
(भाग-१)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १४ ऑ क्टोबर: सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंदिरे सुरु करण्याबाबत जुगलबंदी रंगली,याकडे सोशल मिडीयाचेही लक्ष् जाने स्वाभाविक होते. राज्य सरकारने हॉटेल,बार उघडण्यास परवानगी दिली आहे,मात्र देव-देवता कुलूपबंद आहेत,आपण हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहात,भगवान रामाचे भक्त आहात,मग अचानक धर्मनिरपेक्ष् तेकडे का वळतात?असे पत्र राज्यापालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले,आणि हे पत्र माध्यमांपर्यंत पोहोचण्याचीही चोख व्यवस्था केली,दुसरीकडे मुख्यमंत्री यांनी ही या पत्राला तेवढेच खरमरीत उत्तर दिले,‘माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची अावश्यकता नाही, कोणाकडून शिकण्याची गरज ही नाही,माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त कश्मीर म्हणा-यांचे हसत खेळत घरात स्वाग करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही’तिसरीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे ही वक्तव्य प्रसिद्ध झाले ’मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्याच्या कृतीमुळे मला धक्का बसला आहे!’
अर्थात असे धक्के देशातील जनतेला राजकीय मंडळींच्या वाचाळतेमुळे वारंवार बसतच असतात,हा भाग वेगळा.यात माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेत ट्वीटरवर ‘वाह प्रशासन! बार आणि दारुची दूकाने सुरु आहेत,मग मंदिर डेंजर झोन आहेत का?काही जण नियमावली लागू करण्यात असमर्थ ठरतात,त्यावेळी त्यांना प्रमाणपत्राची आवश्यक्ता असते’अश्या खाेचक शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष् केले. शरिरशास्त्र तज्ज्ञ यांच्या मते माणसाला बोलण्यासाठी ७२ स्नायूंची गरज असते.राजकीय नेत्यांना खरंच वाचळ बोलण्यासाठी एवढ्या स्नायूंची गरज पडत असावी का?हा वेगळा संशोधनाचा विषय ठरु शकतो.
निर्मला सीतारामन ‘विषारी नागीण!’
तृणमूल काँग्रेसचे आमदार कल्याण बॅनर्जी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ‘विषारी नागीण’ संबोधले आणि यावर देशात आता चांगलाच वाद रंगला आहे. इंधनदरवाढी विराेधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान कल्याण बॅनर्जी यांनी ‘विषारी सर्प जसा मनुष्याला दंश करुन ठार करतो,त्याप्रमाणे निर्मला सीतारामन यांच्यामुळे देशातील लोक एक-एक करुन मरत आहेत’अस वक्तव्य केले. वाचाळवीर वादांची एक ‘पारंपरिक श्रृंखला’या ‘संस्कारक्ष् म ’देशाला लाभली आहे. हा वाद देशातील नागरिकांसाठी काही नवा नाही.
नागपूरचा विचार करावयाचा झाल्यास आमदार जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजिव आणि पीपल्स रिपब्लिकन पक्ष्ाचे नेते जयदीप कवाडे यांनी लोकसभेच्या निवडणूकीदरम्यान केंद्रिय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्या विषयी बोलताना ‘ महिला जेवढे नवरे बदलतात तेवढे त्यांचे कुंकू मोठे होत जाते’ असे वादग्रस्त वक्तव्य करुन चांगलाच वाद ओढवून घेतला होता….!
बिहारचे कुख्यात नेते पप्पू यादव याने ‘मेरा बस चले तो पॉलिटिशियन मिलते ही शूट ॲट कर दू,पॉलिटिशियन बहोत ही(बिप) नारा मिले छोड दिजिये,पॉलिटिशियन मिले लात कंठ पर देकर मार दो,९० के बाद जितने लोगो न ेधन कमाया सबकी ईडी से जॉच कराओ’असे वादग्रस्त विधान करुन चांगलाच वाद ओढवून घेतला होता.
काँग्रेसचे मणिशंकर अय्यर यांनी ‘मोदी अगद दिल्ली आकर चाय का बिजनेस करना चाहते है तो हम उनके लिये जगह दे देंगे’अस वादग्रस्त विधान केले होते,झाले मात्र अघटित,पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत सरळ पंतप्रधान निवासातच जागा पटकावली!
योगी आदित्यनाथ यांनी ही वेळोवेळी वादग्रस्त विधाने करुन वाद ओढवून घेतले त्यांचे ‘जो भारत माता की जय नही बोले उन्हे पाकिस्तान भेज दो,किराया हम दे देंगे,वो एक हिंदू को मारते है हम दस को मारेंगे..वो एक हिंदू की लडकी भगाते है,हम दस को भगाकार हिंदू के घर लायेंगे,मदर टेरेसा ये सीआयए की एजेंट थी,सेवा के नाम पर हजारो .िहंदूअो का धर्म परिवर्तन किया…!त्यांच्या या अश्याच वादग्रस्त विधानांनी त्यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीच्या खूर्चीवर नेऊन बसवले!
महाराष्ट्राचे सांगायचे झाल्यास मनसेचे राज ठाकरे यांनी ’मोदीमुक्त भारत झाला पाहिजे,श्रीदेवीच्या मृत्यूव वर जवढी चर्चा झाली तेवढी जस्टीज लोया यांच्या मृत्यूवर का झाली नाही?एडॉल्फ हिटलरची हिच रणनीती होती,देशात हिटलरचेच तंत्र वापरले जात आहे,नोटाबंदी हा १९४७ नंतर सर्वात मोठा घोटाळा आहे…!’
हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब यांनी देखील पाकिस्तान क्रिकेटपटू जावेद मियादादचे कौतूक करताना ’मला पाकिस्तानच्या खेळाडूंशी काहीच वैर नाही,मला तर पाकिस्तानच्या टिमचं कप्तान बनायचं होतं’असे विधान केले जे नंतर माध्यमात खूप गाजले.जावेद मिया दाद बाळासाहेबांना भेटायला आला तेव्हाचे हे विधान आहे यावेळी उद्धव ठाकरे व राज ठाकरे दोघेही उपस्थित होते.
माजी गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांनी विधान परिषदेत ’घर मे पोलिसवाले तैनात करने पर भी रेप जैसी घटनाये नही रोक सकते,रेप जैसी घटनाये ये समाज के नैतिक मूल्यों का हनन दिखाता है…!‘असे विधान करताच माध्यमांमध्ये चांगलाच वाद उफाळला होता,यानंतर आबा पाटील यांनी या विधानाचे खंडन केले व माझ्या विधानाला तोडफोड करुन दाखवण्यात आले,असे वक्तव्य मी कधीही केले नाही,करणार ही नाही’असे सारवासावर केली होती.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यांनी ’उत्तर प्रदेशात तरुणांवर खोट्या रेप केसेस मोठ्या प्रमाणात दाखत होत आहेत,एकाने रेप केला तर चार लोकांचे नाव रिपोर्टमध्ये दर्ज केले जाते,एकाच कुटुंबात ४ भाऊ असतील तर त्या चारही भावांवर खोटी केस दाखल केली जाते,एक साथ चार लोकांनी रेप करने हे प्रॅक्टीकली तरी शक्य आहे का? हे त्यांचे निवडणूकीपूर्वीचे विधान होते!
केंद्रिय मंत्री अश्विनी चौबे यांनी राफेल व राहूल गांधी प्रकरणात ’राहूल गांधी राफेलवर पंतप्रधान मोदींवर जी टिका करीत आहेत त्यावरुन ते मेंटल सिझोफ्रोनियाचे रुग्ण असल्याचे सिद्ध होते,त्यांना मेंटल हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्याची गरज आहे,मोदींना खोटारडे म्हणणा-या काँग्रेस अध्यक्ष्ांनी आधी स्वत:चा आकार बघावा,मोदींची उंची आभाळा एवेढी आहे तर काँग्रेस अध्यक्ष्ांचा आकार हा नालीतल्या किड्यासारखां आहे….!’
(क्रमश:)




आमचे चॅनल subscribe करा
