फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनिवडणूका आल्या जवळ... मनपात कार्यकर्त्यांचे होणार ‘पुर्नवसन’

निवडणूका आल्या जवळ… मनपात कार्यकर्त्यांचे होणार ‘पुर्नवसन’

Advertisements

(संग्रहीत छायाचित्र)

नव्या एजन्सीसाठी काढणार निविदा: स्थायी समितीची ‘डोळेझाक‘ मंजुरी

नागपूर, ता. ३० जुलै: महानगरपालिकेच्या निवडणूकीची वेळ जवळ येत असून सत्ताधारी पक्षातर्फे आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याची घटिकाही जवळ आली असल्यामुळे आज स्थायी समितीच्या बैठकीत नव्या एजन्सीमार्फत नव्याने ‘संगणक ऑपरेटर्स’ या पदावर ‘भरती’ची प्रक्रिया राबविण्याच्या निर्णयावर शिक्कामोतर्ब झाले परिणामी गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या १९२ संगणक ऑपरेटरवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काेविड-१९ महामारीच्या काळात मनपा प्रशासनाने सामान्य नागपूरकरांसाठी जी ‘उत्तम आणि सर्वोकृष्ट’आरोग्य यंत्रणा हाताळली त्याबाबत तर गीनीज वर्ल्ड बूकमध्ये रेकॉर्ड नोंदवून टाका,असा संताप आधीच सोशल मिडीयावर उमटला असताना आपल्याच कंत्राटी कर्मचा-यांप्रति निवडणूकीच्या तोंडावर भाजप सत्ताधा-यांची ही असंवेदनशील धोरणे बघता एजन्सीच्या मार्फत निवडणूकीच्या तोंडावर आपापल्या कार्यकर्त्यांचे ‘पुर्नवसन’करण्याची ‘अनीती’अवलंबिली जात असल्याचा संताप मनपा कर्मचा-यांमध्ये कुजबुलल्या जात आहे.

स्थायी समितीने नव्या एजन्सीसाठी निविदा काढण्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. एवढेच नव्हे तर आता कार्यरत असलेल्या संगणक ऑपरेटर्सला नव्या एजन्सीने नियुक्ती दिली तरी त्यांचे वेतन आठ ते साडेआठ हजारांनी कमी होणार आहे!सर्वात महत्वाचे म्हणजे ही नवी एजन्सी आताच्या संगणक ऑपरेटर्स यांना नियुक्ती देईल, याबाबतही करारात प्रसत्वाचा समावेश नाही.

महापालिकेत गेल्या १५ ते २० वर्षांपासून संगणक ऑपरेटर्स कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. त्यांना सद्यस्थितीत २६ हजार रुपये वेतन मिळत आहे. याच नोकरीच्या भरवशावर अनेक संगणक ऑपरेटर्सने स्वत:च्या घरकूलाचे स्वप्न बघितले,ज्याचे हप्ते ते याच नोकरीच्या भरवश्‍यावर भरत आहेत.अनेकांनी या नोकरीच्या भरवश्‍यावर संसार थाटले,अनेकांच्या घरी वयोवृद्ध माता-पिता असून त्यांचे आजारपण तसेच शिक्ष् ण घेणारी मुलेबाळे आहेत मात्र त्यांचा कोणताही विचार कोविड-१९ च्या या महाभयंकर महामारीच्या काळातही सत्ताधारी पदाधिका-यांनी केला नसल्याबाबतचा संताप व्यक्त होत आहे.

एवढंच नव्हे तर नव्या एजन्सीला प्रति ऑपरेटर १५ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहे. अर्थात नव्या एजन्सीने आताच्या संगणक ऑपरेटरची नियुक्ती केली तरी त्यांच्या वेतनातही आठ ते साडेसाठ हजार रुपयांची घट होणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवणार आहे.

एकीकडे देशपातळीवर देशाचे पंतप्रधान यांनी कोविड-१९ च्या काळात कोणालाही कामावरुन काढू नका,बेराेजगार करु नका अशी ‘मन की बात‘ऐकवली होती दूसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षा चे पदाधिकारी एवढी वर्ष मनपात कंत्राटी पदावर काम केलेल्यांना ऐन कोविड:१९ च्या काळात बाहेरचा रस्ता दाखवत असून नव्या एजन्सीसोबतच्या करारात पुन्हा तेच कंत्राटी कर्मचारी घेण्याचा करार केला नसल्याने या मागे फक्त निवडणूकीचे ‘गणित’डोळ्यासमोर ठेवण्यात आल्याचे ‘नैराश्‍य’ही अनेक कंत्राटी संगणक ऑपरेटर्स यांनी बोलून दाखवले!

आणखी एका कंत्राटदाराचा उद्धार!
सत्ताधारी,काही पदाधिकारी,काही नोकरशहा आणि कंत्राटदार यांच्या ‘गुळपीठा‘वर एखाद्याला संशोधन करायचे असल्यास नागपूर महानगरपालिका या संशोधानासाठी सर्वोत्तम संधोशन केंद्र ठरु शकते,असे म्हटले जाते.आज स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार नव्याने निविदा न काढताच पुन्हा जुन्या कंत्राटदारालाच काम देण्यात आल्याने भाजप सत्ताधा-यांतर्फे आणखी एक वेळा आणखी एका कंत्राटदारांचा उद्धार झाल्याची बोचरी टिका मनपा वर्तुळात उमटली.

महाराजबाग येथील पूलाच्या कामासाठी यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. जुन्या मधल्या पूलाच्या एका बाजूला एका पूलाचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या पूलाचे काम अर्धवट आहे. जुना पूलही नवीन करण्यात येणार आहे. या कामात वाढ झाल्याचे कारण सांगून प्रशासनाने त्याच कंत्राटदाराला नवे काम दिले.

विशेष म्हणजे २ कोटी ४७ लाख रुपयांच्या कार्यादेशाला मंजुरी देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आज मंजुरी दिली. नव्या कामासाठी निविदा का काढण्यात आली नाही? असा प्रश्न सत्ताधा-यांना कोण विचारणार?

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या