फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजपंधरा दिवसांनतंरही नागपूरात करोना संसर्गितांचा आकडा फक्त चारच:महापौर संदीप जोशी

पंधरा दिवसांनतंरही नागपूरात करोना संसर्गितांचा आकडा फक्त चारच:महापौर संदीप जोशी

Advertisements

नूतन वर्षाच्या दिल्यात नागपूरकरांना शुभेच्छा

नागपूर: इटलीत २० फेब्रुवारी रोजी तीन लोकं हे करोना विषाणूने संसर्गित होते मात्र २३ मार्च रोजी हा आकडा ५९ हजारच्या वर पोहोचला. याचा अर्थ दररोज ६०० लोकांना या विषाणूनीची लागण होत होती,आणि तेवढेच लोकं मृत्यूमुखी पडत होते. असे असताना नागपूरकरांनी दाखवलेले अभूतपूर्व संयम आणि शिस्त ही खरोखरच कौतूकास्पद आहे. नागपूरकरांच्या या संयमामुळेच आज पंधरा दिवसानंतर देखील करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ही आजही फक्त आणि फक्त चारच असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी व्हीडीयोद्वारे सांगितले.

याप्रसंगी नागपूरकरांना गुडीपाडवानिमित्त हार्दीक शुभेच्छा प्रदान करताना महापौर म्हणाले,की दूर्देवाने हे वर्ष तुमच्या-आमच्यासाठी एक वेगळी समस्या घेऊ उभे राहीले आहे.आपल्याला कल्पनाही नव्हती ‘करोना’नावाचा विषाणू हा एवढ्या गतीने भारतात प्रवेश करीत आहे. परंतू दूर्देवाने हे घडले.या ठिकाणी म्हणूनच नागपूरकर जनतेचे मला कौतूक करावेसे वाटते,त्यांनी संयम व शिस्त दाखवल्यामुळेच नागपूरात हा आकडा नियंत्रणात राहू शकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाल नागपूरकर जो प्रतिसाद देत आहेत तो प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले. १० मार्च रोजी नागपूरात करोना संसर्गितांची संख्या ४ होती ती आज पंधरा दिवसांनी ही फक्त चारच आहे.ही संख्या वाढली नाही,ही दिलासादायक बाब आहे.मात्र असे असले तरी संकट अद्याप टळले नाही. त्यामुळे यासाठी आनंदी होण्याची गरज नाही. कारण तिस-या टप्प्यात हा विषाणू आपला खरा रंग दाखवतो,असे म्हटल्या जाते. तिस-या टप्प्पयात भयंकररित्या हा विषाणू संक्रमित होत असतो आणि झपाट्याने स्वस्थ समाजामध्ये प्रसार करतो.

त्यामुळेच पंतप्रधानांनी काल आव्हान केले.तुम्हाला आणि आम्हाला,समस्त देशवासीयांना सांगितले अजून २१ दिवस या विषाणूशी भारतीयांना मुकाबला करायचा आहे.हे कठीण आहे परंतू पंतप्रधानांनी कालच म्हटल्याप्रमाणे ‘जान है तो जहां है’.आपण जिवंतच राहीलो नाही तर काही अर्थच उरणार नाही.त्यामुळे फक्त २१ दिवस अजून स्वत:ला शिस्त लावून घेण्याचे आव्हान महापौरांनी केले.आणि याकरिता केवळ आणि केवळ एकच मंत्र आहे‘विलगीकरण…विलगीकरण आणि विलगीकरण’.हाच मंत्र तुम्हाला आणि आम्हाला आपल्या अंगी बाणवावा लागेल.

आपण स्वत:ला विलग करुन घेऊ या.मात्र असे असले तरी आपल्या देशात असे काही कलंदर लोकं आहेत ज्यांना अद्याप या धोक्याची जाणीव झाली नाही.सोशल मिडीयावर ते अफवाह पसरवित आहेत. अश्‍या अफवाह पसरवणे याला विकृतीच म्हणू शकतो.त्या अत्यंत खोट्या बातम्या असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.अश्‍या अफवांना बळी पडू नये असे आवाहन महापौरांनी केले.सोशल मिडीयावर हा आकडा फूगवून सांगितला जात आहे. त्यांच्यावर निश्‍चितच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे मात्र जे असे मॅसेजस फॉरवर्ड करतील त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशारा त्यांनी दिला.अश्‍या अफवाह पसरवून समाजाला पॅनिक करणारे यांना दोन वर्षांपर्यंची शिक्ष्ेचा प्रावधान आहे.त्यामुळे अफवाह पसरवू नका, सार्वजनिक स्थळी अत्यावश्‍यक सामान खरेदी करीता गेले असल्यास मास्क घाला,योग्य अंतर राखा व घरी दर अर्ध्या तासांनी हात सेनिटायझरने धूवा,असे आवाहन महापौर यांनी केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या