फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजपक्षाने दाखवलेला विश्‍वास सार्थक करणार:आभा पांडे

पक्षाने दाखवलेला विश्‍वास सार्थक करणार:आभा पांडे

Advertisements

महिला आयोगावर सदस्य म्हणून आभा पांडे यांची नियुक्ती

नागपूर,ता. २९ जानेवारी २०२२: सामाजिक जिवनात १९९७ पासून तर राजकीय जिवनात २००२ पासून कार्यरत असणा-या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या व ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांची राज्य महिला आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.विदर्भातून त्या एकमेव सदस्य आहेत हे विशेष.पक्षाने फार मोठी जवाबदारी सोपवली असून महिलांच्या प्रश्‍नांना तडीस नेणार,पक्षाने दाखवलेल्या विश्‍वासावर खरे उतरणार असा विश्‍वास आभा पांडे यांनी व्यक्त केला.

महिलांच्या प्रश्‍नाबाबत आभा पांडे यांचा प्रदीर्घ अनुभव बघता राष्ट्रवादीतर्फे त्यांना ही संधी प्रदान करण्यात आली.महिलांचे प्रश्‍न,त्यांचे उत्पीडन,शारिरीक,मानसिक,भावनिक,आर्थिक समस्या असो किवा योग्य समुपदेशन व मार्गदर्शन करण्याची संधी ,आभा पांडे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सदैवआपले कर्तव्य चाेख बजावले.विशेषत: पोलिस विभागाकडून महिलांच्या उत्पीडनाबाबत जी बेजवाबदारीची भूमिका रुढ झाली आहे, त्यात प्राधान्याने सुधारणा करणार असल्याचा मानस त्या व्यक्त करतात.

यासाठी त्यांनी तातडीने विदर्भातील चार जिल्ह्यातील समन्वयकांसोबत आज तातडीची बैठक घेतली.यवतमाळ व भंडारा जिल्ह्यातील कुमारी मातेचा प्रश्‍न याची तीव्रता व दाहकता त्यांनी समजून घेतली.या प्रश्‍नावर त्यांनी नि:शुल्क संशोधनासाठी स्वयंसेवी महिलांची चमू देखील गठीत केली आहे.

पक्षाच्याच आदेशाने विदर्भाकडे त्यांना जास्त लक्ष पुरविण्याचे सांगण्यात आले आहे.पक्षाने टाकलेल्या जवाबदारी व विश्‍वासावर खरे उतरणार असल्याचा मानस त्या व्यक्त करतात. आयोगाच्या माध्यमातून महिलांना संरक्षण व अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्या सांगतात.

महिलांसाठी अतिशय महत्वाच्या अश्‍या राज्य महिला आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती केल्याबाबत तसेच काम करण्याची संधी प्रदान केल्याबाबत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार,राज्याचे प्रदेश सचिव जयंत पाटील,उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफूल्ल पटेल,माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आभार मानले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या