फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमन्यूज पोर्टलची फेसबूकला दहा कोटींची नोटीस!

न्यूज पोर्टलची फेसबूकला दहा कोटींची नोटीस!

Advertisements

नवी दिल्ली,ता. २२ डिसेंबर: एका न्यूज पोर्टल वेबसाईटच्या ‘फेसबूक‘च्या पेजवरील मजकुराला ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान चार वेळा अटकाव केल्याबद्दल ‘दी इन्क’या न्यूज पोर्टलने फेसबूकला चक्क दहा कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे!नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत रक्कम दिली गेली नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ही देण्यात आला.

हरियाणातून चालविल्या जाणा-या आणि राजेश कुंडू यांच्या मालकीच्या ‘दी इन्क’ने ही नोटीस पाठवली आहे.आमच्या ’दी इन्क’च्या फेसबूक पेजचे दीड लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.परंतू, फेसबूककडून ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान चार वेळा पेजवरील मजकुराला अटकाव करण्यात आला. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या मजकुराला अटकाव करुन त्याची पोच मर्यादित करण्यात आली.तसेच यापूर्वी विशेषत:हरियाणातील बडोदा मतदारसंघातील पोटनिवडणूकीदरम्यानही कोणतीही पूर्वसूचना न देता मजकूराला अटकाव करण्यात आला,आताही तोच प्रकार फेसबूकने पुन्हा केल्याचे नोटीसीत नमूद करण्यात आले.

वकील विक्रमजीत मित्तल यांच्यामार्फत फेसबूकला ही नोटीस पाठविण्यात आली असून,दहा कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे.नोटीसमध्ये सात दिवसात ही रक्कम देण्याची मागणी करुन त्याशिवाय कायदेशीर खर्च म्हणून एक लाख रुपये देण्याची मागणी ही करण्यात आली.

यापूर्वी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करीत असलेल्या शेतक-यांच्या ‘किसान एकता मोर्चा’ या फेबसबूक पेजवर भेट देणा-यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.त्यामुळे स्वयंचलित यंत्रणेनेच या पेजला ‘स्पॅम’ठरविल्यामुळे हे पेज बंद झाले होते. त्यामुळे इन्टाग्राम खात्यावर परिणाम झाला नव्हता.ही बाब निदर्शनास आल्यानंतर तीन तासांत पुन्हा फेसबूक पेज सुरु करण्यात आले,असे स्पष्टीकरण फेसबूकतर्फे सोमवारी देण्यात आले मात्र फेसबूककडून रविवारी ‘किसान एकता मोर्चा’ हे पेेज ब्लॉक करण्यात आल्यानंतर शेतक-यांनी संताप व्यक्त केला होता.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या