक्ति राजीनामा देऊन निघून गेली,आता ती या कंपनीची सभासद नाही तेव्हा….त्याने जोरजोरात टाळ्या वाजवल्या आणि मोठ्योन हसला….!दंतसंप्रदायमध्ये कर्मसिद्धांतात हेच सांगितले आहे….कर्म..पलटून येतात…ते ही याच जन्मी!
त्या दिवशी त्याचे हसणे हे त्या पत्रकाराच्या हरण्यावर नसून तो स्वत:वर क्रूरपणे हसला होता हे त्या पामराला कळलेच नाही….!एका ज्येष्ठ पत्रकाराची व्यथा होती…आता….सगळेच..जमिनीवर आलेत!
मोदींचा जीआर….!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीआर काढून कोणालाही कामावरुन काढता येणार नाही अशी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेमुळे कोट्यावधी कामगारांना दिलासा मिळाला होता. मात्र…कंपनीच्या मालकांनी दडपण आणून आम्ही कंपनीच संपूर्णपणे बंद करु…असा इशारा देताच मोदी यांनी तो अध्यादेशच मागे घेतला!पत्रकारांनाही तोच दिलासा होता…मात्र…मोदींच्या हातात श्रम मंत्रालय असताना त्यांनी याबाबतचा कायद्या बनवलाच नाही…केली ती फक्त घोषणा…!सवंग लोकप्रियतेच्या आणखी एका घोषणेला पत्रकार देखील अखेर बळी पडलेत.नोकरी वाचवण्याची शेवटची शक्यताही मावळली.
पत्रकारांनी राजीनामे देऊ नये-शीतल करदेकर(अध्यक्ष्,नॅशनल यूनियन जर्नलिस्टस,महाराष्ट्रा)
पत्रकारांनी आपल्या न्याय हक्कासाठी अखेरपर्यंत लढावे. कोर्टाची पायरी ही शेवटची ठेवावी. मालकांनी कोणालाही कामावरुन काढू नये. पत्रकारिता हा काही बिजनेस नाही. पंतप्रधानांनीच आवाहन केले आहे कोणालाही कामावरुन काढू नये.आज तुमचं नुकसान होत आहे तर कर्मचा-यांना काढून टाकाल का?जेव्हा कोट्यावधी नफा कमावला तेव्हा दिवसरात्र कष्ट करुन तुमचे वृत्तपत्र मोठे करणा-या याच कर्मचा-यांना किती बोनस दिला? काही शहरातील पत्रकार संघटना या एकतर संपूर्णपणे निष्क्रिय आहेत किवा तेच पत्रकारांमध्ये भीती पसरवित आहेत.राजीनामे तर मुळीच देऊ नका.एकत्र व्हा,संघटित होऊन लढा द्या.पत्रकार असून समाजाला दिशा देणाराच जर अन्याय मुकाट्याने सहन करणार असेल तर हा पायंडा येणा-या पिढीवर दूरगामी परिणाम करेल.
नागपूर श्रमिक पत्रकार संघ पत्रकारांच्या हितासाठी न्यायालयीन लढाई लढणार-प्रदीप मैत्र(अध्यक्ष्,महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ)
आम्ही नागपूरातील जवळपास सर्वच दैनिकांच्या व्यवस्थापंकाना पत्रकार संघातर्फे पत्र दिले आहे. त्यात नमूद केले आहे की कोणालाही कामावरुन काढू नये किवा त्यांची पगार कपात करु नये. ही जी वेळ आहे ती असा अमानवीय व्यवहार करण्याची वेळ नाही.तरीही जर कोणत्याही दैनिकांनी कर्मचारी कपात केली तर त्या विरोधात न्यायालयात येत्या दोन-तीन दिवसातच पत्रकार संघ हा दाद मागणार आहे. जे पत्रकार किवा कर्मचारी हे पत्रकार संघाचे सभासद नाहीत त्यांनी देखील सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी किवा कोषाध्यक्ष् शिरीष बोरकर यांच्याशी संपर्क साधावा व त्यांच्याकडे पत्र द्यावे.त्यांची देखील न्यायालयीन लढाई नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे लढल्या जाईल. पत्रकारांनी न घाबरता सामोरे यावे. ही संघटना ठामपणे आपल्या वर्कींग जर्नलिस्ट यांच्या पाठीशी उभी राहील. विदर्भ डेली न्यूज पेपर्सच्या अध्यक्ष्ांना देखील आम्ही असे पत्र दिले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
