


पत्रात सांगितले पावसाचे कारण!
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार दि.७ सप्टेंबर रोजी एक दिवसीय नागपूर दौऱ्या वर येणार होते. मेट्रो रेल्वेच्या ११ किलोमीटरच्या मार्गाच्या उद् घाटनासाठी ते उपराजधानीत येणार होते मात्र याच दिवशी विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता,या पार्श्वभूमिवर मोदी यांचा उपराजधानीतील नियोजित दौरा रद्द करण्यात आला असल्याचे पंतप्रधान कार्यालयातून पत्राद्वारे कळविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हे पत्र प्रसार माध्यमांना प्रसारित करण्यात आले.
सप्टेंबर महिन्यातच्या सुरवातीपासून विदर्भात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. नागपूर व वर्धा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टिचाही ईशारा देण्यात आला आहे.त्यामुळे पंतप्रधानांचा नियोजित नागपूर दौरा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने रद्द होण्याची दाट शक्यता होतीच. नागपूरात आल्यानंतर ते ११ किलोमीटरच्या लोकमान्य नगर ते सीताबर्डी या मेट्रोमागाचे उद् घाटन करणार होते. सायंकाळी ५ वा. सुभाष नगर येथील मेट्रो-प्रदर्शनीचे अवलोकन तसेच झेंड्याचे अनावरण करुन महामेट्रोला हिरवी झेंडी दाखवणार होते. यानंतर ते मानकापूर येथील सभेला संबोधित करणार होते. या ठिकाणी महामेट्रोवरील लघूपटाचे प्रसारण करण्यात येणार होते. मेट्रोमधील तीन-चार विभागातर्फे कार्यक्रमही सादर होणार होते,यानंतर पंतप्रधान निघुन जातील अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी दुपारी १ वा. घेण्यात आलेल्या पत्र परिषदेत दिली होती. पंतप्रधान सारखे देशातील अति विशिष्ट व्यक्तीच्या दौऱ्या पूर्वी ज्या मार्गावर पंतप्रधानांना घेऊन मेट्रो रेल्वे चालणार होती,त्याचे निरीक्ष् ण करुन मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त( सीएमआरएस) यांच्याकडून प्रमाणपत्र मिळाले असल्याचे दीक्षित यांनी पत्र परिषदेत सांगितले. महामेट्राेने पंतप्रधानच्या दौर्याच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण तयारी केली मात्र ऐन वेळेवर पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याचे पत्र मेट्रो कार्यालयाला प्राप्त झाले. यात पावसाच्या अतिवृष्टिची शक्यता असल्याचे कारण सांगण्यात आले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
