Advertisements

पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन
स्मृती मंदिर व दीक्षाभूमीला देणार भेट
राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती
नागपूर, दि. २९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ३० मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर येणार असून शहरातील विविध महत्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये अनमॅन्ड एरियल व्हेईकल्ससाठी १२५० मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लोइटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे. तसेच नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत २५० खाटांचे रुग्णालय, १४ बाह्यरुग्ण विभाग आणि अत्याधुनिक १४ ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूर आणि विदर्भातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या नेत्रचिकित्सा सुविधा उपलब्ध होणार आहेत.
पंतप्रधान मोदी दीक्षाभूमी तसेच रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट देऊन अभिवादन करणार आहेत.सकाळी ९ वा.पंतप्रधान मोदी स्मृति मंदिरात जाऊन दर्शन घेतील.यानंतर ते पवित्र दीक्षाभूमीला अभिवादन करतील.सकाळी १० वा.ते माधव नेत्रालय प्रीमीयम सेंटरच्या आधारशीलेचे अनावरण करतील व जनसभेला संबांधित करतील.दूपारी १२.३० वाजता ते सोलर डिफेंस एंड एयरोस्पेस लिमिटेड मध्ये यूएवीसाठी लोइटरिंग म्यूनिशन टेस्टिंग रेंज व रनवे सुविधेचे उद् घाटन करतील.
दूपारी ३.३० वा. ते छत्तीसगढ राज्याचा देखील दौरा करणार आहे.तिथे ते ३३,७०० कोटी रुपयांच्या विविध विकास परियोजनांच्या आधारशिलाचे अनावरण करतील.हिंदू नुतन वर्षाच्या गुढीपाडवा या शुभ पर्वावर पंतप्रधानांचे नागपूरात आगमन होत आहे.
संपूर्ण यंत्रणा त्यांच्या सुरक्षेसाठी राबत आहे.शासन,प्रशासनासह पाेलिस विभागाने पंतप्रधानाच्या दौ-यानिमित्त चोख बंदोबस्त ठेवला आहे.पोलिस विभागासह सर्व सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर असून शहरात एनएसजी व एसपीजी या दोन्ही सुरक्षा यंत्रणांच्या स्वतंत्र तसेच एकत्रित मॉक ड्रील झाले.आज शनिवारी याची रंगीत तालीम देखील झाली.
Advertisements

Advertisements

Advertisements
